PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: रिलॅक्स रंगोत्सव ================================================================================ अतुल मळेकर on 17 March, 2012 09:15:00 AM थोडय़ावेळाने माझ्या नजरेला एक सुंदर दृश्य दिसलं. जणू पावसाच्या सरीसारखी गुलालाची सर नाचणा-यांच्या अंगावर पडत होती. हे दृश्य मी पटकन टिपलं कारण पुन्हा असं छायाचित्र मिळेल, याची शाश्वती नव्हती. अभिनय राजघराण्याचा खंदा खानदानी वारसदार ================================================================================ यशवंत रांजणकर on 17 March, 2012 08:10:00 AM अभिनयाच्या बाबतीत विलक्षण विचक्षण असलेल्या जॉन बॅरीमोरचं एक मोठं स्वप्न होतं. शेक्सपीयरच्या ‘मॅक्बेथ’वर एक चित्रपट व्हावा आणि त्यात आपल्याला आपल्या कल्पनेनुसार भूमिका करायला मिळावी. कॅनिननं असा प्रकल्प हाती घ्यावा म्हणून तो त्याला आग्रह करायचा; आपली संकल्पना तो त्याच्याकडे मांडी... ‘मधली सुट्टी’म्हणजे मुलांचं ‘रिलॅक्स झोन’च! ================================================================================ संध्या धुरी on 17 March, 2012 08:40:00 AM मुलांच्या भावविश्वावर आधारित ‘मधली सुट्टी’ कार्यक्रम अबालवृद्धांच्या पसंतीस उतरत आहे. त्यानिमित्ताने कार्यक्रमाचा मूळ सूत्रधार आणि सूत्रसंचालक सलील कुलकर्णी यांच्याशी मारलेल्या गप्पा. विरघळलेल्या शंकरपाळ्या ================================================================================ अपूर्वा नेमळेकर on 17 March, 2012 08:25:00 AM एकदा ऐन दिवाळीत मी तिला दुप्पट मेहनत करायला भाग पाडलं. त्याचं कारण होतं शंकरपाळ्या. तिने मला मापून शंकरपाळ्यांचं साहित्य काढून दिलं होतं. पीठ मळायला म्हणून गेले, पण ते जरा जास्तच सैल झालं होतं. मोठ्या पडद्यावरून छोट्या पडद्यावर ================================================================================ चिंतामणी भिडे on 10 March, 2012 08:30:00 AM प्रेक्षकांची पसंती लाभलेले चित्रपट प्रदर्शनानंतर अल्पावधीतच वाहिन्यांवर झळकण्याचा ट्रेण्ड हिंदीप्रमाणेच मराठीतही सुरू झालाय. आधीच तुटपुंजा प्रेक्षक लाभणा-या मराठी चित्रपटांवर त्याचे काय परिणाम होतील? थिएटरमध्ये जाणा-या प्रेक्षकांच्या संख्येत घट होईल काय? आणि तसं झालं तर सॅटेलाइट राइट्सवर काय परिणाम होतील? यशामागची ‘कहानी’ ================================================================================ राजेश शिरभाते on 10 March, 2012 08:30:00 AM ‘द डर्टी पिक्चर्स’च्या घवघवीत यशानंतर विद्या बालनचा भाव वधारला, त्याचा भरपूर फायदा तिच्या काल प्रदर्शित झालेल्या ‘कहानी’ला होत आहे. स्मॉल बजेट फिल्म असलेल्या ‘कहानी’ला एरवी इतकी प्रसिद्धी मिळाली नसती; पण मध्यवर्ती भूमिकेतल्या विद्यामुळे ‘कहानी’विषयी वेगळं औत्सुक्य आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्याशी केलेली बातचीत.. मी हाय होळी, कोकणची होळी ================================================================================ संजय राणे on 10 March, 2012 08:30:00 AM पहिल्या दिवशीच्या भ्रमंतीत होळीला लगडलेल्या नारळांवरून पुढच्या पाच दिवसाची कल्पना आली. या होळीला प्रदक्षिणा घालण्याचा कार्यक्रम असतो. यावेळी वाजविल्या जाणा-या ढोलांचा ताल धीरगंभीर असतो. ऑस्कर अपेक्षित.. सोहळा अनपेक्षित! ================================================================================ सिद्धार्थ खांडेकर on 10 March, 2012 08:30:00 AM ऑस्कर पुरस्कारात निराळा विरोधाभास पाहायला मिळाला. ऑस्कर बरेचसे, किंबहुना सर्वच हॉट फेवरिट मंडळी किंवा कलाकृतींनाच मिळाले. पण सोहळ्यानं अपेक्षाभंग घडवला. पुरस्कारांचा सिक्वेन्स बदलून तो रंगतदार करण्याचा उद्योग फार यशस्वी ठरला नाही. बिली क्रिस्टलचे काही पंचेस, गेल्या वर्षभरात दिवंगत झालेल्यांना श्रद्धांजलीचा भाग वगळता या सोहळ्यानं तशी निराशाच केली. कामात नावीन्य हवंच! ================================================================================ विभावरी देशपांडे on 10 March, 2012 08:30:00 AM साधं-सोप्पं जीवन जगणा-या व्यक्तींच्या आयुष्यात ख्रिश्चन मिशनरींमुळे झालेल्या धर्मातरामुळे, माओवादामुळे जे काही परिणाम होतात; शहरीकरणाशी जेव्हा त्यांच्या नैसर्गिक जीवनाची सरमिसळ होते, तेव्हा त्यांच्यावर कशाप्रकारचे आघात होत जातात, त्याचं अत्यंत प्रभावी चित्रण चित्रपटात पहायला मिळेल. टागोरांच्या प्रेमकथेचा मराठी आविष्कार ================================================================================ समीर करंबे on 10 March, 2012 08:30:00 AM रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्यकृतीवर आधारित ‘चित्रांगदा’ हे नृत्यनाटय़ म्हणजे एक देखणा आविष्कार आहे. नृत्य, नाटय़, शब्द, काव्य, संगीत यांचा एक प्रेक्षणीय, श्रवणीय मिलाफच रवींद्रनाथांच्या ‘चित्रांगदा’ या कादंबरीवर आधारित या नृत्यनाटय़ाच्या रुपानं घडून आलाय. नजाकतदार नृत्यांना कलाकारांच्या सशक्त अभिनयची साथ मिळाल्यावर किती नितांतसुंदर कलाकृती जन्मू शकते, याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.