05 November, 2011 05:30:00 AM
मराठी चित्रपटाला मुळातच प्रेक्षक मिळणं दुरापास्त असताना उमेश आणि गिरीश या कुलकर्णी द्वयीने अवघ्या दोन चित्रपटांमध्ये स्वत:चा हक्काचा प्रेक्षकवर्ग तयार केलाय. या दोघांचं नाव ज्या कलाकृतीशी जोडलं गेलंय, ती चांगलीच असणार, असा विश्वास प्रेक्षकांच्या मनात निर्माण होतो, ही बाब त्यांच्या कामाविषयी खूप काही सांगून जाणारी आहे. उमेश आणि गिरीश केवळ एकत्र काम करत नाहीत, तर एकावाचून दुस-याचा उल्लेखच होऊ शकत नाही, इतके ते एकमेकांमध्ये मिसळले आहेत. तरीही दोघांनीही आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व कायम राखलंय आणि आपल्या कलाकृतींनाही आपापलं व्यक्तिमत्व बहाल केलंय. या जोडीचा ‘देऊळ’ कालच प्रदर्शित झालाय. त्यानिमित्त, या केमिस्ट्रीमागचं रहस्य आणि निर्माता म्हणून डोक्यात असलेल्या कल्पनांविषयी गिरीश कुलकर्णीशी मारलेल्या या दिलखुलास गप्पा..
05 November, 2011 05:30:00 AM
‘अजिंठा’ नाटकात प्रेमिकांची दृष्टभेट, त्यांची हुरहूर, उत्कटता, चित्रकाराची रंगाची भाषा, त्यातून उमलणारी प्रेमाची भाषा या सर्व प्रकारांत रुपांतरकर्त्यांनं यश मिळवलं आहे. पण सभोवतालचा आदिवासी समाज, त्यांची पारंपरिक मूल्यं, त्या स्त्रियांची असहाय्यता, त्यातूनही प्रकट होणारी त्यांची बंडखोरी व त्यात पारोची होणारी घालमेल व अंती तिचा जाणारा बळी या भागातले नाटय़ पुरेशा समर्थपणे प्रकट होत नाही....
05 November, 2011 05:30:00 AM
लहान एकल प्रदर्शनांनाही आताशा ‘क्युरेटर’ असू लागले आहेत. यापैकी बरेचसे क्युरेटर समीक्षकाच्या किंवा आस्वादकाच्याच भूमिकेतून आपला ‘नायक’ किंवा ‘नायिका’ कशी थोर आहे, हेच सांगण्याचं- म्हणजे कॅटलॉग लेखकाइतकंच- काम करत असतात. त्यांना क्युरेटर कशाला म्हणायचं, हा प्रश्न पडतो. ...
05 November, 2011 05:30:00 AM
या फोटोग्राफीमागचा हेतू एवढाच की, या पूजेची भव्यता जेवढी जाणावते त्यापेक्षा अधिक पूजेतील पारंपरिक महत्त्व व पावित्र्य सांगणारे छायाचित्र लोकांसमोर ठेवता यावं. ...
05 November, 2011 05:30:00 AM
मराठीतल्या या महत्त्वाच्या चित्रपटांबरोबरच हिंदीत एका चित्रपटाचं काम सुरू आहे. त्याचं नाव आहे ‘अय्या’. अनुराग कश्यपची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सचिन कुंडलकरचं आहे. या चित्रपटासाठी सचिननेच माझी निवड केली. मी राणी मुखर्जीबरोबर दिसणार आहे....सध्या काय चाललंय ते सांगतोय अभिनेता सुबोध भावे......
05 November, 2011 05:30:00 AM
मल्टिस्टारर चित्रपटांमधूनही स्वत:चं खास स्थान निर्माण करणारा तुषार कपूर ‘द डर्टी पिक्चर’मध्ये गंभीर भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाविषयी व त्याच्या एकूण कारकीर्दीविषयी त्याच्याशी मारलेल्या गप्पा...
29 October, 2011 05:00:00 AM
भारतात अनेक क्षेत्रांत घराणेशाही आहे. जुन्या काळातली राजघराणी अजूनही काही ठिकाणी आहेतच. भारतीय शास्त्रीय संगीतातही अनेक घराणी प्रसिद्ध आहेत. काही उद्योजकांच्या घराण्यांनी भारताच्या प्रगतीला हातभार लावला आहे. त्याचप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीतही अशी अनेक घराणी आहेत. पण फिल्म इंडस्ट्रीतल्या आद्य घराण्याचा मान नि:संशय कपूर खानदानाकडे जातो. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून सुरू झालेला हा सिलसिला राज, शम्मी, शशी, ऋषी, रणधीर, राजीव, करिष्मा, करीना असं करता करता रणबीरपर्यंत येऊन पोहोचला. निव्वळ व्यावसायिक यशच नव्हे, तर या कलेविषयी असलेल्या तळमळीमुळे कपूर घराणं प्रेक्षकांच्या आदरालाही पात्र ठरलं. याच घराण्याचा झेंडा खांद्यावर घेऊन चाललेल्या रणबीर कपूरशी मारलेल्या या गप्पा.....
29 October, 2011 05:00:00 AM
पाब्लो पिकासो 26 ऑक्टोबर 1881 रोजी जन्मला होता. म्हणजे आज तो असता, तर गेल्याच आठवडय़ात त्याचा 130 वा वाढदिवस साजरा झाला असता! त्या दिवशी बाकी काही नाही झालं तरी, चोरीला गेलेल्या त्याच्या दोन चित्रांचा छडा लागल्याची बातमी आली. ही चित्रं कोणती होती, ती कशी दोन-तीन वर्षापूर्वीच चोरीला गेली होती पण चित्रं मिळाल्यावरही ती कुणी चोरली वा इतकी वर्ष ती कुठं होती याबद्दल गोपनीयताच कशी पाळली जाते आहे, अशी ती बातमी. त्यावरली एका गॅलरी-चालकाची मासलेवाईक प्रतिक्रिया, ‘मग ही चित्रं चोरीला गेली काय नि मिळाली काय.. चोराला शिक्षा नाही मिळाली, तर चित्रचोरी होतच राहणार’ अशी होती! ...
29 October, 2011 05:00:00 AM
कापणीच्या हंगामाचा शुभारंभ असल्याने या हंगामाचा प्रारंभ तेथील ठिकाणास गूळ - खोबरं ठेवून करण्यात आला. त्या क्षणी नतमस्तक झालेला शेतकरी पाहून जुन्या चालीरिती आजही कटाक्षाने पाळल्या जात आहेत. याची अनुभुती आली आणि त्या शेतक-यास मी माझ्या कॅमे-यात बंदिस्त केले....
29 October, 2011 05:00:00 AM
आजच्या घडीला पूर्णत: प्रायोगिक नाटक करणारी महाराष्ट्रातील एकमेव नाटय़संस्था म्हणून पुण्याच्या ‘आसक्त’ याच संस्थेचा निर्देश करावा लागेल. या संस्थेचं नाटक झटकन प्रायोगिकतेकडून व्यावसायिकतेत रूपांतरित होणारं नसतं. रंगभाषेच्या, सादरीकरणाच्या, अभिनयाच्या वेगवेगळ्या शक्यता पडताळून पाहाण्याचा या संस्थेचा प्रयत्न तिच्या प्रत्येक सादरीकरणातून प्रत्ययाला येतो....