21 January, 2012 05:30:00 AM
हा सारा अद्भुत स्वप्नांचा प्रदेश आहे. धुक्याने वेढलेल्या गर्द पर्वतराजींचा, धूसर जाणीव-नेणिवेच्या सीमारेषेवरचा, स्वप्नाळू डोळ्यांनी स्वत:लाच न्याहाळणारा मुग्ध आसमंत. काळ वसंताच्या पहिल्या चाहुलीचा.
21 January, 2012 05:30:00 AM
तिनशे रुपयांचं तिकीट लावूनही हर्बेरियमचे प्रयोग ‘हाउसफुल्ल’ ठरले. मराठी रंगभूमीला प्रेक्षक मिळत नाहीत ही ओरड या प्रयोगाने खोटी पाडली. मराठी रंगभूमीची व्यावसायिक गणितं बदलून टाकणा-या या बर्वेप्रयोगाची आता सांगता होत आहे. ...
21 January, 2012 05:30:00 AM
पौगंडावस्थेतल्या मुलांच्या भावविश्वाचं लोभस चित्रण मिलिंद बोकील यांच्या ‘शाळा’ या पुस्तकातून वाचायला मिळतं. ही आगळीवेगळी ‘शाळा’ तितक्याच संवेदनशीलतेने पडद्यावर साकारली आहे दिग्दर्शक सुजय डहाकेने. कालच्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला मान्यवरांनी यापूर्वीच पसंतीचं प्रशस्तिपत्रक दिल्यामुळे सुजय सुखावलाय. ...
21 January, 2012 05:30:00 AM
माझ्या आयुष्यातला मी स्वतंत्रपणे केलेला पहिला पदार्थ म्हणजे खिचडी आणि टोमॅटोचं सार. तोच नेमका फसला होता. त्या प्रसंगावरून माझे मित्र आजही मला चिडवतात. ...
14 January, 2012 04:30:00 AM
हिंदी चित्रपटसृष्टी या वर्षीचे ब्लॉकबस्टर कुठले असतील, याचं गणित मांडण्यात गुंतलेली असताना मराठी चित्रपटसृष्टी मात्र यंदा तरी यशाचं गणित नेमकं कसं सोडवायचं, याच विवंचनेत आहे. महिन्याकाठी भारंभार सिनेमे याही वर्षी येतील, पण चित्रपटसृष्टीला संजीवनी देणारं यश यावर्षी तरी गवसेल?...
14 January, 2012 04:30:00 AM
मराठीत सुपरस्टार म्हणवले जाणारे नट मोजकेच. ज्यांच्या नावावर हमखास गल्ला जमा होईल (निदान ग्रामीण भागात तरी) असे भरत जाधव, संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव ही त्रयी यंदा काय करतेय? ...
14 January, 2012 04:30:00 AM
क्रिकेट आणि हिंदी सिनेमांतली गाणी.. भारतासारख्या खंडप्राय देशाला एकसंध ठेवणारे दोन महत्त्वाचे घटक. त्यातही गाण्यांना तर प्रत्येकाच्या भावविश्वाचा अविभाज्य घटक होण्याचं भाग्य लाभलं. जी गाणी चटकन ओठी रुळतात ती भरपूर लोकप्रिय होतात, पण?अनेक गाणी अशीही आहेत, जी सुश्राव्य असूनही लोकप्रिय गाण्यांच्या पहिल्या फळीत येत नाहीत. अशा गाण्यांचं सौंदर्य उलगडून दाखवणारं हे नवं सदर...
14 January, 2012 04:30:00 AM
गेल्या वर्षीच्या आशियाई चित्रपट महोत्सवात गाजलेला ‘शाळा’ हा सिनेमा जानेवारीत प्रदर्शित हाते आहे. ...
14 January, 2012 04:30:00 AM
चॅनेलचं सध्याचं चित्र पाहाता याही वर्षात रिअॅलिटी शोज्चं पारडं जड असेल, असं चित्र आहे. ‘सव्र्हायवल इंडिया’, ‘एम टीव्ही रोडीज्’, ‘वीणा का स्वयंवर’, ‘सारेगमप सेलिब्रिटी स्पेशल’ या रिअॅलिटी शोज् पाठोपाठ आता ‘क्रिकेट’ या खेळावरही रिअॅलिटी शो येत आहे. ...
14 January, 2012 04:30:00 AM
अॅक्शन ओरिएंटेड कार्टुन मालिकांसाठी बच्चेकंपनीत ‘डिस्ने एक्सडी’ वाहिनी लोकप्रिय आहे. या नवीन वर्षात ही वाहिनी आता प्रत्येक प्रांतातल्या भाषेतून कार्यक्रम दाखवणार आहे....