रापण

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image

सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर रापणीची छायाचित्रं काढत असताना निसर्ग तर वेगळ्या रंगछटा उधळीत होताच त्याचप्रमाणे आसपासचा माहौल अधिकच बोलका बनून समोर आला. फ्रेम टू फ्रेम समुद्रकिना-यावरचा हा नजारा

समुद्राच्या किना-यावर रोजच रापणीने मासेमारी केली जाते. परिसरातील लोकांसाठी हे रूटीन असलं तरी प्रत्येक दिवसाची मजा औरच असते. सूर्योदय-सूर्यास्ताची हजारो छायाचित्रं आतापर्यंत काढली गेली असतील. पण प्रत्येक वेळी निसर्ग वेगळय़ाच रंगछटा उधळीत असतो. त्या दिवशीही सहज म्हणून रापणीची छायाचित्रं म्हणून काढायला गेलो, पण मुख्य विषयापेक्षा बाजूचा माहोलच अधिक बोलका वाटू लागला.

 येणारी लाट म्हणजे दोरीच असं समजून दोन छोट्या मैत्रिणी न चुकता लाटा-उडय़ांचाखेळ खेळत होत्या. येणारी लाट म्हणजे समस्या.. पण थांबायचं नाही. स्वार व्हायचं लाटेवर.. एकमेकांच्या विश्वासानं..अस्ताला जाणा-या सूर्याच्या पार्श्वभूमीवर फोटो टिपताना त्यांच्या उड्यांची लय नकळतपणे मनात जमत गेली.

बाजूलाच रापण संघातील एकाचा मुलगा पाण्यात खेळत होता. त्याच्या बापाचं त्याच्याकडे लक्ष होतंच. खेळता खेळता तो कंबरेपर्यंत पाण्यात गेला. मनोमन वाटलं आता मुलाला ओरडा खावा लागणार! ‘बाबा ओरडला पक्या.. लाटेवर लक्ष ठेव! समुद्र हेच अंगण..त्याची भीती कशाला..धोक्यांपासून पळण्यापेक्षा तो समजून घेतला पाहिजे. बाबांच्या एका वाक्यात बरंच काही दडलेलं. अलीकडे आजीबाई नातवांसोबत रेतीत खेळण्यात गुंग झाली होती. खरंच म्हातारपण म्हणजे पुन्हा मिळालेलं बालपणच होय.

 

रापण हळूहळू किना-यावर येऊ लागली तसे छोटे मासेही जाळय़ाबरोबर बाहेर येऊ लागले. एव्हाना बरीच मुलं रापणीभोवती जमा झाली. जाळ्यातला मासा काढण्यासाठी त्याची धडपड रापणकारांच्या दटावण्यानंतर काही काळं थांबे, पुन्हा सुरू होई. ओढणा-यांची जोडी लाकडी दांडय़ाला जाळ बांधून ओढत होता. ठराविक अंतरावर आल्यावर दोरी सोडून पुन्हा पहिल्या स्थानावरून ओढण्यास प्रारंभ होई. हे चक्र सतत चालूच होतं. बऱ्यापैकी मासे किना-यावर येऊ लागले. मासे पळवण्यासाठी मुलं धडपडत होती. पण एक वयस्कर लगबगीने मासे वेचत होता. मुलं आणि वृद्धांमध्ये जणू कोण बघू या आदी पोहोचतंहा खेळच चालला होता. जाळय़ातली मासळी कॅमे-यात टिपण्याचा प्रयत्न सुरू असतानाच एका माशाने आपल्या सौंदर्याचा नमुना दाखवला. मावळतीच्या सूर्याच्या किरणांमध्ये तो मासा जणू सोन्याचाच असल्यासारखा चमकत होता. रापण ओढणा-यांबरोबर समुद्रातील होडय़ांचीही लगबग वाढली. समुद्राच्या लाटा होडीला वर-खाली नेत होत्या. पण अशा अस्थिर स्थितीतही रापण योग्य पद्धतीतच किना-यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अंधार पडू लागला आणि रापणकरांच्या बाया टोपल्या घेऊन किना-यावर दाखल झाल्या. जाळय़ातले मासे वेचण्याचं काम सुरू झालं. आता प्रतिस्पर्धी होते ते कुत्रे. आयत्या मेजवानीसाठी कुत्र्यांचं टोळकंच आलं होतं. मगाशी लाटांवर खेळणारी मुलं कुत्र्यांच्या मागे लागली. रॉकेलचे टेंभे पेटले. किना-यावरच्या वाऱ्यात भगभगणा-या टेंभ्यांच्या प्रकाशात माशांची मोजदाद सुरू झाली. थकलेल्या रापणकरांनी पेजेचे पेले तोंडाला लावले आणि स्त्रीवर्गाने रापणीचा ताबा घेतला. एक टप्पा संपला होता. मासे किना-यावर आले. पण त्यांची विक्री झाली तरच पैसा मिळणार, लवकरात लवकर बाजारपेठेत पोहोचण्यासाठी लगबग सुरू झाली. एव्हाना आठ वाजले होते. रापणीची मजा घेणारे घरी परतले आणि बायांची पाऊलं बाजाराकडे वळली.                                      

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0