ग्रहांचे भाकीत
पाच फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 2012
| मेष : क्रीडाक्षेत्र गाजवाल शुक्र-शनी उच्चीचे झालेले असताना तुमची राशी चार-चार ग्रहांना दिग्बल प्रदान करते. यातच चालू सप्ताहातील तुमच्या कीर्तीयोगाची निश्चिती अधोरेखित होते. या योगांचे अजीर्ण न होऊ देता ते पचनी पडण्यासाठी राजनैतिक, व्यावसायिक, सामाजिक आणि कौटुंबिक संवाद धोरणी, अर्थपूर्ण आणि सामंजस्याचे होणे आवश्यक आहे. स्थावराच्या बांधकामास वेग येईल. यंत्र आणि तंत्राच्या अध्ययनात विद्यार्थीवर्ग बराच पुढे गेलेला असेल. क्रीडाक्षेत्र गाजवाल. |
| वृषभ : कष्ट वाढतील तुमच्या राशीच्या भाग्यातील रविबुध युती राजयोगकारक होताना ती राशीस्थानच्या केतूशी नवपंचम योग करते. त्यामुळे सनदी लेखा, औषधनिर्माण शास्त्र, कायदा यातील विद्यार्थ्यांचा उत्कर्ष होईल. घरदार, जमीनजुमला यांची खरेदी होईल. तुमच्या रासायनिक उत्पादनांच्या प्रभावी जाहिरातींमुळे त्यांची विक्री वाढेल. खर्च सत्कारणी लागेल. नोकरीत बढती मिळेल, पण कष्टही वाढतील. नकला, अभिनयाचा सराव कराल. बुद्धिबळाचा छंद जोपासाल. |
| मिथुन : भावंडांचे सहकार्य राशीस्वामी संवादकारक बुध राशीपासूनच्या दु:स्थानात अस्तंगत होऊन महत्त्वाची बोलणी लांबणीवर पडतील. विद्यास्थानातील व्यापारी राशीत संशोधक शनी उच्चीचा; तर विद्यास्थानेश शुक्र उद्योगस्थानात उच्चीचा, हर्षलच्या युतीत. त्यामुळे वकिली व्यवसायात उत्कर्ष; तर वकिली शिक्षणात उन्नती होईल. हॉटेल व्यवसायाची भरभराट होईल. सौंदर्यप्रसाधनात नवे उत्पादन विकसित कराल. ज्ञानात परिपक्वता येईल. भावंडांचे सहकार्य मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह जमतील.
|
| कर्क : अनारोग्य संभवते राशीस्वामी चंद्राची योगकारक मंगळाबरोबरील युती धनस्थानात भाग्येश गुरुने दृष्ट होऊन लक्ष्मीयोग अधिकच बलवान होईल. भाग्योदयकारी घटना घडतील. पुराणमतवाद आणि सुधारणावाद हे दोन्ही पक्ष कुटुंबापासून तर राजकारण समाजकारणापर्यंत आपापल्या जागी असतील. प्रवास लाभदायक होतील. चित्रकला, फोटोग्राफी, आर्किटेक्चर यात प्रावीण्य मिळवाल. टीकात्मक वक्तृत्व कराल. अपचन आणि गॅसेसमुळे अनारोग्य संभवते. |
| सिंह : मौलिक भेटवस्तू तुमच्या सत्ताकारक राशीस्वामी सत्ताकारक रवि सेवादर्शक स्थानी धनेश-लाभेश संवादकारक बुधाच्या युतीत असताना विद्यादर्शक स्थाने प्रतियोगातील विद्याकारक गुरु-शनीने दृष्ट होतात. त्यामुळे दूरसंचार सेवा अधिक अत्याधुनिक होऊन सेवांच्या गुणवत्तेची कदर होईल. न्यूनगंड तुम्ही कसा झटकता यावर तुमची निवड निर्भर राहील. विदेशवारी होईल. मौलिक भेटवस्तू प्राप्त होतील. उच्चारशुद्धी आणि पॉझेस यांचा सराव करावा. |
![]() | कन्या : अभ्यासपूर्ण गुंतवणुकी तुम्हाला आनंदाची बातमी समजेल. पण त्यामुळे हुरळून जाऊ नका. सर्जन आपल्या शस्त्रक्रिया त्यांच्या पूर्ण गुणवत्तेने करतील. पराक्रमातील राहू राशीस्वामी बुधाच्या लाभयोगात पराक्रमेश मंगळाने दृष्ट होऊन नोकरीत महत्त्वाचे स्थान प्राप्त कराल. भाषा शुद्धी जपा; अनर्थ टाळा! अभ्यासपूर्ण गुंतवणुकी कराल. कायदा, कला, वाणिज्य, फोटोग्राफी चित्रकला, तर्कशास्त्र यांचे अध्ययन कराल. नेत्रांची निगा राखावी. |
| तूळ : नोकरीत आनंदी चालू साडेसातीत शनी तुमच्या राशीस उदरी आला असताना गुरु-शनी- रवि-चंद्राला दिग्बल प्राप्त नसल्यामुळे ग्रह तुम्हाला चालू सप्ताहात काहीही देणार नाहीत. मात्र प्रयत्न, गुणवत्ता, न्याय आणि सचोटीने होणार असलेला अमाप संपत्तीयोग अंगी लावून घेता येईल. नोकरीत आनंदी असाल. क्वचित प्रसंगी नवी नोकरी पण चालून येईल. ‘स्वच्छता’ हा तुमच्या आरोग्याचा मंत्र असेल. औषधे डॉक्टरी सल्ल्यानेच घ्या. |
| वृश्चिक : रक्तशुद्धी जपा राशीस्वामी मंगळ उद्योगस्थानात मित्रक्षेत्री मित्रग्रह गुरुने दृष्ट होत असता भाग्येश मित्रग्रह चंद्राचे भ्रमण सप्ताहमध्यावर मंगळावरून होते. अशा वेळी विद्यास्थानातले शुक्रहर्षल उद्योगात, तसेच मानववंशशास्त्रात, प्रयोगशाळेत नवा विचार करतील. नाटय़ाभिनय आणि आवाज वैशिष्टय़े हे गुण वृद्धिगंत होतील. लाभेश बुध धनाच्या धनात, रवियुतीत येऊन तुमच्या उद्योगाचे जगत स्थिर राहील. रक्तशुद्धी जपा आणि चालण्याचा व्यायाम करावा. |
| धनु : गृहसंपादन कराल भाग्येश रवि धनात, उद्योगस्थानेश बुधाच्या युतीत असतांना धनेश शनी लाभात व्यापारी राशीत उच्चीचा होऊन राशीस्वामी गुरुच्या प्रतियोगात येतो. त्यामुळे बसल्या बसल्या फोनवरून बाजार उलाढाली कराल. मर्कण्टाईल लॉ, तत्त्वज्ञान, वैद्यकशास्त्र, एक्स रे, टेक्निशियन यातील विद्यार्थ्यांचा उत्कर्ष होईल. पुत्रांची प्रगती होईल. क्रीडाक्षेत्र गाजवाल. गृहसंपादन कराल. वक्तव्य झोंबणार नाही याची काळजी घ्यावी. आप्तेष्टांचे सहकार्य मिळेल. |
| मकर : नोकरीत वरच्या जबाबदा-या तुमच्या अधिभौतिक आणि अर्थतत्त्वाच्या राशीचा स्वामी शनी उद्योगस्थानात व्यापारी राशीत उच्चीचा होऊन गुरुच्या प्रतियोगात आणि शुक्र-हर्षलच्या षडाष्टकात आल्यामुळे ‘उत्तम’ स्वार्थासाठी ‘उत्तम’ परमार्थ कराल. समस्त मानवजातीचे जीवन सुसह्य करण्यासाठी तंत्र शोधाल. भाग्य उदयास येईल. त्यासाठी बरीच धावपळ होईल. विवादास्पद तंटे मिटून लाभ होतील. नोकरीत वरच्या जबाबदा-या येऊन पडतील, बद्धकोष्ठतेचा त्रास संभवतो.
|
| कुंभ : धनलाभ होतील तुमच्या प्रगल्भ राशीचा स्वामी मर्यादशील शनी भाग्यात उच्चीचा होऊन वाचास्थानातील उच्चीच्या शुक्राच्या आणि हर्षलच्या षडाष्टकात आणि वाचास्थानेश गुरुच्या प्रतियोगात असताना वक्तृत्वकारक बुध व्ययात अस्तंगत होतो. त्यामुळे भाषेला किती भरकटत न्यायचे या संदर्भात मार्गदर्शन कराल. प्रबोधन कराल. प्रलंबित योजना मार्गी लागतील. विवादास्पद परिस्थितीत योग्य निर्णय घ्याल. कल्पनाशक्ती आणि संशोधक वृत्ती वृद्धिगंत होईल. धनलाभ होतील. जलजन्य आजारांपासून जपावे. |
| मीन : तीर्थयात्रा घडतील तुमच्या राशीपासूनचा धनेश भाग्येश मंगळ रिपुस्थानात उद्योगस्थानेश गुरुने दृष्ट होत असतांना तो सहजस्थानेश शुक्राच्याही प्रतियोगात येतो. त्यामुळे मार्केटिंग आणि उद्योग-व्यवस्थापन यांच्या अध्ययनातून उत्कर्ष होईल. सुरक्षा आणि सुव्यवस्था या क्षेत्रात तुमच्या धडाडीची प्रशंसा होईल. नेपत्थ्य आणि वेशभूषा या सेवांमधील योगदानाने कलाक्षेत्राला यश प्राप्त करून द्याल. क्रीडाक्षेत्र गाजवाल. तीर्थयात्रा घडतील. आरोग्य उत्तम राहील. |
















Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा