PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: रिलॅक्स ‘ऑल द बेस्ट’ची जादू! ================================================================================ समीर करंबे on 25 February, 2012 05:30:00 AM ‘ऑल द बेस्ट म्युझिकल’मध्ये कथानकात बदल करण्यात आलेला नाही. कलाकारांच्या टीममध्ये आदिनाथ कोठारे, मयुरेश पेम, वैभव तत्त्ववादी आणि मनवा नाईक आहेत. गीतं गुरू ठाकूरने लिहिलीत आणि संगीत राहुल रानडेचं आहे. मोहिनीवर एकतर्फी प्रेम करणा-या चंद्रकांत, दिलीप आणि विजय या आंधळ्या, मुक्या आणि बहिऱ्या तरुणांची प्रेमकहाणी नव्या संगीतमय टवटवीत रूपात पाहाणं हा वेगळा अनुभव असेल का? ऑस्करच्या पाहुण्यांची पंचतारांकित सरबराई ================================================================================ शॅल शिरॅको on 24 February, 2012 09:47:00 PM घरबसल्या ऑस्कर पुरस्कार सोहळा दाखवण्याचे पुण्यकर्म यंदा स्टार मूव्हीज वाहिनी (27 फेब्रुवारी सकाळी 6 पासून, रात्री 8 वा. पुन:प्रक्षेपण) करणार असल्यामुळे हॉलिवुडच्या भारतीय चाहत्यांना या सरबराईला मुकावे लागेल, इतकीच काय ती चुटपुट! ऑस्करच्या भाकितांचा खेळ! ================================================================================ सिद्धार्थ खांडेकर on 25 February, 2012 05:30:00 AM काही वर्ष ऑस्कर पाहिल्यानंतर अ‍ॅकॅडमीची ‘अनप्रेडिक्टेबिलिटी’ काही प्रमाणात प्रेडिक्टेबल होते. त्यामुळे संभाव्य विजेत्यांचा अंदाज काही प्रमाणात बांधता येतो. शिवाय प्रत्यक्ष सोहळा पाहतानाही या अंदाजांमुळे नेमकं चित्र ब-यापैकी स्पष्ट होतं. नात्यास नाव अपुल्या, देऊ नकोस काही ================================================================================ रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ on 25 February, 2012 05:30:00 AM दीर्घकाळपर्यंत आपल्या मस्तीत गाणे ही एक तपश्चर्याच म्हणायला हवी. असे करू शकणा-या निवडक प्रतिभावंतांपैकी गुलजार एक. गेली 49 वर्षे ते चित्रपटसृष्टीत पाय रोवून उभे आहेत. स्वत:चे स्वत्व व गुणवत्ता जपतानाच त्यांनी स्वत:ला बदलत्या काळानुसार बदलले आणि आपले ‘समकालीनत्व’ सातत्याने सिद्ध केले. हे त्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. देवाच्या बागेतली मासेमारी ================================================================================ आदेश पोखरे on 25 February, 2012 05:30:00 AM माशांनी पूर्ण भरलेलं जाळं किना-यावर आणल्यावर त्यात कोणत्या प्रकारची मासळी अडकली आहे, हे पाहिलं जातं. जाळीतले मासे काढून टोपल्यांमध्ये भरल्या जातात. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वजण कुठले मासे जाळ्यात सापडले आहेत, ते पाहाण्यासाठी उत्सुक असतात. ते मासे टोपल्यांमध्ये भरतानाचा त्यांचा उत्साह पाहाण्यासारखा असतो. त्यांचे हावभाव टिपण्याचा प्रयत्न मी केला. गंभीर भूमिका जाणीवपूर्वक ================================================================================ संध्या धुरी on 25 February, 2012 06:30:00 AM ‘अनुबंध’ मालिकेतील ‘अंजू वहिनी’ या भूमिकेनंतर विनोदी अभिनेत्री सुहास परांजपे आता पुन्हा एकदा गंभीर भूमिका साकारत आहेत ‘मी, आजी और साहेब’ या मालिकेत. भूमिकेचं नाव आहे ‘अर्चना बापट’. हिंदीतली सुहासची ही पहिलीच मालिका आहे. विनोदी अभिनेत्री म्हणून ओळख असताना गंभीर भूमिकेकडे का वळावसं वाटलं आणि हिंदीतला अनुभव कसा होता, या संदर्भात तिच्याशी केलेली ही बातचीत. बांधीलकी महत्त्वाची ================================================================================ निखिल रत्नपारखी on 25 February, 2012 05:30:00 AM माझ्या दुस-या चित्रपटाचं नावं आहे ‘रात बाकी’. आपल्याकडे पटकथेकडे फारसं लक्ष दिलं जात नाही, असा ओरडा नेहमी होतो. ‘रात बाकी’चं वैशिष्टय़ हे आहे की, याची पटकथा फार भक्कम आहे. ही सहाजणांची गोष्ट आहे. सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यावर ‘रात बाकी’चं कथानक आधारित आहे. या सहाही गोष्टी एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. हपापाचा माल गपापा ================================================================================ चिंतामणी भिडे on 18 February, 2012 04:30:00 AM हॉलिवुडचा चित्रपट, कथा, संकल्पना जशीच्या तशी उचलायची आणि आपला चित्रपट करायचा, हे प्रकार नवे नाहीत; पण आता परदेशी चित्रपट प्रेक्षकांनाही सहज उपलब्ध असताना मूळ चित्रपटाचं श्रेय तरी किमान नाकारलं जाऊ नये, अशी अपेक्षा प्रेक्षकांनी ठेवल्यास ती अवाजवी मानली जाऊ नये. अजिंठय़ाची लेणी साकारणार रुपेरी पडद्यावर ================================================================================ राजेश शिरभाते on 18 February, 2012 04:30:00 AM ऐतिहासिक हिंदी चित्रपटांपासून हॉलिवुडच्या व्यावसायिक चित्रपटांपर्यंत आपल्या भव्यदिव्य कलादिग्दर्शनाचा ठसा उमटवणारे कलादिग्दर्शक नितीन देसाई आता लवकरच दिग्दर्शकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहेत. अगतिक घुंगराचे बोल ================================================================================ रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ on 18 February, 2012 04:30:00 AM गाणी सुद्धा माणसासारखं नशीब घेऊन जन्मतात. पण माणसाप्रमाणे कर्माद्वारे नशीब पालटणं त्यांना शक्य नसते. म्हणून मग ती मशहूर शायर इक्बाल म्हणतात त्याप्रमाणे