पहिले पान | रिलॅक्स | नंदनवनाचं दान!

नंदनवनाचं दान!

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image

सुंदर निळं आकाश, तुरळक ढग- दूर मागे बर्फाच्छादित हिमालयाची रांग, किना-यावरची हिरवळीची एक रांग- एक शिकारा आणि हे अद्भुत तरंग या सर्वाना एकाच फ्रेममध्ये कंपोज करून अलगद तो शॉट टिपून घेतला याचं आज खूपच समाधान वाटतं!

‘‘लॅँडस्केप फोटोग्राफी इज द सुप्रीम टेस्ट ऑफ द फोटोग्राफर अ‍ॅँड ऑफन द सुप्रीम डिसअपॉइंटमेंट’’ हे अ‍ॅन्सल अ‍ॅडम्स या प्रख्यात छायाचित्रकाराने निसर्गचित्रांविषयी केलेलं विधान सर्वच फोटोग्राफर्सना पटेल. एखाद्या विषयाला पूर्णपणे समजून घेऊन तो कॅनव्हासवर किंवा एका फोटोत उतरवणं ही साधीसुधी गोष्ट नाही. दल लॅकच्या किना-यावरून फिरताना मी मुख्यत: पिपल अ‍ॅँड पोट्रेचरया माझ्या आवडीच्या विषयावर फ्रेम्स शोधत होतो. मात्र शिका-यातून दल्-लॅकच्या संपूर्ण कानाकोप-यातून सहा तास फिरल्यावर मात्र निसर्गचित्र टिपण्याचा एक वेगळाच अनुभव मिळाला.

 

किना-यावरून फिरताना दल लॅकहा आपल्याला एक तलाव वाटतो. पण ते एक संपूर्ण गाव आहे असेच म्हणावे लागेल. दल लॅकच्या आतमध्ये लोकांची वस्ती आहे. दाटीवाटीने असलेली घरं आहेत. खूप दाट असं जंगल आहे. दल लॅकच्या आतमध्ये शेतीसुद्धा केली जाते. त्यात राहणा-या व्यक्तीचा बाहेरच्या जगाशी संबंध म्हणजे शिकारा. ते त्यांच्या दळणवळणाचे एकमेव साधन. प्रत्येक घराचा स्वत:चा असा एक छोटा शिकारा आहे आणि लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वजण तो लीलया चालवतात.

 दल लॅकच्या मध्यावर असाच एक लहानगा आपल्या आईसोबत फिरायला निघाला होता. त्याची आई शिकारा वल्हवीत होती आणि तो मोठय़ा मजेने पुढच्या टोकावर आरामात बसून त्या सफरीची मजा लुटत होता. प्रत्येकाचं बालपण-अनुभवविश्व केवढं वेगळं असतं, याचा प्रत्यय त्या चिमरडय़ाकडे पाहून येत होता.

अतिशय शांत-निश्चल पाणी हीसुद्धा त्या सफरीची एक अद्भुत भेट होती. दल लॅकच्या आत असलेल्या जंगलासारख्या भागातून शिकारा चालला होता. पाणी अतिशय निळंशार आणि त्या स्तब्धतेमुळेच मग समोरच्या घराचं, गवताचं, झाडांचं संपूर्ण प्रतिबिंब पार्श्वभूमीला घेऊन शिका-याचा समोरचा भाग फोकस इतकं निळं, दाट आणि स्तब्ध होतं.

 

याउलट तरंगम्हणजे काय याची नेमकी अनुभूती दल लॅकमध्ये मिळू शकते. स्तब्ध निळं पाणी आणि शिकाऱ्यांच्या हालचालीमुळे, वल्हवण्यामुळे पाण्यावर दूरवर शांत आणि संयत असे तरंग उठत जातात. खूप दूपर्यंत! हे तरंग खूपच छान वाटतात मात्र ते कॅमे-यात जसेच्या तसे पकडण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. सुंदर निळं आकाश, तुरळक ढग- दूर मागे बर्फाच्छादित हिमालयाची रांग, किना-यावरची हिरवळीची एक रांग- एक शिकारा आणि हे अद्भुत तरंग या सर्वाना एकाच फ्रेममध्ये कंपोज करून अलगद तो शॉट टिपून घेतला याचं आज खूपच समाधान वाटतं! आपण पाहिलेली प्रत्येक गोष्ट डोक्यात तर असतेच पण ती पाहिलेली गोष्ट फोटोच्या स्वरूपात जशीच्या तशी आपल्यासमोर आपल्याला हवी तेव्हा उभी करणं हे माझं एक महत्त्वाचं उद्दिष्ट!

 

कॅनव्हास या गोष्टीचं मला नेहमीच आकर्षण वाटत आलं आहे. त्याचं टेक्चर आणि त्यावर रंगाची उधळण झाल्यावर साकारली जाणारी सुंदर कलाकृती. दल लॅकमधल्या निसर्गाने असे कॅनव्हासच्या टेक्स्चरचे काही शॉट्स मला दिले आहेत. आकाशातल्या ढगांची वैविध्यपूर्ण रचना, त्यांच्या मागे लपलेला वा झाकोळलेला सूर्य, ढगांच्या बाजूने बाहेर पडणारा सूर्यप्रकाश आणि मुख्य म्हणजे पाण्यावर पडलेलं या सर्वाचं प्रतिबिंब...कुणालाही प्रेमात पाडेल असंच दृश्य.

 सूर्यास्ताचे फोटो काढू नयेत असं ऐकूनही त्या वेळी होणारी रंगांची उधळण प्रत्येक फोटोग्राफरला केव्हा न केव्हा भूल घालतेच! शिका-यातून सफर चाललेली असतानाच सूर्यास्ताची लगबग कॅमे-यात पकडण्यासाठी मी कॅमेरा सरसावला. शिकारा खूपच हलत होता. तेव्हा एक-दोन वेळा एकस्पोजर. शटर स्पीडबरोबर सेट करूनही होराईझन लाईनक्षितीजरेषा- तिरपी झाली होती. ती सरळ पकडण्याचा मनाने निर्धारच केला, त्यात हलणारा शिकारा... शेवटी सर्वाचं गणित जमून सूर्यास्ताचे अनेक शॉट्स घेतले.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0