पहिले पान | रिलॅक्स | मेंडोलिनमध्ये लीन

मेंडोलिनमध्ये लीन

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

वादन आणि स्वभाव हे दोन्ही मधाळ असलेल्या किशोर देसाई यांचं मॅचिंग कोणत्याही वादक, संगीतकार वा गायक-गायिकेसमवेत सुरेलच होई. साठ वर्षाच्या त्यांच्या मेंडोलिन वादनाच्या करिअरमध्ये त्यांचा कुठेही, कधीही संघर्ष झाला नाही.

संगीतात अनेक वाद्यांच्या गुणधर्माचं संबोधन हे त्यांच्यातून निर्माण होणा-या साउंडवरून केलं जातं. ढोल म्हटल्यावर ढम्.. ढम्’, इलेक्ट्रिक गिटार म्हटल्यावर टय़ॉँव.. टेडेट्टे.. टय़ॉँव’, ब्रास म्हटल्यावर फोफ्फो.फॉँइत्यादी. तसं फिल्म सॉँग रेकॉर्डिग फॅक्टरीतल्या वाद्ययंत्रांच्या ताफ्यात स्ट्रींग्ज इंस्ट्रमेंट्सच्या कॅटॅगरीत ल्यूटफॅमिलीतलं कीर्ती महान असलेलं पण लहानसं एक वाद्य आहे. गिटारच्या तुलनेत ते आकारानं जरा टिंगूच आहे. त्याचा साउंडही टिंग..टिंगनीच हेरला जातो. मोठ्या स्टेज शोजमधूनही हे जेव्हा वाजतं त्यावेळी ढॅँ..ढॅँ..करणारी राक्षसी वाद्यंही ज्याच्या सौम्यतेचा व कर्णमधुरतेचा आदब राखून गप्प राहतात ते वाद्य मेंडोलिन’. फिल्म संगीताच्या इतिहासात मेंडोलिन ज्या-ज्या गाण्यांत वाजलंय ती हमखास पॉप्युलर झालीयत अशी फॅक्टही आहे. संगीतकार सज्जाद हे प्रख्यात मेंडोलिन वादक होते व आजही त्यांच्या नावाला सलाम केला जातो. जुन्या काळातले उल्लेखनीय मेंडोलिन वादक म्हणून परशुराम (अमर हळदीपूरचे वडील) व आयझॅक डेव्हिड ही नावं आवर्जून घेतली जातात. पाठोपाठ लक्ष्मी-प्यारे जोडीपैकी लक्ष्मीकांत हे नाव ते संगीतकार होण्यापूर्वी व झाल्यानंतरचाही काही काळ एक उत्कृष्ट मेंडोलिन वादक म्हणून प्रसिद्ध आहे.

 

शंकर-जयकिशनच्या एंट्रीच्याच बरसातमधल्या एकाहून एक हिट गाण्यांच्या धुवांधार वर्षावानंतर आवाराच्या घर आया मेरा परदेसीच्या धूननं सगळय़ा जगाला मेंडोलिनचं वेड लावलंय ते कायमचंच. जसं ग्रूप व्हायोलिन्स किंवा पियानो अ‍ॅकॉर्डियनच्या लाजवाब वापराचं ग्रॅँड प्रदर्शन म्हणजे केवळ शंकर-जयकिशन हे समीकरण समजलं जाई त्यात तितक्याच ठोसपणे मेंडोलिनचंही नाव घेता येईल.

 

आवाराच्याच काळात मर्फीया रेडिओ कंपनीनं एक संगीत स्पर्धा आयोजित केली होती. तिच्यात एका मुलानं आवारा हूँ!हे गाणं मेंडोलिनवर जबरदस्त वाजवून पहिला क्रमांक मिळवला होता. त्या स्पर्धेची चर्चा चौफेर पसरत गेली. संगीतकार शंकरजींनी कल्याणजींना कोण हा मुलगा, म्हणून विचारलं. नंतर कल्याणजी त्यांना त्या मुलाच्या घरी त्याचं कौतुक करायला घेऊन गेले. शंकरजी कोण आहेत हेही त्याला ठाऊक नव्हतं. तरीही त्यांना त्या मुलानं मेंडोलिनवर घर आया मेरा परदेसीवाजवून दाखवलं नि म्हणाला होता की, शंकर जयकिशन मला फार आवडतात. त्याचं हे उत्तर नाही पण मेंडोलिन ऐकून मात्र शंकरजींनी त्याला दोन तर ग्रेट मेंडोलिन प्लेअर्स आमच्याकडे असतातच, पण जेव्हा-जेव्हा रेकॉर्डिगला तिसरं मेंडोलीन घेऊ तेव्हा ते तूच वाजवशीलअशी ऑफर दिली नि ऑपेरा हाउसमध्ये होणा-या त्यांच्याच आहसिनेमाच्या प्रीमिअरचं. आमंत्रण त्या बच्चूला देऊन ते निघाले. संगीत स्पर्धेतून लहानपणी मिळवलेलं कलागुणांचं विजेतेपद बहुतेकजण आयुष्यभर पुढे काहीही न करता त्याला फक्त कुरवाळत बसतात. पण ज्या मुलानं आपलं विजेतेपद हे अविरत साधना, आराधना, कष्ट नि प्रामाणिकपणा यांचा अंगीकार करून उन्नत केलं ते आजचे फिल्म इंडस्ट्रीतले मेस्ट्रो मेंडोलिन प्लेअर आदरणीय किशोरभाई देसाई.

कापड मिल उद्योजकाची परंपरा लाभलेल्या व संगीतप्रेमी वडिलांचं सशक्त प्रोत्साहन मिळालेल्या किशोरजीनं लहानपणी चौपाटी परिसरात राहात असल्यापासूनच ऑपेरा हाउसच्या देवधर स्कूल ऑफ इंडियन म्युझिकमधून हार्मोनियम व मेंडोलिनच्या शास्त्रीय शिक्षणाला सुरुवात केली होती. उद्योगपती जयानंद खिरा यांच्या शिफारशीने आग्रा घराण्याचे गायक उस्ताद खादीम हुसेन खॉँ यांच्याकडून गंडाबंधनाने त्यांना गायकीची तालीम मिळाली. किशोरभाईंना उस्ताद अली अकबर खॉँ साहेबांसारखे सरोदचे दिग्गज गुरू लाभले आणि रेकॉर्डिग वाजवता वाजवता आयझॅक डेव्हिड साहेबांकडूनही त्यांना स्टाइल्सचं गायडन्स मिळत गेलं.

 किशोरजींना शाळेत असल्यापासूनच अनिल बिश्वासपासून त्यांना अनेक संगीतकारांच्या सहाय्यक होण्यासाठी ऑफर्स येत राहिल्या ज्या त्यांनी एसएससी होईपर्यंत थोपवून धरल्या होत्या. त्यानंतर सी. रामचंद्र यांच्यासाठी वादक म्हणून वाजवताना ते त्यांचे सहाय्यक होऊन दोघांमधलं नातं हे सोबतच पिता व मानसपुत्राचंही होऊन गेलं. चितळकरांच्या संगीतात आंचल’, ‘अमर रहे प्यारनंतर उल्लेख करण्याजोग्या नवरंगमधल्या चारांपैकी तू छुपी है कहां,’ ‘आधा है चंद्रमा रात आधीया पॉप्युलर गाण्यात सरोद, मेंडोलिन तसंच घरकुलमधल्या मलमली तारुण्य माझेया गाण्यात किशोरजींनी स्वरमंडल वाजवलंय. त्यांच्या कारकीर्दीतला असा एकही मोठा संगीतकार सापडणार नाही की ज्यांनी किशोरभाईंना कधी बोलावलं नाही.

शंकर - जयकिशनसाठी अधूनमधून वाजवता बसंत बहारसिनेमाच्या नैन मिले चैन कहॉँया गाण्यातलं या यंग चॅपनं वाजवलेलं मेंडोलिन जयकिशनला फार आवडलं व तिथपासून त्यांनी तिसरं मेंडोलिनही फिक्स करून टाकलं आणि टॉप ग्रेडेड आर्टिस्टच्या रॅकमधून किशोरभाईंची सफर सुरू झाली ती पुढे अनाडीतलं किसी की मुस्कुराहटों पे’, ‘जिस देश में गंगा बहती हैमधली आ अब लौट चलें’, ‘हम भी है, तुम भी होइ. शम्मी कपूरचा रोल असलेल्या जंगलीतली अय्यय्या सुकू’, ‘काश्मीर की कली हूं मैं’, ‘नैंन तुम्हारे मजेदारही गाणी शंकर- जयकिशनच्याच संगममधलं मुकेशचं ओ मेहबूबाचं इंट्रो मेंडोलिन, तसंच प्रोफेसर’, ‘हमराही’, ‘जिंदगी’, ‘बेटी बेटे’, ‘मेरा नाम जोकर’, ‘मेरे हुजूर’, ‘लाल पत्थर’, ‘संन्यासीअशा व अधल्या-मधल्या सगळय़ा सिनेमाच्या मेजर गाण्यांमधून किशोरजींचा सहभाग आहे.

किशोर कुमार, कल्याणजी-आनंदजी, पंचम, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, मुकेश, आनंद बक्षी, भूपेंद्रही इथे केवळ नावं नाहीत तर ही किशोरभाईंची जिगरी दोस्त मंडळी आहेत. कल्याणजी-आनंदजींच्या पहिल्या सिनेमापासून छलियामधलं डम डम डिगा डिगाकिंवा छलिया मेरा नाम’, ‘हिमालय की गोद मेंमधली एक तू जो मिला’, ‘मैं तो एक ख्वाब हूँ’, विशेष म्हणजे चॉँद सी मेहबूबा हो मेरीयातलं ठेक्यातलं मेंडोलिन तसंच फूल बने अंगारेमधल्या चॉँद आहे भरेगागाण्यातलं लाजवाब मेंडोलिन प्रदर्शन हे कल्याणजी-आनंदजीसोबतचे काही लँडमाक्र्स्. लक्ष्मीजी खुद्द मेंडोलिन वादक असूनही त्यांच्या पारसमणीतल्या हंसता हुआ नुरानी चेहरापासून सगळय़ा गाण्यांत, ‘मिलनमधल्या हम तुम युग-युग से’, ‘बोल गोरी बोल’, ‘फर्जमधलं हम तो तेरे आशिक हैंही लता-मुकेशची व लता-रफीच्या इज्जतमधल्या ये दिल तुम बिन कहीं लगता नहींसारख्या अनेक मेलडियस गाण्यांत किशोरभाई दिसतात. पंचम आणि किशोरभाई हे मित्रही आणि सरोदमधले उ. बहादूर हुसेन खॉँ यांच्याकडचे गुरुबंधूही. एस.डी व आर.डीकडे किशोरभाई फिक्स होते. गाईडचं कॉँटों से खींच के’, ‘प्यार का मौसममधल्या रफींनी गायलेल्या तुम बिन जाऊँ कहांगाण्यातलं किशोरजींचं वादन हे मेंडोलिनमधलं एक अनोखं उदाहरण बनलंय. संगीतकार रवीसाठी पहिलंच गाणं वाजवलं ते चौदहवी का चॉँद होत्याचं यश किती सांगावं. मदन मोहनबरोबर वो भूली दास्तॉं’, ‘आप की नजरों ने समझा’ (सहवादक लक्ष्मीजी), ‘नैना बरसे’, ‘शौक नजर की बिजलियॉँ’, ‘तू जहॉँ-जहॉँ चलेगा’, संगीतकार रोशनचं जो वादा किया वो’, हेमंत कुमारचं कहीं दीप जले’, ‘पिया ऐसो जिया में’, उषा खन्नाचं हम हिंदुस्तानीमधलं छोडो कल की बातेंअशा हजारो हिट गाण्यांमध्ये किशोरभाई देसाई हे फिल्म म्युझिक विश्वात अनेकदा संगीतकारांना धून बांधताना सहायक म्हणून तर कधी म्युझिक कंडक्टर या भूमिकेतून, कधी सरोद, तर कधी ऊद, कानून, बेंजो, हार्मोनियम वादनामधून आणि जास्तीत-जास्त एक सर्वमान्य असा उच्च कोटीचा मेंडोलिनवादक म्हणून परिचित आहेत.

वरकरणी मेंडोलिन वाजवलेली मेलडी फ्रेज ऐकून हे तर बुलबुल तरंग आहेअसं मेंडोलिनचा परिचय नसणारे बेधडक म्हणतात, कारण दोन्ही वाद्यांमध्ये साधर्म्यही आहे. निदान प्लेक्ट्रम (तारांतून नाद निर्माण करण्याचं बदामाकृती प्लास्टिकसदृश मटेरियलचं पातं) छेडताना मनगटाचा अ‍ॅँगल वेगवेगळा असला तरी -हिदमिक अ‍ॅक्शन तरी तश्शीच आहे. आकार लहान, ताराही बारीक त्यामुळे आवाजही नाजूक आणि म्हणून गाण्याच्या मोठ्या ध्वनिमुद्रणात हे कधी सिंगल नसतं (सिच्युएशनली असतंही). कुणीही दोघं किंवा तिघं वाजवताना त्यांचं प्रत्येक तारेचं टय़ूनिंग, प्लकिंग, लयकारी या गोष्टी इतक्या परफेक्ट सिंक्रोनाइझ्ड् होतात की जणू ते कुणी एकटाच वाजवतोय असं वाटावं. सिक्रोनायझेशन हे तत्त्व कोणत्याही संगीतात एक कम्फर्ट स्थापित करत असतं. वादन आणि स्वभाव हे दोन्ही मधाळ असलेल्या किशोरजीचं हे मॅचिंग कोणाही वादकासोबत सुंदर नि सुरेल होई. किशोरजींचं आत्मिक योगदान हे इतकं परिणामकारक की लता, किशोर, रफी, मन्ना डे, मुकेशसारखे बडे गायक किंवा नौशाद, बर्मन, मदन-मोहन, सलीलदा, चित्रगुप्त, रोशन, खय्याम, जयदेवसारखे श्रेष्ठ संगीतकार वा सॅबेस्टाइन, दत्ताराम, प्यारेभाई, जॉनी गोम्स, फ्रॅँकी, कोरसी लॉर्ड यासारखे अ‍ॅरेंजर्स तसंच सहवादक या सर्वाना किशोरभाईंचा प्रेझेन्स हा सुखद व प्रमोदकारी वाटायचा आणि परिणामी ते सर्वाना गाण्याच्याही यशातले लकी म्युझिशियन वाटू लागले. परमश्रद्धेय लतादीदी हे त्यांचं निस्सीम आदराचं असं गुरुस्थान आहेत नि दीदींचेही ते एक लाडला स्वर आहेत. त्या शक्तीमुळे आजही ते गुंतलेले आहेत, कामात आणि रियाझात. त्यांचा कार्यकाल 60  च्या दिशेने आलेखित होतोय. या कालात त्यांचा कुठेही व कोणाशीही कधी संघर्ष झाला नाही, या लीनतेतूनच त्यांचं व्यक्तिश्रेष्ठत्व कळावं.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0