PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: रिलॅक्स ‘भद्रकाली’ तिशीत! ================================================================================ समीर करंबे on 28 April, 2012 03:30:00 AM ‘भद्रकाली’ने मालवणी माणसाच्या वृत्ती-प्रवृतीचं दर्शन घडवणारी नाटकं देतानाच अनेक सामाजिक समस्यांवरही प्रकाश टाकला. ‘चाकरमानी’मधून त्यांनी मुंबईत पोटापाण्यासाठी जाणा-या कोकणी माणसाला गावामध्ये राहण्याचा संदेश होता, ‘घास रे रामा’ मध्ये घरगड्यांच्या शोषणाचा मुद्दा होता, ‘अग्निदिव्य’मध्ये हुंडाबळीचा प्रश्न होता, तर ‘येवा कोकण आपलाच असा’मध्ये परप्रांतीयांच्या आक्रमणाचा विषय हाताळण्यात आला होता. या नाटकांतून ‘भद्रकाली’ची सामाजिक जाणीवच दिसून आली. दोघा खेळीयांनी ================================================================================ चिंतामणी भिडे on 21 April, 2012 04:30:00 AM सहा वर्षात अवघे तीन, तेही वेगवेगळय़ा पठडीतील चित्रपट देणारा दिग्दर्शक विजू माने, ‘शर्यत’सारख्या तद्दन व्यावसायिक चित्रपटानंतर आता ‘खेळ मांडला’मधून अतिशय संवेदनशील, हळवा विषय हाताळत आहे. बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणारा दासू आणि त्याला रस्त्यावर सापडलेली आंधळी मूकबधिर तान्ही मुलगी यांच्यातल्या भावबंधावर आधारित या चित्रपटाने ‘मामि’, ‘थर्डआय’ ‘पिफ्फ’ हे तीन्ही आंतरराष्ट्रीय चित्रपट गाजवण्याबरोबरच मुख्य भूमिकेकरता मंगेश देसाईला ‘थर्ड आय’मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळवून दिला. प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या या चित्रपटानिमित्त दिग्दर्शक-अभिनेत्याच्या या जोडीशी मारलेल्या गप्पा पृथ्वीचा बॅकअप घेणे आहे ================================================================================ कमलाकर नाडकर्णी on 21 April, 2012 05:20:00 AM नाटककार हिमांशू स्मार्त यांच्या नाटकातून प्रकट होत असलेल्या कल्पना भेदक, अत्याधुनिकतेचे परिणाम प्रकट करणा-या आहेत, दडलेला अर्थ उघड करणाऱ्या आहेत, यात शंकाच नाही; पण त्यांची नाटकाची वीण घट्ट नाही. उत्तरार्धात ती सैलसर होत पसरत जाते आणि त्यातल्या कृती वा विचार पुनरावृत्तीत होत राहातात, आशयाला छेद देतात, कंटाळवाणेपणाकडे झुकतात. यंदा मी दिग्दर्शकाच्या भूमिकेत.. ================================================================================ लोकेश गुप्ते on 21 April, 2012 05:30:00 AM गेल्या काही दिवसांपासून मी एका चित्रपटाचं लिखाण करत आहे. त्याचं जवळपास 90 टक्के लेखन पूर्ण होत आलंय. पंधरा-सोळा वर्षाच्या मुलापासून ते साठ वर्षाच्या माणसापर्यंत, तो स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकाला आपला वाटेल, असा हा विषय आहे. प्रत्येक वयोगटातला माणूस या चित्रपटात रमेल. या चित्रपटाचं दिग्दर्शनही मीच करणार आहे. मुख्य भूमिकेत सुबोध भावेला घेण्याची इच्छा आहे. तारखा आणि वेळांचं गणित जुळून यायला हवं. या चित्रपटाच्या चित्रिकरणाला ऑगस्टपासून सुरुवात होईल. हा खेळ सावल्यांचा ================================================================================ संदेश घोसाळकर on 21 April, 2012 06:15:00 AM ‘सिल्हौट’ म्हणजे सूर्यप्रकाशाच्या विरुद्ध दिशेने वस्तूविषय टिपणं. त्यामुळे छायाचित्राचं जे सब्जेक्ट आहे ते एखाद्या सावलीसारखं दिसतं. मावळतीला संधीप्रकाश पसरल्यावर मनाची जी कातर अवस्था होते, तसाच काहीसा अनुभव ही छायाचित्रं देतात. गडद काळोखी रात्र ================================================================================ रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ on 21 April, 2012 05:10:00 AM गीतकार, गायक, संवादलेखक, सहदिग्दर्शक - स्वानंदच्या प्रतिभेचे इतके सारे आविष्कार आपल्यासमोर अल्यावधीतच आले आहेत. गीतलेखनाच्या पहिल्या दशकातच त्याने दोन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत, या सा-या त्याच्या उज्ज्वल वाटचालीच्या पाऊलखुणाच आहेत. किशोरकुमारसारखी चतुरस्त्र कामगिरी तो बजावेल, अशी आशा चित्रपटरसिक त्याच्याविषयी बाळगून आहेत. ऑलिव्हियाची ‘द एअरेस’अभिजात अभिनयाचा आदर्श आविष्कार ================================================================================ यशवंत रांजणकर on 21 April, 2012 05:45:00 AM दिसायला अत्यंत सामान्य, कमालीची लाजरीबुजरी, आत्मविश्वास नसलेली, अवघडल्यागत वागणारी, उच्चभ्रू वर्गातल्या चालीरीतींबाबत बरीचशी अनभिज्ञ अशी कॅथरिन एक प्रौढ कुमारिका आहे. वडलांवर अत्यंत प्रेम. त्यांच्यासाठी काही ना काही करण्यासाठी, त्यांनी आपली दखल घ्यावी, यासाठी तिची सतत धडपड चालते. भरतकाम हा तिचा फावल्या वेळेचा छंद. आणि फावला वेळ तसा तिच्यापाशी भरपूरच असतो. तिला उच्चभ्रू चालीरीतींचं शिक्षण मिळण्याचे डॉक्टरांचे प्रयत्न व्यर्थ गेले आहेत. ती साधी आणि बुजरीच राहते. मल्लिकाचे हिस्स.. फिस्स ================================================================================ शॅल शिरॅको on 21 April, 2012 06:00:00 AM मल्लिका जॅकी चॅनच्या चित्रपटातील दुर्लक्षित राजकन्या असल्याच्या आविर्भावात सेटवर हिस्स..फिस्स.. असे फुस्कारत नखरे दाखवायची ते वेगळेच, असे सारे नुसते तोंडाने सांगून दिग्दर्शक जेनिफर लिंच गप्प बसलेली नाही, तर ‘हिस्स..’चा मल्लिकामुळे फियास्को कसा झाला, यावर तिने ‘डिस्पाइट द गॉड्स’ या माहितीपटात अगदी सदृश्य प्रकाश टाकला आहे. मसालाकिंग्ज ================================================================================ चिंतामणी भिडे on 14 April, 2012 04:30:00 AM ‘मराठी चित्रपटांचे दोन प्रकार असतात - चालणारा सिनेमा आणि कुलकण्र्याचा सिनेमा’ - कुठल्याशा पुरस्कार सोहळ्यांत विनोदाच्या नावाखाली अशी खिल्ली उडवण्यात आली होती. पण पुण्याच्या दोन कुलकर्ण्यांनी चित्रपट केवळ चालवूनच दाखवला नाही, तर राष्ट्रीय पुरस्कारांपर्यंत झेप घेण्याच्या कलात्मक उंचीचा बनवला आणि ‘श्वास’नंतर पुन्हा एकदा मराठीला राष्ट्रपतींचं सुवर्णकमळ मिळवून दिलं. उमेश आणि गिरीश या कुलकर्ण्यांना आता संदेश हा तिसरा कुलकर्णी येऊन मिळालाय. त्यांच्या आगामी ‘मसाला’ या चित्रपटानिमित्त या तिघांशी मारलेल्या या मनमोकळ्या गप्पा.. पिकल्या पानातील हिरवेपणाची व्यथा ================================================================================ रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ on 14 April, 2012 04:55:00 AM प्रेम हा हिंदी चित्रपटांचा प्राणवायू आहे, हे आपण जाणतोच. ‘हलवाई’ कुशल असेल तर या प्रेमरसाची गोडी वारंवार चाखूनही आपण कंटाळणार नाही. स्त्री-पुरुष नात्याची फेरमांडणी करणा-या अलिकडच्या काळातील एका चित्रपटात प्रेमाचे एक आगळे रूप आपल्याला पाहायला मिळाले. 2010 सालचा हा चित्रपट आहे ‘इश्किया’.