PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: रॉक ऑन 24 तास धोबीघाट ================================================================================ अदिती पराडकर on 17 May, 2012 10:15:00 AM मुंबईच्या जन्मानंतर काही वर्षानी सुरू झालेली ही परंपरा आजही अविरत सुरू आहे. या परंपरेत खंड तर पडला नाहीच पण आता हा धोबीघाट देशी आणि परदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. बाजूलाच असलेल्या महालक्ष्मी रेसकोर्सला भेट दिल्यानंतर देशी आणि परदेशी पर्यटकांची पावले आपोआपच धोबीघाटाकडे वळतात. झगमगतं गांधी मार्केट ================================================================================ आदिती पराडकर on 10 May, 2012 05:15:00 AM हे मार्केट अतिशय जुनं आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर याची स्थापना झाली. फाळणीमुळे विस्थापित झालेली पंजाबी आणि सिंधी मंडळी मुंबईत आली. या निर्वासितांच्या उदरनिर्वाहासाठी हे मार्केट उभारण्यात आलं. काँक्रिटच्या जंगलातलं काश्मीर ================================================================================ आदिती पराडकर on 03 May, 2012 03:45:00 AM काश्मीरला पृथ्वीवरचं ‘नंदनवन’ म्हणतात. तसा निसर्गाचा मनमुराद आस्वाद या काँक्रिटच्या जंगलातही अनुभवता येतो. इथून बाहेर पडताना या उद्यानाला पुन्हा भेट देण्याची खूणगाठ मनाशी बाळगूनच आपण परततो. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा ‘चित्र’पट ================================================================================ अदिती पराडकर on 26 April, 2012 05:45:00 AM संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाल्यावर एक मे हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून ओळखला जाऊ लागला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी चळवळ होती. या चळवळीत सर्व राजकीय पक्ष, कामगार आणि शेतकरी वर्ग एकजुटीने लढले. कित्येक हुतात्मे झाले. त्या हुतात्म्यांचं स्मारक फोर्ट परिसरात उभारलं आहे. मात्र संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि त्यातील हुतात्म्यांच्या स्मृतीला सविस्तर उजाळा देणारं ‘संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन’ महानगरपालिकेने दादर येथे दोन वर्षापूर्वी उभारलं. ‘महाराष्ट्र दिना’च्या निमित्ताने या दालनाची ही ओळख. इच्छापूर्ती करणारी पारशी बावडी ================================================================================ आदिती पराडकर on 19 April, 2012 03:35:00 AM चर्चगेटच्या परिसरात अशी एक बावडी आहे, असं कोणाला सांगितलं तर ते मुळीच खरं वाटणार नाही. ही बावडी अतिशय जुनी असून, तिचं नाव ‘भिकाजी बेहरामजी’ असं आहे. एक बैल, एक घोडा ================================================================================ आदिती पराडकर on 05 April, 2012 05:00:00 AM प्राणी किंवा पक्ष्यांच्या नावांवरून ओखळले जाणारे परिसर, मुंबईत भरपूर आहेत. परळमधला ‘बैल-घोडा’ परिसर यापैकीच एक. कसं नाव पडलं असेल या परिसराला? शीवेवरचा दुर्लक्षित किल्ला ================================================================================ आदिती पराडकर on 29 March, 2012 05:20:00 AM फोर्ट भागात गोरी मंडळी आणि त्यांचे कुटुंबीय राहत होते. त्यांच्या कुटुंबीयांना वीकएन्डला आउटिंगसाठी शीवचा किल्ला हीच एकमेव सुरक्षित जागा होती. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी काही बंद मेणे आणि व्हिक्टोरियाची रांग फोर्टकडून शीवच्या दिशेनं निघायची. पुढे-मागे धावणारे देशी नोकर आणि व्हिक्टोरियातूनच चहूकडे न्याहाळणारी गोरी कुटुंब, त्यांची गुलाबी गालांची मुलं हे दृश्य हमखास दिसायचं. इतकंच नाही तर शनिवारी शीव किल्ल्याच्या तटबंदीवर लांब खुर्च्यांवर झगे घातलेल्या गो-या मडमाही पहुडलेल्या दिसायच्या किंवा रात्री किल्ल्यातून पाश्चिमात्य संगीताचे सूर ऐकू यायचे, अशी सांगोवांगीची माहिती मिळते. छोटासा गेट वे ================================================================================ आदिती पराडकर on 22 March, 2012 05:35:00 AM मुंबईची ओळख असलेल्या भव्य गेट वेची छोटी प्रतिकृती आहे, याची फारशी कोणालाच माहिती नसेल. मात्र गावदेवीसारख्या गजबजलेल्या वस्तीतील देसाई वाडय़ात त्याची छोटीशी प्रतिकृती आहे. कालांतराने वाडा नामशेष झाला आणि टोलेजंग इमारत उभारली गेली. त्या इमारतीच्या सावलीत हा ‘छोटासा गेट वे’ आजही उभा आहे. शांत ‘झेड’ ================================================================================ आदिती पराडकर on 15 March, 2012 05:30:00 AM माटुंगा परिसराचा पूर्व आणि पश्चिम भाग, आणि रेल्वेस्थानकं यांना जोडणारा पादचारी पूल म्हणजे ‘झेड ब्रीज’. रोज दुपारी 12ते 3 या आणि सुट्टीच्या दिवशी हा पादचारी पूल भयानक वाटू लागतो. कारण लोकांची तिथे फारशी रहदारी नसते. तिथली शांतता अंगावर येते. वाटेत भेटणारा ‘क्रॉस’ ================================================================================ आदिती पराडकर on 01 March, 2012 05:30:00 AM दररोज प्रवास करणा-यांनाही ‘क्रॉस मैदान’ या नावामागचं गुपित माहीत नसेल. खरं तर या नावामागेही इतिहास आहे.