PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: रिलॅक्स डिजिटल किमया.. ================================================================================ राजेश शिरभाते on 24 March, 2012 05:00:00 AM डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केवळ चित्रपट किंवा मालिकांच्या निर्मितीसाठीच नाही, तर प्रक्षेपणातही होऊ लागला आहे. यूएफओसारख्या तंत्रज्ञानाने तर चित्रपट वितरणाची दिशाच बदलली. पण आता हे तंत्रज्ञानही जुनं वाटावं, इतके बदल दिवसागणिक होत आहेत. त्याचाच वेध घेण्याचा हा प्रयत्न.. यमुनाकाठची लैला ================================================================================ रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ on 24 March, 2012 05:00:00 AM हिंदुत्ववाद व जागतिकीकरणाच्या लाटांमुळे आपल्या सांस्कृतिक संचितातील काही महत्त्वाच्या गोष्टी लोप पावल्या किंवा नजरेआड गेल्या. उदाहरणार्थ उत्तर भारतात लोक परस्परांना भेटल्यावर ‘जय सियाराम’ म्हणून अभिवादन करीत. बाबरी मशिदीसोबत श्रीरामाशी एकजीव झालेली सीतामाईही पुन्हा वनवासात धाडली गेली. उरला फक्त ‘जय श्रीराम’चा घोष. त्याचप्रमाणे हिंदी चित्रपटातून दोन गोष्टीही जवळजवळ दिसेनाशा झाल्या. एक म्हणजे ‘मुस्लिम सोशल’ नावाचा चित्रपटप्रकार आणि दुसरी कव्वाली हा सदाबहार गीतप्रकार. ख-या चित्रपट रसिकाला या दोन्ही बाबींचे अपरंपार दु:ख होत असणार, यात शंकाच नाही... लोकाभिमुख, अभिरूचीसंपन्न ================================================================================ समीर करंबे on 24 March, 2012 05:00:00 AM ही सगळी नाटकं निव्वळ मनोरंजन करणारी नाहीत. ती प्रचारकी किंवा काहीतरी संदेश देणारीही नाहीत. ती समाजातील प्रवृत्तीवर प्रहार किंवा भाष्यही करणारी नाहीत. ती केवळ माणूसपण अधोरेखित करणारी आहेत. मानवी मनाचे वेगवेगळे कंगोरे उलगडून दाखवणारी आहेत. साध्या साध्या गोष्टीतून माणसाला पडणारे प्रश्न, त्यांनी त्याच्या जीवनात, भावविश्वात कसा पेच निर्माण केलाय, एवढीच गोष्ट ती सांगतात. गांधींच्या तत्त्वांचं स्मरण ================================================================================ संध्या धुरी on 24 March, 2012 05:00:00 AM सदाशिवला त्याचे वडील गांधीजींच्या तीन माकडांची प्रतिकृती भेट देतात. ती घेऊन तो शाळेत येतो, त्याचा मित्र सुन्याला दाखवण्यासाठी. सुन्याला पाहिल्यावर तो ओरडतो, ‘सुन्या, मैं नथुराम गोडसे के परिवार से नही हूँ।’ लोकरंगभूमीवर काम करायचंय! ================================================================================ निर्मिती सावंत on 24 March, 2012 05:00:00 AM मी राजेशला आजच्या पिढीला भावणारं नाटक लिहिण्यास सांगितलं. त्यानंतर मध्ये बराच काळ गेला. एक दिवस राजेशचा फोन आला, ‘नाटकाचं स्क्रिप्ट तयार आहे.’ ते मी वाचलं आणि मला फार आवडलं. आजच्या पिढीशी संवाद साधणारं ते नाटक आहे. अ आ आई.. ================================================================================ संदेश घोसाळकर on 24 March, 2012 05:00:00 AM माणसाच्या तुलनेत प्राण्यांची पिल्लं लवकर स्वत:च्या पायावर उभी राहातात आणि स्वतंत्रपणे जगू लागतात; पण म्हणून मातृत्वाची भावना पातळ होत नाही. हॉलिवुडमध्ये वेगळीच हंगर! ================================================================================ सिद्धार्थ खांडेकर on 24 March, 2012 05:00:00 AM ‘द हंगर गेम्स’ या तीन भागांतील कथानकातल्या पहिल्या भागावर कादंबरी आलीये आणि लगेचच त्यावर त्रिचित्रधाराही येऊ घातली आहे. हा लेख प्रसिद्ध होईल, त्याच्या आदल्या रात्री म्हणजे शुक्रवारी ‘द हंगर गेम्स’ भारतासह जगभर प्रदर्शित होतोय. पण हा काही जादूपट किंवा भूतपट नाही. फँटसीपट आहे. नि त्याला भविष्यात कल्ट सिनेमाचं बिरूद चिकटू शकेल, इतक्या वेगळ्या प्रकारचा आहे. गंदा है पर धंदा है! ================================================================================ राजेश शिरभाते on 17 March, 2012 07:30:00 AM मॅचफिक्सिंगसाठी क्रिकेटपटूंना जाळ्यात ओढण्यासाठी एका ‘बॉलिवुड ब्यूटी’चा वापर करण्यात आल्याचा गौप्यस्फोट लंडनच्या ‘द संडे टाइम्स’ने केला आणि ग्लॅमरच्या या झगमगाटी दुनियेची काळी बाजू पुन्हा एकवार समोर आली. पोलिसांनी सेक्स रॅकेट उद्ध्वस्त करून पोलिसांनी अभिनेत्रींना ताब्यात घेतल्याच्या बातम्या अधूनमधून वाचायला मिळतच असतात. मनोरंजनाच्या क्षेत्रात प्रसिद्धी आणि ग्लॅमरबरोबरच अमाप पैसा असूनही नटनटय़ांना या वाकडय़ा वाटेकडे का वळावसं वाटतं, याचा हा लेखाजोखा.. अस्तावणा-या चंद्राला थांबव ना! ================================================================================ रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ on 17 March, 2012 08:00:00 AM गुलजारच्या चित्रपटातील त्याची गीते अशा वेळी आशयाशी नुसती एकरूप होत नाहीत, तर आशयाला अधिक व्यापक व सखोल बनवितात. पण ‘आंधी’मधलं सर्वोत्तम गीत म्हणजे ‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं’ हेच होय. ‘सत्यशोधक’ निर्मळ, नेटका, लक्षणीय, पण.. ================================================================================ कमलाकर नाडकर्णी on 17 March, 2012 08:15:00 AM दोन दशकांनंतर ‘सत्यशोधक’ पुन्हा करताना त्यातील वैचारिकतेवरच अधिक भर देणं गरजेचं होतं. बादल सरकारांच्या नाटकातूनही नाच-गाणी होती आणि समूहाची आकृतीबंधनं होती; पण त्या रूपबंधाने त्यातील वैचारिकतेवर कधी कुरघोडी केली नाही.