रिलॅक्स
राइट ही राइट सनी
सनी देओल ब-याच महिन्यांनी पडद्यावर दिसणार आहे. पुढच्या आठवड्यात त्याचा ‘राइट या राँग’ प्रदर्शित होतोय, त्यानिमित्ताने सनीशी बातचीत करताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे एरवी उठसूठ ढाई किलोचा हात वापरण्याची इमेज रूढ असणारा सनी गप्पांच्या दरम्यान मात्र छान ‘राइट ही राइट’ची आपली इमेज निर्माण करतो.
..म्हणे आल्फ्रेड हिचकॉक
ऑस्कर पारितोषिक विजेत्या चित्रपटासंबंधीचं आल्फ्रेड हिचकॉकचं मत त्याच्याच चित्रपटाप्रमाणे भन्नाट आणि धक्का देणारं होतं. ‘इंट्रोडक्शन’ म्हणून लिहिलेल्या मजकुरात हिचकॉक धक्कातंत्राचा वापर करत खालील मतं व्यक्त करतो ...मेंडोलिनमध्ये लीन
वादन आणि स्वभाव हे दोन्ही मधाळ असलेल्या किशोर देसाई यांचं मॅचिंग कोणत्याही वादक, संगीतकार वा गायक-गायिकेसमवेत सुरेलच होई. साठ वर्षाच्या त्यांच्या मेंडोलिन वादनाच्या करिअरमध्ये त्यांचा कुठेही, कधीही संघर्ष झाला नाही....लाभले अम्हास भाग्य
एखाद्या गाण्याशी भव्यतेची जेवढी परिमाणं जोडता येतील तेवढी जोडण्याचा प्रयत्न कौशल इनामदारने संगीत दिलेल्या मराठी अभिमान गीतामध्ये केला गेलाय. आज २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिवसाचं औचित्य साधून ठाण्याच्या दादोजी कोंडदेव पटांगणात या गाण्याचं तितकंच भव्य प्रकाशन होईल....पुन्हा कट्यार पुन्हा खाँसाहेब
वसंतराव देशपांडेंनी अजरामर केलेली ‘कटय़ार.’मधली खॉंसाहेब ही भूमिका आता त्यांचा नातू राहुल देशपांडे साकारत आहे. ‘वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान’तर्फे रंगमंचावर येणारं तरुण संचातलं ‘कटय़ार काळजात घुसली’ हे नाटकही संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल....कॅमे-यासमोरील गर्दीचा चेहरा
कॅमे-यात दिसणारी प्रचंड गर्दीची दृश्यं. ‘मोगल-ए-आझम’ किंवा ‘जोधा अकबर’सारख्या पोशाखी चित्रपटांपासून थेट ‘नया दौर’, ‘लगान’, ‘सरकार राज’पर्यंतच्या सामाजिक विषयांपर्यंत. कुठून आणतात इतकी माणसं? गर्दीत उभ्या कलावंतांना एक्स्ट्राचा दर्जा मिळत असतो, या एक्स्ट्राच्या आयुष्यात डोकावलं तर त्यात ग्लॅमर कमी आणि गरिबीचे चटकेच अधिक असतात. सेटवरची गर्दी म्हणजे नक्की कोण यावर ऊहापोह. ...बाभंची रसदायी कविता
प्रसिद्ध कवी बा.भ. बोरकर यांच्या जन्मशताब्दीचं निमित्त साधून गुरुवार १८ फेब्रुवारी रोजी मुंबईत ‘जिणे गंगौघाचे पाणी ’ हा कार्यक्रम सादर झाला. बोरकरांच्या कवितेचं मोठेपण अधिक ठसठशीत करणा-या या कार्यक्रमाचा हा आस्वाद ...95 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा..
अॅनिमेशन, स्पेशल इफेक्ट्स हा आजच्या काळाचा मूलमंत्र आहे. भारतीयांनी या क्षेत्रात अगदी अमेरिकेपार झेंडे लावले आहेत. आता जगातला सर्वात खर्चिक अॅनिमेशनपट भारतात तयार झाला आहे. येत्या काही आठवडय़ांत तो प्रदर्शित होईल. चारशे अॅनिमेटर्स आणि इतर शेकडो कलाकारांच्या मेहनतीतून हा सर्वात महागडा अॅनिमेशनपट तयार झाला आहे. ९५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढं बजेट आणि चार वर्षाची अथक मेहनत यांच्या माध्यमातून तयार झालेल्या ‘लवकुश’ अॅनिमेशनपटावर एक प्रकाशझोत ...मोस्ट कमेंटेड



‘मास्को’ द ड्रामा