PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: रिलॅक्स दर्जेदार भूमिका करायच्या आहेत! - मृणाल दुसानीस ================================================================================ संध्या धुरी on 04 May, 2012 05:50:00 AM 'माझिया प्रियाला प्रीत कळेना..' या मालिकेनंतर मृणाल दुसानी 'तू तिथे मी' मधून मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या संदर्भात मृणालसोबत केलेली बातचीत... ‘एलिझाबेथ’ : एका फुलपाखराची गरुडझेप ================================================================================ यशवंत रांजणकर on 05 May, 2012 05:45:00 AM 1553 मध्ये इंग्लंडचा राजा आठवा हेन्री वारल्यावर त्याचा व्याधिग्रस्त पुत्र सहावा एडवर्ड यानं मृत्युपूर्व अगदी थोड्याच काळासाठी राज्योपभोग घेतला आणि मग हेन्रीची ज्येष्ठ कन्या मेरी (‘ब्लडी’ क्वीन मेरी) सिंहासनाधिष्ठित झाली. या कट्टर कॅथलिक राणीच्या मृत्यूनंतर तिची प्रोटेस्टंट सावत्र बहीण एलिझाबेथ राज्यावर आली. इंग्लंडच्या सुवर्णयुगाची विधाती म्हणून इतिहासात ख्यातकीर्त झालेली हीच ती पहिली एलिझाबेथ राणी. एकटाच ================================================================================ विनम्र आचरेकर on 05 May, 2012 05:35:00 AM मुंबई.. एक महानगर, माणसांचं,चेह-याचं महानगर. या गर्दीच्या महानगरात हरवलेलं एकटेपण शोधण्याचा, अंहं, टिपण्याचं ठरवलं आणि त्यातूनच साकारली ही निवडक चित्रं. संहितेमागची कहाणी ================================================================================ राजेश शिरभाते on 28 April, 2012 04:30:00 AM बहुसंख्य मराठी चित्रपट लेखनाच्या बाबतीत ढिसाळ असल्याची टीका आमच्यावर अन्याय करणारी आहे, असं लेखकांचं म्हणणं असतं. कधी कधी चांगल्या कथेत इतके घटक आपापली मते व्यक्त करत असतात की, लेखकाची मूळ कथा बाजूला सारली जाऊन एक वेगळीच कथा निर्माण होते. चित्रपटाशी संबंधित या अत्यंत महत्त्वाच्या पैलूंबाबत निर्माता, दिग्दर्शक आणि स्वत: लेखकाशी बोलून या विषयाचा वेध घेतलेला वेध.. इरफान आता हॉलीवुडस्टार ================================================================================ शॅल शिरॅको on 28 April, 2012 04:10:00 AM इरफानने ‘इन ट्रीटमेन्ट’ नावाची एक मालिका अमेरिकेत केली होती. ती पाहिल्यावर मार्क वेबने स्वत: इरफानच्या एजंटशी संपर्क साधून त्याचा फोन नंबर मिळवला आणि मग इरफानशी थेट बोलून ही भूमिका करण्याची त्याला विनंती केली. ‘जॅक’ ऑफ ऑल रोल्स.! ================================================================================ सिद्धार्थ खांडेकर on 28 April, 2012 04:05:00 AM हॉलिवुडमधील विख्यात अभिनेता जॅक निकल्सन परवा 22 एप्रिलला 75 वर्षाचा झाला. गेली पाच दशकं त्यानं विविध भूमिका ताकदीनं रंगवून हॉलिवुड सिनेरसिकांवर गारूड केलं. अजूनही तो संपलाय असं म्हणायला लेखणी धजावत नाही. दुनिया से जीते पर तुझसे हारे.. ================================================================================ रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ on 28 April, 2012 05:00:00 AM आपण कोणत्याही रसाच्या, मूडच्या ‘अंदाज’च्या गाण्याचा विचार केला तरी देवच्या सिनेमातली ढीगभर उत्तम गाणी आपल्याला सापडतात. आज आपण एका अशा गीतकाराला भेटणार आहोत, ज्याचे देवशी अभिन्न नाते आहे. त्याचे नाव नीरज.. जिवाची बैलजोडी.. ================================================================================ गिरीश सावंत on 28 April, 2012 04:45:00 AM शेतकरी आणि त्याच्या गुरांमध्ये भावनिक बंध असतो. याची अनुभूती ग्रामीण भागात पावलोपावली मिळत असते. पण शहरीकरणाच्या मोहजालातही ही भावना जपण्याचे काम या महोत्सवाच्या निमित्ताने होत होते. वचनपूर्तीचा कोकणी ‘पीरियड ड्रामा’ ================================================================================ वैभव शिरवडकर on 28 April, 2012 04:00:00 AM उषा दातार यांच्या चार पानी ‘काकस्पर्श’ या लघुकथेवर आधारित ‘काकस्पर्श : एक विलक्षण प्रेमकहाणी’ हा चित्रपट चार मे रोजी प्रदर्शित होत आहे. कावळा पिंडाला शिवावा म्हणून दिलेल्या वचनानुसार वागणारी एक सर्वसामान्य कोकणस्थ ब्राह्मण व्यक्ती आणि तिचं कुटुंब यांच्याभोवती फिरणारी ही कथा आहे. वरणाची भाजी ================================================================================ प्रतिमा जाधव on 28 April, 2012 03:50:00 AM संध्याकाळी सगळेजण जेवायला बसलो तेव्हा कळलं की ते वरण शिजलेलंचं नाही. समोर आलेली कच्ची ‘वरणाची भाजी’ पाहून सगळेच अवाक झाले. मग आयत्यावेळी बाहेरून जेवण मागवावं लागलं.