पहिले पान | विज्ञान तंत्रज्ञान | कृत्रिम हृदय लवकरच भारतात

कृत्रिम हृदय लवकरच भारतात

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

‘हार्टमेट दोन’ या कृत्रिम हृदयाचे प्रत्यारोपण हृदयरोगींसाठी वरदान सिद्ध होत आहे. मात्र, ‘हार्टमेट दोन’ सध्या फक्त अमेरिका आणि काही युरोपीय देशांमध्येच उपलब्ध आहे. लवकरच ते आग्नेय आशियातही उपलब्ध होणार आहे.

हार्टमेट दोनया कृत्रिम हृदयाचे प्रत्यारोपण हृदयरोगींसाठी वरदान सिद्ध होत आहे. मात्र, ‘हार्टमेट दोनसध्या फक्त अमेरिका आणि काही युरोपीय देशांमध्येच उपलब्ध आहे. लवकरच ते आग्नेय आशियातही उपलब्ध होणार आहे.

इंडियन असोसिएशन ऑफ कार्डिओवॅस्क्युलर अँड थोराकिक सर्जनया संघटनेच्या आठ फेब्रुवारीपासून कोलकात्यात होणा-या 58 व्या वार्षिक कार्यशाळेत या कृत्रिम हृदयाचे प्रात्यक्षिक दाखवण्याबरोबरच त्याबाबतची माहितीही देण्यात येणार आहे. हार्टमेट दोनची किंमत जास्त असूनही त्याच्या उत्तम कार्यपद्धतीमुळे आणि उपयुक्ततेमुळे जगभरातून त्याची मागणी वाढत आहे.

ब्रिटनमधील प्रख्यात हृदयशल्यचिकित्सक मगदी याकूब यांच्यासह युरोपातील नामवंत शल्यचिकित्सकही या पाच दिवसांच्या कार्यशाळेत सहभागी होणार असल्याची माहिती प्रसिद्ध हृदयशल्यचिकित्सक कुणाल सरकार यांनी दिली आहे. देशभरातून आणि परदेशातून सुमारे 1500 हृदयशल्यचिकित्सक या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. आग्नेय आशियातील ही सर्वात मोठी कार्यशाळा आहे. जगभरातील सुमारे 250 हृदयरोगी गेल्या तीन वर्षापासून हार्टमेट दोनया कृत्रिम हृदयाच्या वापर करत असून, ते उत्तम प्रकारे कार्यरत आहे. तसेच त्याचा त्यांना चांगल्या प्रकारे उपयोग होत आहे. हार्टमेट दोनया कृत्रिम हृदयातील विद्युत बॅटरीचा कार्यकाल वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. छातीच्या मागील बाजूस हे हार्टमेट दोनचे प्रत्यारोपण केले जाते. ते रिचार्जेबल इलेक्ट्रिकल बॅटरीवर चालते. भारतात खरगपूर येथील आयआयटीमध्ये देशातील कृत्रिम हृदय विकसित करण्यासाठी संशोधन सुरू आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0