PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: प्रहार ब्लॉग हरवलेल्या वैज्ञानिक ================================================================================ अमिता बडे on 10 January, 2012 05:30:00 AM आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, चिकाटीमुळे आणि कामात सातत्य राखण्याचे कौशल्य यामुळे महिला आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. असे कोणतेही क्षेत्र राहिलेले नाही जिथे महिलांनी आपला सहभाग नोंदवलेला नाही. असे असले तरी विज्ञान क्षेत्रात विशेषत: संशोधनाच्या क्षेत्रात महिलांचे प्रमाण अत्यल्प आहे. ‘स्मार्ट’ बँकेला मिळाला धडा ================================================================================ वसुंधरा देवधर on 09 January, 2012 10:30:00 AM 23 डिसें. 2005 ते 4 नोव्हें. 2008 या कालावधीन 2533 रु. 50 पैशांचे चक्क 21,866 रु. 77 पैसे झाले. म्हणजे तीन वर्षात सुमारे 9 पट झाली की रक्कम. कुठे बरं असा फायदा मिळतो? गुंतवणुकीचा हा पर्याय बँकेत आहे? कोणती ती योजना? वन्यजिवांच्या सुरक्षेसाठी प्राणी कल्याण पंधरवडा ================================================================================ अर्चना राणे on 09 January, 2012 06:00:00 AM सर्वच जीवसृष्टी धोक्यात आली, याचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतात गेल्या 47 वर्षापासून दरवर्षी 14 ते 31 जानेवारीदरम्यान ‘प्राणी कल्याण पंधरवडा’ पाळला जातो. रेल्वे सुरक्षा ‘रुळांवर’ कधी येणार? ================================================================================ रामराजे शिंदे on 04 January, 2012 07:30:00 AM सुदैवानं दोन्ही घटनांमध्ये काही गैरप्रकार घडले नाही. मात्र, काही अप्रिय घडलंच असतं तर, दोष कुणाचा? रेल्वे पोलिस आणि प्रशासन हे नेहमी एकमेकांना पाण्यातच पाहत आलेलं आहे. त्यामुळे या दोघांतला तिढा कधी सुटणार आणि रेल्वेची सुरक्षा रुळावर कधी येणार, हाच प्रश्न आहे. मालकाच्या मनमानीमुळे नोकरीवर कु-हाड ================================================================================ संजय जाधव on 03 January, 2012 05:30:00 AM कोणतीही पूर्वसूचना न देता दोन्ही कंपन्या एकाच दिवशी अचानक बंद केल्या. कंपनी बंद होऊन नऊ महिने पूर्ण झाले तरीही मालकाने कामगारांना वेतन वा थकित देणी दिलेली नाहीत. सध्या हे कामगार न्यायासाठी झगडत आहेत. 100 किंवा अधिक कामगार असलेली कंपनी बंद करायची असेल तर सरकारच्या संबंधित विभागाला नोटिस द्यावी लागते. शिवाय त्याची पूर्वसूचना कामगारांनाही देणे बंधनकारक आहे. मात्र, हा नियमच मालकाने धाब्यावर बसवला आहे. परीक्षा घेणे- वैधानिक कर्तव्य! ================================================================================ वसुंधरा देवधर on 01 January, 2012 12:30:00 PM काही वेळा विद्यार्थ्यांना परीक्षा क्रमांक, हॉल तिकीट किंवा रोल नंबर इ. मिळत नाही किंवा उशिराने मिळते. त्यावेळी ते विद्यार्थी परीक्षेला बसू शकत नाहीत. त्यांच्या शाळा किंवा कॉलेजात कितीही फे-या मारल्या किंवा शाळा/ महाविद्यालय यांनी बोर्डाकडे किंवा विद्यापीठाकडे चौकशा केल्या, तरी काही तरी निमित्त होते, विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जायची परिस्थिती निर्माण होते. वन्यप्राण्यांसाठी लढा.. ================================================================================ रामराजे शिंदे on 28 December, 2011 07:00:00 AM राज्यात प्रदूषणाच्या क्रमवारीत चंद्रपूर हे चौथ्या क्रमांकावरील शहर. येथे साडेतीनशेहून अधिक कंपन्या आहेत. कंपन्यांतील प्रदूषणामुळे आणि कंपनी मालकांच्या मुजोरीमुळे या प्रदूषणात वाढच होत आहे बालमृत्यू रोखण्यासाठी हवी संवेदनशीलता ================================================================================ अमिता बडे on 27 December, 2011 05:30:00 AM महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा सांगणा-या महाराष्ट्रात अशाप्रकारे कोवळी पानगळ सुरू राहणे फारसे भूषणावह नाही. कुपोषण आणि बालमृत्यू हे समीकरण विदर्भात विशेषत: अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये पाहायला मिळतं. डर्बनमध्ये आखली वाट.. ================================================================================ अर्चना राणे on 26 December, 2011 03:30:00 AM दोन आठवडय़ांपूर्वीच अवघ्या जगाने पुढील आठ वर्षासाठीचा पर्यावरणरक्षणाचा नवा संकल्प सोडला. दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झालेल्या जागतिक हवामान परिषदेत करण्यात आलेल्या नव्या ठरावामुळे पर्यावरणतज्ज्ञांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.. वीज मंडळाला झटका! ================================================================================ वसुंधरा देवधर on 25 December, 2011 11:24:00 AM 1986 साली 24 डिसेंबरला ‘ग्राहक संरक्षण कायदा’ पास झाला. घटनेला कालच 25 वर्षे पूर्ण झाली. या ग्राहकाभिमुख कायद्याच्या या रौप्यमहोत्सवी वर्षात अनेक कार्यक्रम झाले. दरवर्षी 24 डिसेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ म्हणून साजरा केला जातो. विविध संस्था तसेच शासकीय पातळीवरून केवळ दिवस साजरा करून ग्राहकांचे प्रश्न सुटणार नाहीत. जाणीव जागृती झाली, तरी प्रत्येक ग्राहक सक्षम होणे आवश्यक आहे. त्याला स्वत:चे हित कळेल आणि भूलभुलैयात न अडकता, तो योग्य ते खरेदीचे निर्णय घेईल, इतकी ताकद ग्राहकांना आली पाहिजे.