पहिले पान | प्रहारचे उपक्रम | ‘क्रिसलीस’ महोत्सव निर्मितीचा

‘क्रिसलीस’ महोत्सव निर्मितीचा

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image Facebook this storyFacebook this story

‘क्रिसलीस’ म्हणजे सुरवंटाचं फुलपाखरात रूपांतर होण्यापूर्वीची अवस्था. निर्मितीची अवस्था! कॉलेज जीवनही असंच असतं. इथे सगळेच बाहेरच्या जगाविषयी अनभिज्ञ असतात. सारं काही आत्मसात करत आपल्यातील सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याची हीच वेळ. ‘क्रिसलीस’ हा असाच निर्मितीचा महोत्सव!

मध्य रेल्वेने ठाणे स्टेशन क्रॉस केलं की ट्रेनमधूनच भल्यामोठ्या निसर्गरम्य आवाराचं जोशी-बेडेकर कॉलेज आपलं लक्ष वेधून घेतं. व्वा काय मस्त कॉलेज आहे!असे उद्गार आपल्या तोंडातून आल्याशिवाय राहत नाहीत. पण या कॉलेजमध्ये जायचं कसं? साधारणपणे कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी कॉलेज फेस्टिवलचा चान्स असतो, मात्र सध्या बहुतेक कॉलेजेसमधले फेस्टिवल्सही संपले आहेत. म्हणजे आता पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागणार. बट डोन्ट वरी! निराश होण्याचं अजिबात कारण नाही. कारण जोशी-बेडेकरमध्ये नुसता प्रवेशच नाही तर तिथे होणा-या फेस्टिवलमध्ये भाग घेण्याची नामी संधी तुमच्याकडे चालून आली आहे. तुमच्या कलागुणांना भरपूर वाव देणारा, जोशी-बेडेकरचा क्रिसलीस १०येत्या २१-२३ जानेवारी दरम्यान होणार असून त्यात तुम्हाला भाग घेता येणार आहे. आणि त्यानिमित्ताने या कॉलेजमध्ये पाऊल ठेवायची संधी मिळणार आहे.

  फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

क्रिसलीस म्हणजे सुरवंटाचं फुलपाखरात रूपांतर होण्यापूर्वीची अवस्था. म्हणजेच निर्मितीची अवस्था. कॉलेज जीवन ही अशीच एक अवस्था. कॉलेज जीवनात आपण सगळेच बाहेरच्या जगाविषयी अनभिज्ञ असतो. शक्य ते सारं काही आत्मसात करत आपल्यातील सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याची हीच वेळ असते. याच प्रकारची निर्मितीशीलता कॉलेजमध्ये होणा-या इव्हेंट्समधून दाखवण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. म्हणूनच सेल्फ फायनान्स कोर्सच्या फेस्टिवलचं नाव विद्यार्थ्यांनी क्रिसलीस १०असं ठेवलं आहे. बी.एस.सी.आय.टी., बी.एम.एस., बी.एम.एम., बँकिंग अँड इन्शुरन्स, अकाऊंट अँड फायनान्स, फायनान्स मार्केटिंग अशा विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या फेस्टिवलचं आयोजन केलं आहे. या अनोख्या फेस्टिवलची थीमही मुंबई मेरी जानअशी असून त्यानुसार इथे विविध कार्यक्रम होणार आहेत. या थीममध्ये चपखल बसणारं एक उदाहरण म्हणजे डबेवाले’. मुंबईचा अविभाज्य घटक असलेले डबेवाले म्हणजे व्यवस्थापनाचा एक नमुनाच म्हणता येईल. म्हणूनच गेट वे टू प्रोफेशनलिझमया मॅनेजमेंटवर आधारित इव्हेंटमध्ये मॅनेजमेंटया विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डबेवाले संघटनेचे प्रतिनिधी शिवराज दळवी यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. मैदाने जंग’, ‘कॅम्पस मॅरेथॉन-मुंबई रफ्तार’, ‘ट्रेझर हंट-कॅम्पस खोज’, ‘सर्कल क्रिकेट’, ‘फुटबॉल’, ‘एमिंग टायर’, ‘हॉप पिक रन’, ‘ब्लॅक वर्सेस व्हाइट’, ‘थ्रू अँड क्रिस्ट’, ‘क्विझिंग आइनस्टाइन’, ‘ब्रेन टिझर’, ‘फिल्मी मेला’, ‘सुडोकुतसंच पूर्णत: सांस्कृतिक कार्यक्रमांना वाहिलेल्या हॉट स्टेपर’, ‘डान्स मॅनियाआणि फॅशन स्ट्रीटया इव्हेंट्सचा समावेश फेस्टिवलमध्ये आहे. मैदान-ए-जंग’, ‘कॅम्पस मॅरेथॉन-मुंबई रफ्तार’, ‘ट्रेझर हंट-कॅम्पस खोज’, ‘सर्कल क्रिकेट’, ‘फुटबॉलया स्पोर्ट्सवर आधारलेल्या स्पर्धा आहेत. एमिंग टायर’, ‘हॉप पिक रनया दोन इव्हेंट्समध्ये भरपूर एक्साइटमेंट अनुभवता येईल. एका टायरमधून बॉल टाकायचा आहे. पण त्या बॉलचा स्पर्श मात्र टायरला होता कामा नये. या प्रकारचं फन एमिंग टायरमध्ये अनुभवायला मिळेल. ब्लॅक अँड व्हाइटया नावावरून वेगळ्या वाटणाऱ्या इव्हेंटचा संबंध कॅरम या खेळाशी आहे.

 

जरा बोलके दिखाओही कॅचलाइन थ्रू अँड क्रिस्टया वक्तृत्व स्पर्धेची आहे. सोचो तो जराही क्विझिंग आइनस्टाइनम्हणजेच क्विझवर आधारित स्पर्धा असणार आहे. एखाद्याला गोंधळात टाकणं ही साधी गोष्ट नाही. पण काही प्रश्न असे असतात की त्यांची उत्तरं तुम्हाला सहजासहजी मिळत नाहीत, तेव्हा पूर्ण ब्लँक व्हायला होतं. असेच काहीसे प्रश्न विचारून भंडावून सोडणारा क्विझ इव्हेंट म्हणजे ब्रेन टिझर’. त्याचप्रमाणे कल्पनाशक्तीला चालना देणा-या आणखी एका इव्हेंटचा समावेश केला असून फिल्मी मेलाअसं त्या इव्हेंटचं नाव आहे. यात दोन जणांचा एक ग्रूप तयार करून त्यांना एक विषय देण्यात येईल. त्या विषयानुसार स्पर्धकांना एक छोटीशी फिल्म तयार करायची आहे. स्वत:ची क्रिएटिव्हिटी आजमावण्याची पुरेपूर संधी ही स्पर्धा देणार आहे.

 

मीडिया हा सेल्फ फायनान्सच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा विषय आहे. विद्यार्थ्यांना मीडियाविषयी अनेक प्रश्न पडलेले दिसतात. या फेस्टिवलदरम्यान मीडियावर आधारित त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी झी चोवीस तासचे बिझनेस हेड आणि व्हाइस प्रेसिडंट भूषण खोत, तसंच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

पॉप म्युझिक असो की फोक म्युझिक हिंदी असो, मराठी असो की इंग्रजी.. गाणं कोणतंही असो, त्या तालावर पाय थिरकणं हे महत्त्वाचं. म्युझिकच्या तालावर स्पर्धकांबरोबर प्रेक्षकांनाही थिरकायला लावणा-या डान्स इव्हेंट्सविषयी सगळ्यांनाच उत्सुकता असते. हॉट स्टेपरआणि डान्स मॅनियाया अनुक्रमे सोलो आणि ग्रूप डान्सच्या स्पर्धा असून त्या फेस्टिवलच्या तिस-या दिवशी होणार आहेत. या दिवसाचं आणखी एक आकर्षण म्हणजे रिंगा रिंगाया आगामी मराठी चित्रपटाचे टीम मेंबर अंकुश चौधरी आणि संतोष जुवेकर हे अभिनेते फेस्टिवलमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांच्यासमवेत भरपूर मजा-मस्ती करता येईल. एरवी फॅशन स्ट्रीट म्हटलं की लगेच डोळ्यांसमोर येतं ते चर्चगेट स्टेशनपासून थोड्या अंतरावर असलेलं लेटेस्ट फॅशन ट्रेंड्सचं मार्केट. हे लेटेस्ट फॅशन ट्रेंड्स जोशी-बेडेकरच्या कॅम्पसमध्ये फॅशन स्ट्रीटया फॅशन शोमध्ये, बघायला मिळतील.

 अशा या भरपूर इव्हेंट्सचा समावेश असलेल्या, सेलिब्रेटींबरोबर धमाल करता येईल अशा तीन दिवसांच्या फेस्टिवलला जरूर भेट द्या. आपलं कौशल्य पणाला लावून भरघोस बक्षिसं मिळून दाखवा.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0