PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: रिलॅक्स वैराग्याची विराणी ================================================================================ रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ on 10 March, 2012 08:30:00 AM प्रेमकथा सा-यांनाच आवडतात. म्हणूनच ‘क्लासिकल’ असो की ‘टिनपाट’, सारेच सिनेमे बहुधा प्रेमाची गोष्ट सांगण्यासाठीच बनवले जातात. त्यामुळे ‘देवदास’ किंवा ‘हीर रांझा’सारख्या, भारतीय जनमानसात रुजलेल्या प्रेमकथांच्या नव्या आवृत्त्या वारंवार निघतात, यात आश्चर्य ते काय? अंडरवर्ल्डचा 'मॅटर' ================================================================================ राजेश शिरभाते on 03 March, 2012 07:30:00 AM मराठी चित्रपटात भवतालच्या वास्तवाचं क्वचितच प्रतिबिंब पडतं, असा आक्षेप नेहमी घेतला जातो. कौटुंबिक रडारड किंवा विनोदाच्या चाकोरीत अडकलेले चित्रपट पाहिले की, हा आक्षेप खराही वाटतो. या पार्श्वभूमीवर मुंबईतील गुन्हेगारी जगताचं चित्रण करणारा ‘मॅटर’ कालच्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. मुंबईतल्या या वास्तवाचा वेध घेणारे चित्रपट हिंदीत खूप आले. ‘सत्या’सारख्या चित्रपटाने तर मापदंड निर्माण?केला. मात्र, या जगताशी इतक्या समीप असलेल्या मराठी चित्रपटांमध्ये मात्र या विश्वाचं प्रतिबिंब कधीच उमटलं नाही. ही कसर ‘मॅटर’ भरून काढू शकेल, असा विश्वास कलाकार आणि निर्माता-दिग्दर्शक व्यक्त करत आहेत. ‘मराठी चित्रपटाची निर्मिती आणि अभिनयही!’ ================================================================================ चिंतामणी भिडे on 03 March, 2012 07:30:00 AM ‘तेरे नाल लव हो गया’च्या निमित्ताने रितेश देशमुख ब-याच कालवधीनंतर ‘सोलो हिरो’वाल्या चित्रपटात झळकला. ‘तुझे मेरी कसम’सारख्या पारंपरिक लव स्टोरीद्वारे चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण करणा-या रितेशने नंतर मल्टिस्टारर कॉमेडीपटांचा मार्ग पत्करला. तिथे तो यशस्वी होत असतानाच त्याचे ‘अल्लादिन’, ‘जाने कहाँ से आयी है’ सारखे ‘सोलो हिरो’ चित्रपट मात्र अपयशी ठरले. त्या पार्श्वभूमीवर ‘तेरे नाल लव हो गया’ त्याच्यासाठी लिटमस टेस्टसारखा होता. त्यात अलिकडेच त्याच्या आयुष्याची जोडीदार झालेली त्याच्या पहिल्या चित्रपटाची नायिका जेनेलिया हिच्यासोबत तब्बल आठ वर्षानी तो एकत्र दिसणार होता. चित्रपटाने पहिल्या आठवडय़ात ब-यापैकी यश मिळवल्यामुळे रितेश सध्या आनंदात आहे. त्याच्याशी केलेली बातचीत.. ‘नाटक नको’ उघडं होणं हवं! ================================================================================ कमलाकर नाडकर्णी on 03 March, 2012 07:30:00 AM तरुणांच्या मनात दडलेला नागडेपणा नाटकातून प्रकट करायला काहीच हरकत नाही; पण त्यात सच्चेपणा हवा आणि सूचकताही हवी. नाटकातला नागडे-उघडेपणा हा समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी हवा. शिवाय सूचकतेत कलात्मकता नसते काय? दृश्यं वा कथन हिणकस करण्यासाठी हिंमत लागत नाही. ती सूचकपणे मांडण्याला कुशाग्रता हवी. आयुष्याच्या जीवघेण्या वळणावर ================================================================================ रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ on 03 March, 2012 07:30:00 AM 21 व्या शतकातही बांगलादेश, नेपाळ व भारतातल्या खेडय़ापाडय़ांतून कितीतरी कोवळ्या मुली महानगरातल्या कुंटणखान्यांमध्ये विकल्या जातात. त्यातल्या काहीजणी तर आपले तारुण्य जाळून गावातल्या आपल्या कुटुंबाचा चरितार्थही चालवतात. पण त्या घराचे दरवाजे मात्र त्यांच्यासाठी बंद असतात. घराची, गावाची आठवण आल्यावर त्यांच्या काळजात उमटणा-या गाण्याचे शब्दही याहून वेगळे कसे असणार? अग्नितांडव ================================================================================ विनम्र आचरेकर on 03 March, 2012 07:30:00 AM मुंबईतील आगीचं चित्रण करणं हे असंच एक आव्हान. इथल्या गगनचुंबी इमारतींपासून अस्ताव्यस्त पसरलेल्या झोपडपट्टय़ांपर्यंत ही मुंबई एकमेकांना इतकी खेटून उभी आहे की, अशा एखाद्या ठिकाणी आग लागल्यानंतर तिथे शिरणं आणि नेमका फोटो काढणं ही कसरतच असते. ‘क्लिओपात्रा आणि लिझ टेलर’एकच प्रश्न : अस्तित्वाचा ================================================================================ यशवंत रांजणकर on 03 March, 2012 07:30:00 AM टीकाविषय झालेल्या या प्रेमाबाबतलिझनं आपल्या आत्मवृत्तात पुढील आशयाचे उद्गार काढले आहेत, ‘‘मी काय करत होते, ते मला चांगलंच कळत होतं. रिचर्डवर प्रेम करणं नतिकतेच्या आजच्या संकेतांनुसार चूक, हे समजत होतं. पण त्याच्यावर प्रेम केल्याशिवाय मला राहावतंच नव्हतं. त्यात ना मान खाली घालण्यासारखं काही घृणास्पद होतं, ना कसला चोरटेपणा.’’ कलेला वाहिलेला ‘काजळी’ ================================================================================ संध्या धुरी on 03 March, 2012 07:30:00 AM ‘काजळी’मध्ये. एकीकडे जिवंत राहाण्यासाठी माणसाची चाललेली धडपड आणि दुसरीकडे त्याची कला शिकण्याची चिकाटी हा या चित्रपटाचा आत्मा आहे. शि-याच्या झाल्या पाणचट वड्या ================================================================================ आस्ताद काळे on 03 March, 2012 07:30:00 AM आस्ताद स्वयंपाक चांगला करू शकतो, याची कीर्ती मित्रांपर्यंत पोहोचली. त्यामुळे माझ्या हातचा पदार्थ चाखण्यासाठी ते घरी येऊ लागले. त्यांनाही आवडू लागलं. त्यामुळे आपल्या हातचा पदार्थ फसणारच नाही, असं वाटू लागलं. अखेर एकेदिवशी हा भ्रमाचा भोपळा फुटला. प्रमोशनची बिकट वाट ================================================================================ चिंतामणी भिडे on 25 February, 2012 05:30:00 AM कलाकारांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेळ दिला तरच पूर्ण मानधन देण्याचा नियम अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाने केला असून निर्मात्यांनी तशी अट करारात टाकण्यास सुरुवात केल्याने कलाकार-निर्मात यांच्यात वादाला सुरुवात झाली आहे.