PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: रिलॅक्स सेलिब्रिटींचा बोलबाला ================================================================================ समीर करंबे on 12 May, 2012 05:15:00 AM ‘हर्बेरियम’मध्ये केलेल्या पाचही नाटकात सुनील बर्वेने सध्या प्रसिद्धीझोतात असलेले कलाकार घेतले. त्यांची तशी जाहिरातही केली. ‘हर्बेरियम’ला त्याचा घसघशीत फायदा कसा झाला, ते सगळ्यांनी पाहिलंच. तिकिटाचे दर तीनशे रुपयांपर्यंत नेऊनही, एखाद्या नाटकाचा अपवाद सोडला तर सगळीच नाटकं हाउसफुल्ल ठरली. ‘हर्बेरियम’चं यश नेमकं कशात होतं, याचं उत्तर कितीही डोकं खाजवलं तरी नाटकवाल्यांनाही देता येत नसलं तरी ढोबळपणे असं म्हणता येईल की, नामवंत कलाकार हा यातला एक फॅक्टर होता. प्रेक्षकांना जुनी नाटकं आणि नावाजलेले कलाकार हे मिश्रण पसंत पडलं. दोस्ती से आगे कुछ नही.. ================================================================================ रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ on 12 May, 2012 04:55:00 AM माणसांच्या गर्दीतही ती एकाकी आहे, व्याकुळ आहे. उगाचच चार जणात वावरताना सोयीचे म्हणून आपल्या गडद लिपस्टिकसोबत एक औपचारिक स्मितही तिने आपल्या ओठांवर चिकटवून ठेवले आहे, तो तिच्याजवळ येतो व कसल्याही औपचारिकतेशिवाय सांगतो, ‘‘तुम्हाला इथे आता कोणी पाहत नाहीये. हे बेगडी हास्य उतरवून फेकून द्या. बघा, किती मोकळे वाटेल त्याच्याशिवाय.’’ ती चपापते. मुखवट्यांच्या जगात इतकी वर्षे वावरल्यावर तिला अशा थेट, नुसत्या माणसांची सवय उरलेली नसते. मोनोरेल ================================================================================ अरुण पाटील on 12 May, 2012 05:10:00 AM मोनोरेलची कोणतीही चाचणी शक्यतो सकाळीच असते; ती पाहण्यासाठी, खरंतर टिपण्यासाठी, प्रतीक्षानगर येथील पत्रकार कॉलनीतल्या माझ्या साथीदारांबरोबर गच्चीत जातो. मोनोरोलची चाचणी असते तेव्हा रस्त्यावरून गाडीतून प्रवास करणारे, आपल्या गाड्या थांबवून उंचावरून भरधाव वेगानं जाणा-या हिरव्या रंगाच्या, चार डब्यांच्या मोनोरेलकडे कुतूहलाने पाहत असतात. टेक केअर, मि. बॉण्ड ================================================================================ शॅल शिरॅको on 12 May, 2012 03:40:00 AM बॉण्डच्या जिवावर बेतलेल्या एका प्रसंगाचे दृश्य त्यात आहे. बॉण्ड नेहमी त्याच्या कारवायांनी, टाळीबाज संवादांनी खलनायकाला निरुत्तर करतो पण, या दृश्यात बॉण्ड क्षणभरासाठी का होईना निरुत्तर होतो. बॉण्डला बेड्या घालून एका बॉम्बशी जखडण्यात आलंय. प्रॉन्स रबर ================================================================================ विभावरी देशपांडे on 12 May, 2012 03:50:00 AM कोळंबी मसाला केल्यास तो चपातीबरोबर आणि भाताबरोबर खाता येईल, असा सुज्ञ विचार करून मी वाटण करण्याच्या तयारीला लागले. वाटण सुंदर झालं. कोळंबी तेलात परतली, तिला थोडासा गुलाबी रंग आल्याबरोबर त्यात वाटण टाकलं, थोडं पाणी टाकून ती कोळंबी शिजवायला ठेवली. तेवढ्यात मला एक फोन आला. ‘किडनॅप’मधली भूमिका वेगळी! - सुहास पळशीकर ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 12 May, 2012 03:30:00 AM मराठी रंगभूमीवरील ‘इंटेन्स’ नटांपैकी एक म्हणजे सुहास पळशीकर. त्यांची तुलना थेट नाना पाटेकर यांच्याबरोबर केली गेली. आपल्या भूमिकेच्या लांबी-रुंदीचा विचार न करता केवळ या भूमिकेचाच पूर्ण विचार करणा-या सुहास पळशीकरांनी भक्ती बर्वे-इनामदार यांच्यासह अनेक बिनीच्या कलावंतांबरोबर काम केलेलं आहे. आता ‘किडनॅप’ या नाटकातून ते तब्बल सतरा वर्षानंतर रसिकांसमोर येत आहेत. सुहास पळशीकर यांच्याबरोबर यानिमित्ताने मारलेल्या गप्पा. तांत्रिक वर्तुळ पूर्ण ================================================================================ राजेश शिरभाते on 05 May, 2012 06:30:00 AM तीन मे 1913 रोजी भारतात पहिला सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या आधीपासूनच भारतात सिनेमा आला होता. पण दादासाहेब फाळके यांनी पहिला भारतीय सिनेमा तयार केला. तेव्हा हलती चित्रं म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या या सिनेमाची शंभरी यावर्षी साजरी होत आहे. या शंभर वर्षामध्ये चित्रपटाच्या तंत्रात आमूलाग्र बदल झाले. सिनेमा तांत्रिकदृष्ट्या प्रगत झाला. सिनेमाच्या ध्वनी व छायाचित्रण या दोन घटकांमध्ये प्रगतीचा पुढचा टप्पा पाहायला मिळत आहे. सिनेमा जिथून आपल्या प्रवासाला निघाला होता तिथेच तो आज परतला आहे. तंत्राचं हे वर्तुळ सिनेमानं कसं पूर्ण केलं. तांत्रिक प्रगतीच्या अनुषंगानं चित्रपटसृष्टीच्या तांत्रिक अंगाचा हा घेतलेला वेध. ये तेरा घर ये मेरा घर.. ================================================================================ रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ on 05 May, 2012 06:20:00 AM प्रत्येक माणसाची दोन घरे असतात. एक वास्तवातले, एक स्वप्नातले (ज्यांचे स्वप्नातले घर वास्तवात येते, असे भाग्यवंत किती असतील?) प्रत्येकाचे स्वप्नातले घर वेगळे. कारण प्रत्येकाच्या स्वप्नांचा रंग वेगळा, गंध वेगळा, माणसांना घर इतके हवेहवेसे का बरे वाटत असते? त्या एका स्वप्नाच्या मागे बेभान होऊन ते आयुष्यभर का धावतात? त्यांच्या स्वप्नातले घर आपल्याला कसे पाहता येईल? आम्ही हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दोघा दिग्गज कवींना हे सवाल केले व त्यांच्या रचनांच्या प्रकाशात त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. एक नाटक, दोन सिनेमे ================================================================================ प्रहार on 05 May, 2012 06:15:00 AM येत्या काही दिवसांमध्ये माझं एक नवं नाटक येत आहे. या नाटकाचं नाव आताच काही सांगत नाही. लोकांना आवडेल असा हा विषय आहे. माझी भूमिकाही चांगली झाली आहे. - संजय नार्वेकर भूमी कामगार रंगभूमीची ================================================================================ कमलाकर नाडकर्णी on 05 May, 2012 06:05:00 AM चार दिवसांपूर्वी कामगार दिन महाराष्ट्र दिनाबरोबर निघून गेला. त्या निमित्ताने मुख्य प्रवाहातील रंगभूमीला प्रेरणा देणा-या, आज विस्मृतीत गेलेल्या कामगार रंगभूमीचं हे स्मरण रंजन. आजच्या व्यावसायिक नाटकांना व चित्रपटालाही बरेचसे कलावंत या कामगार रंगभूमीनेच दिले आहेत, हे विसरून चालणार नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात या रंगभूमीचा मोलाचा वाटा होता.