26 November, 2011 05:30:00 AM
‘हजारों ख्वाहिशे ऐसी’मध्ये ती प्रथम दिसली तेव्हापासूनच ‘प्रती स्मिता पाटील’ हा तिच्यावर बसलेला शिक्का अजून पुसला गेलेला नाही. तिलाही त्यात काही वावगं वाटत नाही. पण स्मिताप्रमाणेच सकस अभिनयाच्या जोरावर ऑफ बीट चित्रपटांमध्ये ठसा उमटवणारी चित्रांगदा आता ‘देसी बॉइज’सारख्या तद्दन व्यावसायिक चित्रपटातही तितक्याच सहजतेने वावरताना दिसतेय. मात्र, समांतर चित्रपटही करतच राहाणार, असं ती सांगते..
26 November, 2011 05:30:00 AM
हिंदी चित्रपटसृष्टी ही खूप बंदिस्त मानली जाते. बाहेरच्यांना इथे प्रवेश मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. असं असताना केवळ प्रवेशच नाही, तर खान साम्राज्याला हादरा देण्याची किमया राजीव भाटिया ऊर्फ अक्षयकुमारने करून दाखवली. इमिटेशन ज्वेलरी विकण्यापासून बँकॉकला शेफ म्हणून नोकरी करण्यापर्यंत प्रेक्षकांच्या या लाडक्या अक्कीने सर्व काही करून पाहिलं. म्हणूनच सामान्य प्रेक्षकांना तो त्यांच्यातलाच एक वाटतो. अक्षय आता ‘देसी बॉइज’मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे. इथेही तो सव्र्हायवलसाठी वाट्टेल ते करायला तयार असणा-या सामान्य तरुणाचीच भूमिका साकारतोय..
...
26 November, 2011 05:30:00 AM
टोकदार सुळे, डोळ्यांतील क्रौर्य, चमकदार कांती, विक्राळ जबडा आणि थरकाप उडविणारा आवाज असं चित्र सर्वाच्याच मनात असताना पिंज-यात सापडलेला बिबटय़ा कमालीचा अगतिक होता. ...
26 November, 2011 05:30:00 AM
प्रशांत दामलेचं ‘सासू माझी ढाँसू’ हे नवं नाटक आज रंगमंचावर येत आहे. या नाटकाच्या निमित्ताने रिमा पहिल्यांदाच रंगभूमीवर विनोदी भूमिका करत आहेत. नावावरूनच हे नाटक ढाँसू विनोदी असणार, हे लक्षात येतं. पण त्याहूनही ते टिपिकल प्रशांत दामले ज्यॉनरचं नाटक आहे....
26 November, 2011 05:30:00 AM
स्त्री वर्गाच्या अश्रूंवर हुकुमी यशाचा फॉर्म्युला राबवल्यानंतर अलका कुबल धार्मिक चित्रपटांकडे वळल्या आणि तो फॉर्म्युलाही त्यांनी यशस्वी करून दाखवला. त्यामुळेच आता त्या तृतीयपंथींवर आधारित चित्रपटाची निर्मिती करत आहेत, हे समजल्यावर कुतूहल वाटणं स्वाभाविक आहे. मात्र, नफ्यातोटय़ाचे गणित न मांडता हा चित्रपट केल्याचं सांगत त्या या चित्रपटामागील भूमिका स्पष्ट करतात....
26 November, 2011 05:30:00 AM
धागेदोरे’ हा चित्रपट समाजातील दुष्ट प्रवृत्तींवर प्रकाश टाकणारा आहे, मात्र रंजकता कमी न करता हा विषय मांडत असल्याचा दावा पटकथालेखकांनी केला आहे. ...
19 November, 2011 05:30:00 AM
ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शक सुबल सरकार यांचे अलिकडेच निधन झाले. केवळ चित्रपटांतील गाणी बसवणारे नृत्यदिग्दर्शक इतकीच त्यांची ओळख नव्हती. शाहीर अमरशेख यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही ते सहभागी झाले होते. त्यामुळेच लहानपणापासून त्यांच्याशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण?झालेल्या मलिका अमरशेख यांनी सुबलदांच्या जागवलेल्या या आठवणी.....
19 November, 2011 05:30:00 AM
बहुसंख्य मराठी नाटकं ही कौटुंबिकतेत, स्त्री-पुरुष नातेसंबंधात आणि फारतर भूतकालीन इतिहासात रमण्यातच धन्यता मानतात.स्वप्नरंजन, आदर्शाचं पूजन आणि भावविवशता हीच आमच्या बहुसंख्य नाटकांची व्यवच्छेदक लक्षणं ठरली. या पार्श्वभूमीवर काही तरुण रंगकर्मीनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर आधी प्रायोगिक आणि मग व्यावसायिक नाटक करणं ही नक्कीच महत्त्वाची घटना आहे. म्हणूनच या नाटकातल्या त्रुटींकडे दुर्लक्ष करावसं वाटतं....
19 November, 2011 05:30:00 AM
लेखक, नाटककार शं. ना. नवरे यांचा 21 नोव्हेंबर रोजी 84 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त, ‘गोष्टीवेल्हाळ शन्ना’ या माहितीपटाचे दिग्दर्शक सुरेंद्र तळोकर यांनी शन्नांच्या आठवणींना दिलेला हा उजळा.....
19 November, 2011 05:30:00 AM
गेल्या कित्येक वर्षापासून नाटकांतून काम केलेली नाहीत. त्याची दोन कारणं आहेत. साऊथमध्ये चित्रपटांच्या कामाचा व्याप वाढला हे कारण त्यामागे आहेच. पण चांगल्या भूमिकांची वानवा हे ही महत्त्वाचं कारण आहे. मात्र, आता पुढल्या वर्षात प्रदीप मुळय़ेंबरोबर एक नाटक करणार आहे. ...