पहिले पान | रिलॅक्स | पुन्हा कट्यार पुन्हा खाँसाहेब

पुन्हा कट्यार पुन्हा खाँसाहेब

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image

वसंतराव देशपांडेंनी अजरामर केलेली ‘कटय़ार.’मधली खॉंसाहेब ही भूमिका आता त्यांचा नातू राहुल देशपांडे साकारत आहे. ‘वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान’तर्फे रंगमंचावर येणारं तरुण संचातलं ‘कटय़ार काळजात घुसली’ हे नाटकही संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल.

कटय़ार काळजात घुसलीहे नाटक २४ डिसेंबर १९६७ रोजी सर्वप्रथम रंगमंचावर आलं. डॉ. वसंतराव देशपांडे आणि त्यांच्यानंतर चंद्रकांत लिमये यांनी खाँसाहेबसाकारले होते. सदाशिवची भूमिका प्रसाद सावकार आणि त्यानंतर प्रकाश घांग्रेकर यांनी केली होती. पहिल्या प्रयोगानंतर ४३ वर्षांनी पुण्यात कट्यारपुन्हा अवतरलं, तेही संपूर्ण तरुण तुर्काच्या संचात. या नाटकाच्या पुनर्जन्माचा योगही अजबच.

 

जुलै २००९मध्ये फिलाडेल्फिया इथं भरलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात सुबोध भावे आणि राहुल देशपांडे यांची भेट, हे या नाटकाच्या पुनर्जन्माचं निमित्त ठरलं. राहुलच्या विनंतीवरून सुबोधनं या नाटकात काम करायचं मान्य केलं. त्यानं हे संगीत नाटक यापूर्वी पाहिलं नव्हतं, कामाचा अनुभवही नव्हता. स्क्रिप्ट वाचल्यावर सुबोधला या नाटकाचा आवाका लक्षात आला. सुखद धक्का बसावा, अशी दिग्दर्शनाची जबाबदारीही सुबोधवर पडली आणि वर कविराज ही भूमिकाही.  खाँसाहेबअर्थातच राहुल देशपांडे साकारणार होता. राहुल-सुबोध या द्वयीला सदाशिवसापडला महेश काळेच्या रूपाने. महेश हा पंडित जितेंद्र अभिषेकींचा शिष्य. गुरुजींनी संगीत दिलेल्या नाटकात काम करणार का, अशी विचारणा होताच त्यानं चटकन होम्हटलं. राहुलच्या पत्नीने, नेहाने त्याची बहीण दीप्ती माटे हिला झरीनाया व्यक्तिरेखेसाठी तयार केलं. रवी बापट झाले दीवाण’, अमेय वाघ हा तरुण नट बनला उस्मान’, तर सौरभ कारगावकर झाला चाँद’. आशाताई खाडीलकरांची मुलगी वेदश्री ओक हिने उमासाकारली.

 या सगळ्या तरुण कलावंतांनी नाटकाची निर्मिती करताना आपापसातच काही पथ्यं पाळली. त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं पथ्यं म्हणजे राहुलनं त्याच्या आजोबांनी म्हटलेली या नाटकातली पदं न ऐकणं. हा आग्रह सुबोधनं धरला आणि त्याला राहुलनं होकारही दिला. कारण त्यामुळे आजोबांच्या सुरावटीचा प्रभाव नकळत राहुलवर पडला असता. मात्र वसंतरावांचा नातूच खाँसाहेबसाकारणार आहे, हा भावनिक धागा या नाटकाच्या यशस्वितेसाठी फार महत्त्वाचा ठरला आहे. राहुलच्या मनात अनेक दिवस संगीत नाटक करायचं होतं. मग कटय़ारच का करू नये? असं त्याच्या मनानं घेतलं. पण इथं त्याच्या डोक्यात आणखी एक भन्नाट कल्पना आली, आग्रहच होता म्हणा ना- तो असा की, त्याला या नाटकाचं दिग्दर्शन बुजुर्गाकडून करून घ्यायचं नव्हतं. राहुलला अशी टीम हवी होती की, जिनं कटय़ारकधीच पाहिलेलं नाही! राहुलनंही आजोबांचं, वसंतरावांचं काम प्रत्यक्ष पाहिलेलंच नव्हतं. मग त्यातून आधी वर्णन केलेली सगळी माणसं त्यानं जमवली. नाटकात खाँसाहेब आणि सदाशिव या दोन व्यक्तिरेखा महत्त्वाच्या आहेत. सदाशिवचं आव्हान महेश काळेनं लीलया पेललंय. इथं पुन्हा या टीमनं एक नवा विचार केला. सुबोधनं हे नाटक वाचलं तेव्हा त्याला जाणवलं की, या नाटकाचा हिरो खाँसाहेब नाहीत तर, सदाशिव आहे! दोन संगीत घराण्यांचा संघर्ष, एका घराण्याची संगीतविद्या दुस-या घराण्याला न देणं, विद्या चोरून ठेवणं या सगळ्या अपप्रवृत्तींवर हे नाटक भाष्य करतं. असं असेल तर मग खाँसाहेबांइतकंच सदाशिवलाही महत्त्व द्यावं लागेल, या मुख्य विचारानं नायकाची पुनर्बांधणी सुरू झाली. महेशने सदाशिवच्या भूमिकेतून अभिषेकी बुवांच्या संगीताचा प्रभावी आविष्कार पेश केला आहे.4 फेब्रुवारीला या नाटकाचा पहिला प्रयोग पुण्यात यशवंतराव चव्हाण सभागृहात वसंतोत्सवाच्या निमित्ताने झाला. अर्थात वेळेचं गणित जुळवण्यासाठी मूळ कटय़ारदोन अंकांत रूपांतरित करावं लागलंय. म्हणूनच पंडित- सदाशिव हा गुरूशिष्य संबंध दाखवणारे प्रवेश आणि दिन गेले भजनाविण सारेहे पद गाळावं लागलं आहे.  कलासाधका तूच विधाता, प्रतिभेचे सुखधाम, हे नंदलालअसं म्हणत या सर्वानी कटय़ारसाकारलंय. खाँसाहेबांचं काम पाहताना सदाशिवलाही महत्त्व दिल्याचं सुजाण प्रेक्षकाच्या लक्षात आलंय. इथंच या नाटकाचं यश आहे, असं म्हणावंसं वाटतं. या भवनातील गीत पुराणेअसं म्हणताना हवा नवा तो नूरया ध्यासानं कटय़ारकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन या नाटकानं दिलाय. त्यामुळेच हे नाटक पाहताना आपल्या मनातल्या डॉ. वसंतराव देशपांडेंनी साकारलेल्या खाँसाहेबांना धक्का लागत नाही. तरीही राहुलनं साकारलेले खाँसाहेब मनात ठसतात. तूच स्वरेश्वर, तू लयभास्करअसं म्हणत प्रसाद सावकार यांनी साकारलेला सदाशिव कुठंच पुसला जात नाही. अन् तरीही महेश काळेचा सदाशिव सुस्थापित होतो. तसंच फैयाज यांची लागी करजवाँ कटारम्हणणारी झरीना अमर राहतानाही दीप्ती माटेची झरीनाही लक्षात राहाते. राहुलचे वडील आणि वसंतरावांचे पुत्र विजय देशपांडे यांना, या मुलांवर देवानंच अभिजात संगीत आणि संगीत नाटक पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची जबाबदारी टाकली आहे, असं वाटतं ते यामुळेच. 

लेपल माईकवरची नाट्यपदं

 मराठी रंगभूमीवर काँपॅक्टसंगीत नाटकांची लाट आणण्याची सुरुवात करण्याबरोबरच या नाटकात मराठी रंगभूमीवर प्रथमच लेपल माईकचा वापर करण्यात आला आहे. यामुळे कलावंतांचा दमसास टिकून राहण्यास आणि संपूर्ण नाटक उत्साहात करण्यास मदत मिळत आहे. कलावंतांना नाटय़पदं म्हणताना अकारण ओरडावं लागू नये, यासाठी हा प्रयोग करण्यात आला आहे. यामुळे गायनाबरोबरच अभिनयही सहजसुंदर होण्यास मदत मिळाली आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0