PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: प्रहार ब्लॉग पोलिसांना किती झोडपणार? ================================================================================ रामराजे शिंदे on 21 December, 2011 02:30:00 AM मुंबईची लोकसंख्या सव्वा कोटी. त्यासाठी 41 हजार मंजूर पोलिसबळ. पण प्रत्यक्ष डय़ुटीवर असणा-या पोलिसांची संख्या 33 हजार. त्यापैकी 13 हजारांचे मनुष्यबळ तर, वाहतूक नियंत्रण, नेत्यांची सुरक्षा आणि कैद्यांची न्यायालयात ने-आण करण्यासाठीच खर्ची पडतात. अन्यायाविरोधात कामगारांचा तीव्र लढा ================================================================================ संजय जाधव on 20 December, 2011 05:30:00 AM ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील एन्वायरो केअर या कंपनीतील कामगारांची अशीच सहनशीलता संपल्याने त्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाविरोधात संघर्ष सुरू केला आहे. मात्र, आंदोलनाच्या 50 व्या दिवसानंतरही व्यवस्थापन किंवा मालकाने कामगारांशी साधी चर्चा करण्याची तसदी घेतली नसल्याने कामगारांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्ट दिवाळखोरीच्या मार्गावर ================================================================================ सचिन धानजी on 19 December, 2011 03:30:00 AM बेस्टची परिवहन सेवा सध्या व्हेंटिलेटरवर आहे. दरवर्षी कर्जाचे ओव्हरड्राफ्ट घेऊन याला जीवनदान देण्याचे काम बेस्ट उपक्रम करत आहे. याला जेवढे प्रशासन जबाबदार आहे, तेवढेच आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधीही. ग्राहक कोण? ================================================================================ वसुंधरा देवधर on 18 December, 2011 05:30:00 AM 24 डिसेंबरला ग्राहक संरक्षण कायद्याला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र तरीही ‘ग्राहक कोण?’, या संदर्भात स्पष्टीकरण करण्याची गरज पडत राहते. त्याविषयी चर्चा, तसेच अगदी राष्ट्रीय आयोगापर्यंत मामला नेण्यात येतो. माहिती अधिकाराचे तीन तेरा.. ================================================================================ रामराजे शिंदे on 14 December, 2011 05:30:00 AM आपल्या हक्कांसाठीची माहिती आयुक्तांनाच माहिती अधिकारांतर्गत अर्ज करून मिळवावी लागली. आयएएस अधिकारी नॉन-आयएएस अधिका-यांना सेवा-सुविधा पुरवण्याबद्दल नाखूश आहेत. त्यातूनच एकमेकांना काटछाट करण्याचा प्रकार जोरदार सुरू आहे. घरीदारी...असुरक्षितताच! ================================================================================ अमिता बडे on 13 December, 2011 02:30:00 AM मुंबईची लाइफलाइन मानल्या जाणा-या लोकलमधील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधूनमधून निर्माण होत असतो. काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईत पहाटेच्या वेळी एका महिलेवर लोकलमध्ये कठीण प्रसंग गुदरला होता, त्यावेळी त्या महिलेने केलेल्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली नाही म्हणून न्यायालयाला दखल घ्यावी लागली होती. विम्यासाठी हवी खरी माहिती! ================================================================================ वसुंधरा देवधर on 11 December, 2011 03:30:00 AM जीवन विम्याचे छत्र घेण्याचा निर्णय जबाबदार व्यक्ती नेहमीच घेतात. त्यामागे विचार असतो तो आपल्या प्रियजनांच्या भरणपोषणाचा. मानवी आयुष्याला चिकटलेली आहे, अनिश्चितता. सहका-याची हत्या वर्गभेदातून ================================================================================ रामराजे शिंदे on 07 December, 2011 02:30:00 AM ताडदेव परिसरात म्हाडा इमारतीच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीत सांगाडा मिळाला. त्याच्या अवस्थेवरून तो दोन-तीन वर्षापूर्वीचा असावा. पण हा सांगाडा आहे तरी कोणाचा? हिंदुस्थान ब्रुव्हरिजच्या कामगारांवर कु-हाड ================================================================================ संजय जाधव on 06 December, 2011 03:30:00 AM सर्वच क्षेत्रात कंत्राटीपद्धत सुरू झाल्यामुळे मालक व कंत्राटदारांकडून शोषण वाढले आहे. असंघटित असल्यामुळे अन्यायाविरोधात त्यांचा आवाज सरकारी दरबारी पोहोचत नाही. महापालिका आयुक्त नेमके कुणाचे? ================================================================================ सचिन धानजी on 05 December, 2011 05:30:00 AM उत्तम प्रशासक, कडक स्वभाव पण शिस्तप्रिय अशी ओळख असलेल्या महापालिका आयुक्त सुबोध कुमार यांच्याकडून मुंबईकरांच्या काही अपेक्षा आहेत. लोकांच्या अपेक्षेनुसार सुबोध कुमारांनी कार्यपद्धती स्वीकारली असली, तरी त्यामुळे लोकांचे समाधान झाल्याचे दिसून येत नाही.