पडद्यामागची ‘नाटके’
आमचा असा सवाल करत आहोत की, सध्या पडद्यामागे नाटकवाल्यांची इतकी जोरात नाटके सुरू आहेत की, ती असताना थिएटरात आणखी वेगळी नाटके कशाला हवीत? आम्ही काय म्हणतोय ते एव्हाना वाचकांना उमगलेच असेल. तरीही स्पष्ट करून सांगायचे तर आम्ही निर्माते मंडळीच्या विंगेतल्या नाटकांबद्दल बोलत आहोत. गेले काही दिवस रंगभूमीवरचे नामवंत निर्माते जे काही प्रकार करत आहेत ते नाटय़रसिकांची नाटकाइतकीच करमणूक करणारे आहेत, यात आम्हाला शंका नाही.
मराठी रंगभूमीवर सध्या चांगल्या संहितांची कमतरता आहे. त्यामुळेच प्रेक्षकांनी नाटकाकडे पाठ फिरवली आहे, वगैरे दावा गेला काही काळ केला जातोय तो खरा नसल्याचे आम्ही अनेकदा याच सदरातून सांगितले आहे. आमच्या म्हणण्यावर आम्ही नेहमीच ठाम असतो. पण या पलीकडे जाऊन आमचा असा सवाल करत आहोत की, सध्या पडद्यामागे नाटकवाल्यांची इतकी जोरात नाटके सुरू आहेत की, ती असताना थिएटरात आणखी वेगळी नाटके कशाला हवीत? आम्ही काय म्हणतोय ते एव्हाना वाचकांना उमगलेच असेल. तरीही स्पष्ट करून सांगायचे तर आम्ही निर्माते मंडळीच्या विंगेतल्या नाटकांबद्दल बोलत आहोत. गेले काही दिवस रंगभूमीवरचे नामवंत निर्माते जे काही प्रकार करत आहेत ते नाटय़रसिकांची नाटकाइतकीच करमणूक करणारे आहेत, यात आम्हाला शंका नाही.
या नाटकाचा पहिला अंक मोहन जोशीनी अमेरिकेत न्यू जर्सीला (वैश्विक की काय) नाटय़ संमेलनाची तयारी सुरू केली तेव्हा पार पडला, असे म्हणतात. या विदेशी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून विश्वास महेंदळे यांचे नाव येताच निर्मात्यांनी त्याला कडाडून विरोध केला. मोहन जोशींवर, नाटय़ संमेलनावर बहिष्काराची भाषा वगैरे केली. ती कुणीच मनावर घेतली नाही, हा भाग वेगळा. (काही नतद्रष्ट म्हणतात की, तिथून या वैश्विक नाटय़ संमेलानाला जी नाट लागली ती शेवटपर्यंत. मोहनरावांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले ते वेगळेच.) असो, त्यानंतर लता नार्वेकर आणि सुधीर भट या दोन हेवीवेट निर्मात्यांमध्ये ‘सही रे सही’वरून जुंपली. प्रकरण कोर्टात गेले. तिथे कुणाची तरी हार आणि कुणाची तरी जीत होणारच होती, परंतु कोर्टाचा निर्णय लागण्यापूर्वी आणि नंतरही दोन्ही बाजूंनी ताळतंत्र सोडून जी काही आगपाखड चालवली ती या निर्मात्यांचीच लाज काढणारी होती. हे बाई आणि भटाचे भांडण नाटकांच्या जाहिरातीतूनही रोज चव्हाटय़ावर येत होते. (हे जाहीरात वॉर तर अजून संपलेले नाही.) ते ऐकून मनात एवढाच प्रश्न येत होता की, इतक्या (खालच्या) थराला जाण्याची खरंच काही गरज होती का? दोन निर्मात्यांमधला वाद समोपचाराने का मिटूच शकत नाही ? (आमच्या तंबाखूच्या व्यापा-यांमधली भांडणेही आम्ही समोपचाराने मिटवतो. पण निर्मात्यांकडे तेवढीही सभ्यता नसावी?) तिसरा प्रकार अभिनेता सतीश तारेवरील निर्माता संघाने टाकलेल्या बहिष्काराचा. तारे यांच्या अरेरावी आणि मनमानीविरुध्द आम्ही हे पाऊल उचलले, असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. कुठल्याही प्रकारचा बहिष्कार हा आम्ही सामाजिक अपराध समजतो तरीसुद्धा हा बहिष्कारही एक वेळ समजून घेता आला असता . पण सतीश तारे यांचा शिवाजी मंदिर येथील ‘आपले ठेवा झाकून’चा प्रयोगच उधळून लावण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी केला तो सर्वाधिक लाजीरवाणा होता. (आमच्या कानावर असे आले आहे की, नाटकाचा चालू प्रयोग असा उधळण्याचा प्रयत्न करणा-या या निर्मात्यांना पोलिसांनी दीड तास ठाण्यात बसवून ठेवले होते आणि चांगली तंबी देऊन त्यांची सुटका केली.) हे बहिष्कार प्रकरण अजून संपलेले नाही. पण या सगळ्या प्रकारात निर्मात्यांचेच नाव खराब झाले. पण याची जाणीव निर्मात्यांना दिसत नाही. नाहीतर त्यांनी बहिष्कार प्रकरण मिटवले असते. असो, आमचा रोकडा सवाल एवढाच आहे की, पडद्यामागे एवढी भारी करमणूक सुरू असताना तिकिटांचे चढे भाव असलेली याच निर्मात्यांची नाटके आम्ही थिएटरात जाऊन का बघायची?



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा