पहिले पान | प्रहार ब्लॉग

प्रहार ब्लॉग

मोबाइल टॉवर्सचा फास

17 October, 2011 03:30:00 AM
हल्लीच्या काळात हातात मोबाइल नसेल तर जगणं मुश्कील वाटू लागलं आहे. संपर्कात राहण्याचं उत्तम माध्यम असलेला मोबाइल स्टेटस सिम्बॉल म्हणून ज्याच्या त्याच्या हाती दिसू लागला आहे. मोबाइलधारकांची संख्या वाढत आहे त्या प्रमाणात मोबाइल कंपन्यांचे टॉवरही ठिकठिकाणी दिसू लागले आहेत. मोकळ्या ठिकाणी, भरवस्तीत आणि त्यापुढे जाऊन इमारतींवरही? टॉवर उभारले जात आहेत.

आलेत सण, जपा सुजाणपण!

16 October, 2011 09:30:00 AM मूळ वस्तू/ उत्पादन आपणास हवे की नाही, यापेक्षा त्या मुलाचे लक्ष असते, त्या सोबत काय ‘फ्री’ मिळतय याकडे. याला मोठी माणसेसुद्धा बळी पडताना आपण पाहतो, मग लहान मुलांची काय कथा? मात्र, सुजाण पालक हे सुजाण ग्राहकही असतात. त्यांना आपल्या मुलांना सुजाण नागरिकही बनवायचे असते. त्यामुळे ते मुलांशी सांद साधतात, त्यांच्याकडून खरेदीचे जे निर्णय होत असतात, त्याबद्दल मुलांना मार्गदर्शन करतात आणि केवळ ‘मी म्हणतो म्हणून’ मधला ‘मी’ कधी ‘बाबा’ तर कधी ‘बाळय़ा’, कोणीही असू शकतो....
आणखी वाचा

‘वन कॉप, वन क्रिमिनल’

12 October, 2011 04:30:00 AM माजी पोलिस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांचा ‘मोहल्ला कमिटी’ तर डॉ. माधव सानप यांचा ‘एक गाव, एक गणपती,’ हे उपक्रम सरकारच्या उदासीन धोरणामुळे मरणासन्न अवस्थेत आहेत. मात्र, महिला व जेष्ठ नागरिकांचा विचार करून दिघावकर यांनी सुरू केलेल्या उपक्रमाला तिलांजली वाहण्याची वेळ येऊ नये. ‘वन कॉप, वन क्रिमिनल’ या उपक्रमात ‘वन कॉप बट, नो क्रिमिनल’ करण्याची ताकद आहे. तो भारतभर राबवला गेला पाहिजे. ...
आणखी वाचा

विशेष शाळांमधील शिक्षक वेतनाविना

11 October, 2011 04:30:00 AM पुणे आयुक्तालयातून त्यांचे वेतन पाठवले असल्याचे सांगितले जाते. मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याने वेतनाची रक्कम जाते कुठे, असा सवाल शिक्षक विचारतात, मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही. अनेक वेळा आंदोलने करण्यात आली. मात्र, आश्वासनांनंतरही कर्मचा-यांच्या समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत. ...
आणखी वाचा

स्वच्छ मुंबई, कुठली हो?

10 October, 2011 05:00:00 AM ‘हरित मुंबई, स्वच्छ मुंबई’च्या घोषणा अनेक वर्षापासून देऊनही ना मुंबई हरित झाली, ना स्वच्छ. महापालिकेने यासाठी जे प्रयत्न ते तोकडे पडले. मुंबईकरांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही....
आणखी वाचा

बदल्यांचे राजकारण, आरोपींच्या पथ्यावर

05 October, 2011 04:30:00 AM गुन्हेगार पुन्हा मोकाट फिरतात आणि गुन्ह्याचा आलेख वाढतच जातो. तर दुसरीकडे सरकारी अभियोक्तांच्या बदल्या करण्यासाठी आमदार-खासदारांच्या शिफारसी येत असल्यामुळे अभियोक्ता आणि राजकीय नेत्यांत ‘सेटिंग’ असल्याचेही उघडकीस आलं आहे....
आणखी वाचा

परिवर्तनाचे वारे

04 October, 2011 05:30:00 AM एखादी महिला गाडी चालवताना सापडल्यास तिला समज देऊन त्यासंदर्भात लेखी घेऊन सोडून दिलं जातं. परंतु सायमाला मात्र फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली....
आणखी वाचा

विकासात पर्यावरणाचा अडथळा .. नाहीच!

03 October, 2011 04:40:00 AM ओरिसातील खाणी असो की, नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळ, केंद्रीय पर्यावरण खात्याने गेल्या काही वर्षात अनेक विकासप्रकल्पांत खोडा घालून आर्थिक प्रगतीला खीळ बसवल्याची ओरड सातत्याने होत आहे. ग्लोबल वॉर्मिग, हरितसंरक्षण, प्रदूषण अशा अनेक कारणांखाली महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांना अडसर आणला जात आहे, असंही सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात तशी स्थिती आहे का? खरंच पर्यावरणविषयक मंजुरीविना विकासकामे रखडली आहेत का? की केवळ पर्यावरणाचा बाऊ करून मागल्या दाराने वेगळय़ा घटकांचा फायदा करून दिला जात आहे?...
आणखी वाचा

वसा ग्राहक शिक्षणाचा!

02 October, 2011 11:05:00 AM टी.व्ही. खरेदी करण्यासाठी ‘तो कसा बनवतात’ ते माहित नसले तरी चालेल. मात्र एक गोष्ट नक्की की टी.व्ही.घरात कुठे ठेवावा? घराचा/खोलीचा आकार आणि टी.व्ही.चा आकार यांचे प्रमाण कसे असावे? आपल्या खिशाचा आणि टी.व्ही.च्या किमतीचा मेळ कसा घालावा? सुलभ हप्ते कोणते व कसे निवडावेत? दुकानदार आणि उत्पादक कंपनीकडून कोणते कागदपत्र आपल्याला मिळायला हवेत? टी.व्ही.मध्ये कोणत्या सोयी आहेत, त्या कशा वापरायच्या? हे व यासारखे आणखी प्रश्न ज्याला पडतात, त्यालाच सुजाण ग्राहक म्हणता येईल. ...
आणखी वाचा

पेनाच्या ओरखड्यावरून मारेकरी जाळय़ात

28 September, 2011 04:30:00 AM मालाडमध्ये दिवसाढवळ्या 68 वर्षाच्या वृद्ध महिलेची हत्या झाली. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचं पोलिसांनी आश्वासन दिलं, मात्र आरोपींपर्यंत पोहोचण्याचा मार्गच मिळत नव्हता. अखेर, ज्यावेळेस पोलिसांना आरोपीची माहिती मिळाली त्यावेळी मात्र ते थक्क झाले. ...
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 342 | displaying: 61 - 70