PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: रिलॅक्स ‘विजय दिनानाथ चौहान’ मराठीत साकारायचाय! ================================================================================ (शब्दांकन : संध्या धुरी) on 07 April, 2012 04:30:00 AM मी प्रसाद ओक स्वत: इतक्या विविध प्रकारची कामं करत असलो तरी मला दोन ड्रीम रोल साकारायचे आहे. पैकी पहिला असेल ‘पुरुष’ नाटकातील नाना पाटेकरांनी साकारलेली गुलाबरावची भमिका. ती साकारण्याची संधी, तीही चंद्रकांत कुलकर्णीच्या दिग्दर्शनाखाली मिळाली मी स्वत:ला खूपच भाग्यवान समजेन. दुसरा ड्रीम रोल आहे ‘अग्नीपथ’मध्ये अमिताभ बच्चन यांनी साकारलेला ‘विजय दिनानाथ चौहान’. अशी भूमिका वठवताना नटाचा किती कस लागू शकतो, ते अनुभवायचं आहे. प्रयोगकलांच्या अभ्यासासाठी आणि आस्वादनासाठीही ================================================================================ कमलाकर नाडकर्णी on 07 April, 2012 04:30:00 AM भारतात विद्यापीठीय स्तरावर कलाशिक्षण सुरू होऊन काही वर्षे लोटली तरी अद्यापपर्यंत या शिक्षणासाठी पाठ्यपुस्तके उपलब्धच झाली नव्हती. ही त्रुटी पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राने नुकतीच भरून काढली. प्रयोगकलांवरील मार्गदर्शक अशी नऊ पाठ्यपुस्तके तज्ज्ञ मंडळीकडून तयार करून घेऊन ती गेल्याच आठवड्यात पुण्यात प्रकाशित झाली. मराठी भाषेतून लिहिली गेलेली ही पाठ्यपुस्तके प्रयोगकलांवरची पहिली पाठ्यपुस्तके आहेत. या पुस्तकांच्या गुणवत्तेमुळे अन्य भाषेतही या पुस्तकांचा अनुवाद करण्याचे काम सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांनाच नव्हे तर आस्वादकांना आणि समीक्षकांनाही ही पुस्तके मार्गदर्शक ठरू शकतील. हॉलिवुड मसाला ================================================================================ शॅल शिरॅको on 07 April, 2012 04:30:00 AM अरनॉल्ड श्वार्त्झेनेघरचा ‘टोटल रिकॉल’ आठवतोय का? आता हा चित्रपट पुन्हा बनवला जातोय... कॅटचं सांगायचं तर सध्या तिचं रसेल ब्रँडबरोबर बिनसलंय आणि हा फोटो जरा निरखून पहा.. सामाजिक विषयांमधलं नाट्य! ================================================================================ प्रहार on 07 April, 2012 04:30:00 AM वेगळ्या विषयावरची वाटावीत अशी दोन मराठी नाटकं गेल्या आठवड्यात रंगभूमीवर आलीत. पहिलं नाटक आहे दिलीप जाधव यांच्या ‘अष्टविनायक’या संस्थेचं ‘अहो! राहू द्या नं घरी..’ तर दुसरं आहे दर्शना सावंत यांच्या ‘अश्वमेध प्रॉडक्शन’चं ‘यडुकेशन’. ‘चांगल्या भूमिकांबाबत हट्टी’ ================================================================================ मुलाखत-राजेश शिरभाते on 31 March, 2012 05:30:00 AM गेल्या काही चित्रपटांमधून त्यांनी मॅच फिक्सिंग, पॉर्न इंडस्ट्री, विवाहबाह्य संबंध असे काही वादग्रस्त विषय हाताळले, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांचा नवा ‘ब्लडमनी’ कालच प्रदर्शित झाला. यात भट्ट यांच्या लाडक्या इम्रान हाश्मीऐवजी कुणाल खेमू आहे. इतकंच नव्हे तर भट्ट कंपनी आता इम्रान ऐवजी कुणाललाच प्रमोट करणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे. केवळ इम्रानवर अवलंबून नाही! ================================================================================ मुलाखत-राजेश शिरभाते on 31 March, 2012 05:30:00 AM महेश भट्ट हे अनेक व्यक्तिमत्वांची सरमसळ असलेलं व्यक्तिमत्व. ‘अर्थ’ आणि ‘सारांश’वाले महेश भट्ट खरे मानायचे की, ‘मर्डर’ आणि ‘जिस्म’वाले, ‘नाम’, ‘कब्जा’, ‘सडक’वाले महेश भट्ट आणि ‘हम है राही प्यार के’, ‘दिल है की मानता नही’वाले महेश भट्ट यांच्यातला समान धागा कोणता, इतके विविधांगी सिनेमे देणारे महेश भट्ट गेली काही वर्ष सातत्याने यशस्वी, पण परदेशी चित्रपटांची सही सही नक्कल असलेले सिनेमे का बनवत आहेत, असे अनेक प्रश्न त्यांच्या चाहत्यांना आणि मीडियालाही पडतात. आपल्या प्रत्येक कृत्याला तत्त्वाचा मुलामा चढवण्याच्या त्यांच्या सवयीमुळे ‘स्युडो इंटलेक्च्युअल’ अशी त्यांची हेटाळणीही होते. मात्र, गेल्या काही चित्रपटांमधून त्यांनी मॅच फिक्सिंग, पॉर्न इंडस्ट्री, विवाहबाह्य संबंध असे काही वादग्रस्त विषय हाताळले, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांचा नवा ‘ब्लडमनी’ कालच प्रदर्शित झाला. यात भट्ट यांच्या लाडक्या इम्रान हाश्मीऐवजी कुणाल खेमू आहे. इतकंच नव्हे तर भट्ट कंपनी आता इम्रान ऐवजी कुणाललाच प्रमोट करणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे. मखमली पोताचे गाणे ================================================================================ रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ on 31 March, 2012 05:30:00 AM गाण्यात तीन-चारदा काही क्षणांपुरती दिसणारी नूतन - तिचे भावोत्कट डोळे, प्रेमाच्या अनपेक्षित वर्षावामुळे तिचे क्षणभर दिडमूढ होणे व नंतर हे प्रेम झेलण्यात आपला पदर असमर्थ आहे, असे वाटून तिचे पिळवटणारे अंत:करण, बंद खिडकीबाहेर घोंघावू पाहणा-या वादळाची पूर्वसूचना. हे सारे सारे प्रतिबिंबित करणारा तिचा विलक्षण बोलक, रेखीव चेहरा - या सा-याला आपण पारखे होऊ. तरीही हे गाणे प्रामुख्याने मजरूह-तलत-बर्ममनदांचेच. वास्तव-कल्पिताचा जीवघेणा संघर्ष अ डबल लाइफ ================================================================================ यशवंत रांजणकर on 31 March, 2012 05:30:00 AM धुरंधर अभिनेत्याऐवजी टोनीच्या भूमिकेसाठी प्रथम तितकाच धुरंधर नटश्रेष्ठ लॉरेन्स ऑलिव्हिए याचा विचार करण्यात आला होता. कारण शेक्सपीयर-रंगभूमीत त्याची पाळंमुळं खोलवर गेली होती. काय असेल ते असो, ती भूमिका अखेर पिकल्या फळागत कोल्मनच्याच पदरी पडली आणि त्यानं तिचं सोनं केलं. इतकंच नव्हे तर त्या ‘सोनिया सुगंधु’ही आणला. लाखमोलाची पोस्टर्स ================================================================================ शॅल शिरॅको on 31 March, 2012 05:30:00 AM पूर्वी आधी लावलेल्या पोस्टर्सवरच नवीन चित्रपटाची पोस्टर्स लावली जायची, वा आधीची भिंतीवरून टरकावून भिरकावली जायची. यामुळे अवघ्या काही प्रतीच उपलब्ध असलेल्या या पोस्टर्सना संग्राहकांनी लाखमोलाचा भाव द्यावा, यात नवल ते काय! विपरीत अर्थनिर्णयाचा ‘कॉम्रेड कुंभकर्ण’ ================================================================================ कमलाकर नाडकर्णी on 31 March, 2012 05:30:00 AM दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय यांचा रामायणाकडे पाहण्याचा परस्परविरोधी दृष्टिकोन यातून समोर येतो. निकंबंचं वा पेरियारांचं दक्षिणी रामायण यांची पुसटशी ओळखही या नाटकातून होते. नाटककार कुठल्याही रामायणाची बाजू घेत नाही वा समर्थनही करीत नाही. दबलेल्यांचा आवाज कानावर घालण्यापलीकडे नाटककार कसलीही भलामण करीत नाही. नाटकातल्या नाटकाचं एक चित्र आणि त्या बाहेरचं एक चित्र, अशी दोन चित्रंच तो प्रेक्षकांसमोरच ठेवतो.