PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: सिनेमा ‘कान’ नावाचं भारतीय मिथक ================================================================================ चिंतामणी भिडे on 22 May, 2012 01:48:00 PM भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांबाबत कुतूहलापेक्षा गैरसमजच अधिक आहेत. ‘बर्लिन’, ‘व्हेनिस’, ‘कान’ यांसारख्या महोत्सवांमध्ये चित्रपटाची निवड होणं, ही त्या फिल्ममेकरच्या कामाची पावती समजली जाते. आपल्याकडे मात्र पैसे घेऊन ‘रेड कार्पेट’वर मिरवणा-या सुंदरींभोवतीच सर्व चर्चा फिरत राहते. इमरान कोंडके ऊर्फ दादा हाश्मी ================================================================================ चिंतामणी भिडे on 15 May, 2012 11:19:00 AM शहरी पांढरपेशा प्रेक्षक दादांना, त्यांच्या सिनेमाला सतत नाक मुरडत आला. हा प्रेक्षक लपत-छपत दादांचे सिनेमे बघायचा, एन्जॉय करायचा. पण त्यांना चांगलं म्हणताना, मात्र त्यांची जीभ अडखळायची. हाच दुटप्पीपणा आज इमरान हाश्मीच्या वाट्याला येतोय. लोकाश्रयाचं काय? ================================================================================ चिंतामणी भिडे on 08 May, 2012 11:51:00 AM मराठी प्रेक्षकांना ‘मसाला’, ‘खेळ मांडला’ आणि आता ‘काकस्पर्श’ असे सलग तीन आठवडे चांगली कलाकृती पाहण्याचं भाग्य लाभलंय. त्यापैकी ‘मसाला’ आणि ‘खेळ मांडला’ हे चित्रपट दर्जेदार असूनही आणि त्यांचं उत्तमपैकी मार्केटिंग करूनही त्यांना म्हणावे तसे प्रेक्षक लाभले नाहीत. ‘काकस्पर्श’ही त्याच वाटेने गेला तर मराठी प्रेक्षकांना चित्रपटांच्या नावाने ओरड करण्याचा हक्क उरणार नाही. सुट्टी मुलांना, फायदा चित्रपटांना ================================================================================ राजेश शिरभाते on 04 May, 2012 06:05:00 AM चित्रपट उद्योगासाठी उन्हाळा हा फार महत्त्वाचा मोसम ठरत आला आहे. मुलांना पडलेल्या उन्हाळी सुटीत पालकही मुलांबरोबर चित्रपटांचा आस्वाद घेतात. या काळातली प्रेक्षकांची मानसिकता लक्षात घेऊन अनेक चित्रपट खास करून या मोसमात प्रदर्शित करण्यात येतात. त्या पार्श्वभूमीवर डिपार्टमेंट, फटसो, जन्नत-2, डेंजरस इश्क यासारखे हिंदी तर काकस्पर्श, ‘आरोही : गोष्ट तिघांची’ यासारखे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. अगदी आमीर खाननेही आपल्या बहुप्रतिक्षित ‘सत्यमेव जयते’ या टीव्ही मालिकेसाठीही हाच मोसम निवडला आहे. हॉट तेच हिट? ================================================================================ चिंतामणी भिडे on 25 April, 2012 09:30:00 AM हिंदी चित्रपटांत असून असून किती अंगप्रदर्शन असणार, हेही प्रेक्षकांना आता चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे रस्त्यावर पायरेटेड सीडीज विकणा-या ठेल्यांवर ‘हवे ते’ चित्रपट सहज उपलब्ध असताना प्रेक्षक भडक जाहिरातींना भुलून ‘सोज्वळ’ हिंदी चित्रपट बघायला येतील, हा भाबडेपणा की वेडपटपणा? सीमेपलीकडील बाजार ================================================================================ चिंतामणी भिडे on 17 April, 2012 09:15:00 AM गेल्या चार वर्षात पाकिस्तानात भारतीय चित्रपटांचा व्यवसाय 300 टक्क्यांनी वाढलाय. सलमान, शाहरुख, आमीर ही खान त्रयी अर्थातच पाकिस्तानातही सुपरस्टार आहे. त्यांचे सिनेमे पाकिस्तानात दीड ते दोन कोटींना सहज विकले जातात. त्या खालोखाल हृतिक रोशन, अक्षय कुमार यांच्या चित्रपटांना वितरकांकडून पसंती दिली जात आहे. क्वार्टरफुल्ल ================================================================================ चिंतामणी भिडे on 11 April, 2012 07:25:00 AM अवघ्या साडेचार कोटींत बनलेला ‘पानसिंग तोमर’ हे या तिमाहीतलं सरप्राइज पॅकेज ठरलं. पण पहिली तिमाही ख-या अर्थाने गाजवली ती ‘अग्निपथ’पेक्षा निम्म्यानेही कमी गल्ला गोळा करणा-या ‘कहानी’ने. अनेक प्रचलित समजुतींना धक्का देणा-या ‘कहानी’ची घोडदौड अजूनही चालू आहे. तर या तिमाहीतली एकमेव निराशा म्हणजे ‘एजंट विनोद’. ग्लास अर्धा भरलेला की रिकामा? ================================================================================ चिंतामणी भिडे on 03 April, 2012 12:14:00 PM मार्केटिंग विझार्ड म्हणून ओळखला जाणारा आमीर आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी प्रदर्शनपूर्व प्रसिद्धीचा धडाका लावून देतो, पण तो कधीही प्रेक्षकांच्या चुकीच्या अपेक्षा निर्माण करत नाही. आमीरच्या मार्केटिंग मंत्राचा कित्ता गिरवताना स्टार मंडळींकडून त्याचा हा आदर्श मात्र सोयिस्कररीत्या दुर्लक्षिला जातो. गुणवत्तेची तीन दशकं ================================================================================ चिंतामणी भिडे on 21 March, 2012 08:00:00 AM बघता बघता ‘विनोद चोप्रा फिल्म्स’ला 30 वर्ष पूर्ण झाली. या 30 वर्षात विधू विनोद चोप्राने केवळ दहाचित्रपटांची निर्मिती केली. दिग्दर्शक म्हणून चोप्रा यशस्वी ठरला असता तर आणखी वेगळ्या, धाडसी कलाकृती पाहायला मिळाल्या असत्या का, हे पाहाणं नक्कीच रंजक ठरलं असतं. एक गोष्ट मात्र नाकारता येणार नाही. निर्माता, दिग्दर्शक म्हणून त्याने नेहमीच गुणाढय़ माणसांना संधी दिली. नवख्या लोकांमध्ये गुण हेरण्याचं त्याचं हे कसब वाखाणण्यासारखं आहे. नशिबाचा टक्का ================================================================================ चिंतामणी भिडे on 13 March, 2012 08:45:00 AM फिल्म इंडस्ट्रीत यशस्वी होण्यासाठी 99 टक्के नशीब आणि केवळ एक टक्का गुणवत्ता लागते, असं म्हणतात. ते फारसं खोटं नसावं, असं इरफान खानकडे बघून वाटतं. हा पठ्ठ्या गेली 25 वर्ष चित्रपटसृष्टीत आहे. गेले किमान दशकभर चरित्र भूमिका, ग्रे शेडच्या भूमिका, समांतर नायक अशा विविधांगी व्यक्तिरेखांमधून आपला ठसा उमटवतोय.