पहिले पान | संवाद | विद्यार्थ्यांना रक्तदानाचे जादा गुण द्यावेत

विद्यार्थ्यांना रक्तदानाचे जादा गुण द्यावेत

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image शैलेश बागवे

गेल्या २२ वर्षात ८२ वेळा रक्तदान करणारे शैलेश बागवे यांच्याशी रक्तदानाच्या चळवळीसंदर्भात केलेली बातचीत.

रक्तदान करण्यामागील भूमिका काय होती?

 

1993 मध्ये मुंबईत झालेले बॉम्बस्फोट कोणीही विसरू शकणार नाहीत. मी तेव्हा लष्करी शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करत होतो. पण उंचीमुळे शक्य झाले नाही. बॉम्बस्फोट झाल्यानंतर मी केईएम रुग्णालयात गेलो असताना मृतदेह पाहिले. रक्त आणि औषधोपचारासाठी तळमळणारे रुग्ण पाहिले. मन विषण्ण झाले. त्याचक्षणी ठरवले की लष्करी शिक्षण मिळाले नाही तरी रक्तदान करून देशाच्या आणि समाजाच्या उपयोगी पडायचे. सुरुवातीला घरातून झालेला विरोध कालांतराने मावळला. गेली 22 वर्षे मी सातत्याने रक्तदान करतोय. दर तीन महिन्यांनी रक्तदान करण्याचा वसा घेतलाय. आजवर 82 वेळा रक्तदान झाले. अठराव्या वर्षापासून साठीपर्यंत कोणीही रक्तदान करू शकतो. मीही शेवटपर्यंत नेमाने हे सर्वश्रेष्ठ दान करणार. आईवडिल, पत्नीचे सहकार्यही मला लाभते आहे. रक्तकर्ण पुरस्कार मला मिळाला पण आपल्या रक्तामुळे एखाद्याचा जीव वाचतो यासारखा पुरस्कार नाही.

 

रक्तदानाबद्दल समाजात उदासीनता आहे का?

 

होय. विशेषत: तरुणांमध्ये उदासीनता प्रकर्षाने जाणवते. व्यसनाच्या आहारी जाणा-या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पिढीला रक्तदानासारख्या पवित्र कार्याकडे वळवले पाहिजे. रक्तदान केल्याने नुकसान काहीच होत नाही. 24 तासात रक्त भरून निघते. एकावेळी फक्त 350 मिलीलिटर रक्त घेतले जाते. हिमोग्लोबीन भरून निघण्यासाठी म्हणून दोन रक्तदानांत तीन महिन्यांचा कालावधी निश्चित केला गेला आहे. एवढे साधे नियम आहेत. पण कोणीही त्याकडे आत्मियतेने पाहात नाही, हीच खंत. अपघात, आपत्कालीन घटनांमध्ये रुग्णांना रक्ताची गरज लागते. त्यासाठी ब्लड कॅम्पसारखे उपक्रम राबवले जातात. रक्तदात्यांची उदासीनता दूर व्हावी म्हणून ऑलवेज पॉझिटीव्ह असा मंत्र मी देईन.

 

उदासीनता दूर व्हावी म्हणून काय प्रयत्न सुरू आहेत?

 रक्तदानाबद्दल जागृती व्हावी म्हणून मी आणि माझे सहकारी रक्तदान शिबिरे घेतो. रेग्युलर आणि इर्मजसी रक्तदात्यांचा एक ग्रुपही मी तयार केलाय. काही संस्थांच्या माध्यमातून केईम रुग्णालयाच्या सहकार्याने आम्ही विविध ठिकाणी अशा योजना राबवल्या आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातून, आदिवासी पाडय़ांतून राबवलेल्या वैद्यकीय उपचार शिबिरांना उत्तम प्रतिसाद मिळतोय. मला शैलेश बागवे ए पॉझिटीव्ह या नावानेच ओळखले जाते. सरकारी परवाना नसणा-या रक्तपेढय़ांवर कोणाचे नियंत्रणच नाही. रक्तदान करून पैसे कमवण्याकडेही अनेकांचा कल दिसतो. सर्वश्रेष्ठ दानाचा धंदा होत असलेला पाहून तो थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. ठाण्यातील रक्तानंद ग्रुपतर्फे दरवर्षी 31 डिसेंबरला रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. त्यात आम्ही तन-मन-धन झोकून काम करतो. रक्तदात्यांच्या वयाची मर्यादा 60 वरून 65 वर्षे करण्याची आमची मागणी आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रक्तदान केल्याबद्दल सामाजिक कार्याचे 10 ते 15 गुण ग्रेस गुण द्यावेत. म्हणजे सामाजिक बांधिलकीसह शैक्षणिक लाभही होऊ शकतो.     ंं

Marathi Online News

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0