PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: प्रहार ब्लॉग पोटात राहिला ‘गॉझ’चा तुकडा ================================================================================ वसुंधरा देवधर on 11 December, 2011 07:30:00 AM या महिन्यात 24 तारखेला ‘ग्राहक संरक्षण कायदा’ अमलात येऊन 25 वर्षे होतील. गेल्या पंचवीस वर्षामध्ये जे विविध निर्णय आले, त्यामुळे ग्राहकांच्या हिताचे रक्षण होण्यास आणि सेवा पुरवठादारांना अधिक जबाबदार बनवण्यास नक्कीच हातभार लागला आहे. पोलिसांवर ‘माया’ कोणाची ================================================================================ रामराजे शिंदे on 30 November, 2011 04:30:00 AM नागरिकांनी कायद्यानुसारच वागण्याचा वटहुकूम पोलिसांचा असतो. पण, तेच नियम मात्र स्वत:ला नकोसे असतात. कायद्याने वागण्याची भाषा करणारेच पोलिस प्रत्यक्षात किती बेकायदा कामे करतात, याचा उलगडा एका छोटय़ाशा प्रकरणातून झाला. महापालिकेत महिलांना फर्स्ट क्लास! ================================================================================ अमिता बडे on 29 November, 2011 02:30:00 AM सर्व निकषांतूनच महिलांच्या कामगिरीची सरासरी 60 टक्के आणि पुरुषांच्या कामगिरीची सरासरी मात्र 58 टक्के असल्याचे दिसून आले आहे. महापालिकेच्या कामकाजात महिलांनी फर्स्ट क्लास मिळवल्याचेच स्पष्ट होते. महिलांना राजकारण जमत नाही किंवा राजकारणासाठी आवश्यक असलेली पात्रता महिलांच्या अंगी नसते, असं म्हणणा-यांना ही चपराकच आहे. फक्त 50 रुपयांसाठी.. ================================================================================ वसुंधरा देवधर on 27 November, 2011 08:30:00 AM बूट बदलून चपला घेतल्या; पण किमतीतला फरक परत नाही दिला. मग ग्राहक म्हणून जिल्हा पंचायतमध्ये जाता येतं की काही? या प्रश्नाचा पाठपुरावा अगदी राष्ट्रीय आयोगापर्यंत, दिल्लीपर्यंत केला तो लल्लन कुमार यांनी. भ्रष्टाचारावर पोलिस आयुक्तांचा उतारा ================================================================================ रामराजे शिंदे on 23 November, 2011 01:30:00 AM दोन-तीन महिन्यापासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांना गती आल्याचे दिसून येत आहे. पोलिसांपासून ते विक्रीकर आयुक्त, पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांचीही यातून सुटका झालेली नाही. दूध वितरक असुरक्षितच ================================================================================ संजय जाधव on 22 November, 2011 05:30:00 AM पहाटे घरोघरी किंवा हॉटेल व डेअरींमध्ये अनेक समस्यांना तोंड देत वेळेवर न चुकता सुरक्षितपणे दूध पोहचवणारा वितरक आजही असुरक्षितपणे काम करत आहे. सुधारित मालमत्ताकर प्रणालीला मुहूर्त नाहीच ================================================================================ सचिन धानजी on 21 November, 2011 03:30:00 AM मुंबई महापालिकेच्या सुधारित मालमत्ताकर आकारणीला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. पालिकेच्या महसुलात भर टाकणा-या कराची अमलबजावणी करण्याची इच्छा तुर्तास तरी सत्ताधारी पक्षाची दिसत नाही. जाब विचारा, नियमभंग करणा-यांना ================================================================================ वसुंधरा देवधर on 20 November, 2011 11:00:00 AM अहो ज्या अमेरिकेकडे बरेच भारतीय ‘आदर्श’ म्हणून बघतात तिथे ही ‘बनावट विद्यापीठे’ आहेत. इतकेच नव्हे तर ती परदेशी विद्यार्थ्यांची फसवणूक करतात, असेही उघडकीस आले आहे, तशा बातम्याही वृत्तपत्रांमधून वाचनात येत आहे. तेव्हा देश असो की परदेश, चांगले शिक्षण घेण्यासाठी उत्सुक विद्यार्थी व त्या शिक्षणासाठी शक्य ते सर्व करायला तयार असणारे पालक, यांनी सावध असणे फार जरूर आहे. ख-या इतिहासाचा ‘इतिहास’.. ================================================================================ रामराजे शिंदे on 16 November, 2011 05:30:00 AM पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला खरी माहिती दिली जाते, असा समज अजूनही जनमानसात आहे. पण, बालभारतीच्या चुकीमुळे लोकांच्या विश्वासाला तडा गेला. चौथीच्या मुलांच्या पुस्तकाते शिवछत्रपतींचा खोटा इतिहास मांडण्यात आला होता. दादोजी कोंडदेव हेच शिवाजी महाराजांचे गुरू आहेत, असा समज आतापर्यंत रूढ झाला होता. सरकारच्याच बालभारतीसारख्या संस्थेनं कोणतीही पडताळणी न करता, कित्येक वर्ष हा खोटा इतिहासच शिकवला. मात्र, माहिती अधिकाराच्या एका अर्जामुळे बालभारतीच्या खरा इतिहास बाहेर आला. बाई हरवते तेव्हा.. ================================================================================ अमिता बडे on 15 November, 2011 04:00:00 AM हरवणा-या व्यक्तींचे काय होते, या प्रश्नाचे उत्तर सहजासहजी देता येत नाही. प्रत्येक हरवलेल्या व्यक्तीचा शोध लागतोच असे नाही. पोलिसांकडे इतक्या जबाबदा-या असतात की, अशा हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न फारसा होत नाही.