PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: शिक्षण ऑनलाइन प्रवेशापुढील आव्हाने.. ================================================================================ संजीवकुमार कांबळे on 18 May, 2012 11:42:00 AM प्रवेश प्रक्रिया जलद, पारदर्शक, सुलभ व्हावी, तसेच वेळेचा अपव्यय टळावा या उद्देशाने अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. पाच वर्षात टप्प्याटप्प्याने त्यात चांगले बदल करण्यात आले. मात्र, या वर्षीपासून द्विलक्षी (बायफोकल) प्रवेश प्रक्रिया ऑनलाइनमधून वगळण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी द्विलक्षी प्रवेशासंबंधी स्वतंत्र यादी लावण्यात येणार आहे. मात्र द्विलक्षी प्रवेशप्रक्रियाही ऑनलाइन करणेच सोयीचे ठरणार आहे. विशेष शिक्षकांची परवड कधी थांबणार? ================================================================================ अर्चना राणे on 13 April, 2012 06:00:00 AM ना हरकत प्रमाणपत्र नसल्याचे कारण देत गेल्या वर्षी मे महिन्यात मुंबईतल्या 44 विशेष शिक्षकांना सेवेतून कमी करण्यात आले. चाळिशीच्या आसपास असलेल्या या शिक्षकांना इतरत्र कोठेच वाढत्या वयामुळे नोकरीही मिळाली नाही. कायमची बेरोजगारी त्यांच्या वाटय़ाला आली. बरं जे विशेष शिक्षक सेवेत रुजू आहेत, त्यांना तरी केंद्र सरकारने लागू केलेल्या सोयी-सुविधा उपलब्ध होत आहेत असं वाटत असेल, तर तसंही नाही. मुळात शिक्षकच आनंदी नसतील तर विद्यार्थ्यांना ते शिकवणार तरी काय? मूल्यांकन कितपत व्यवहार्य? ================================================================================ अर्चना राणे on 26 March, 2012 12:53:00 PM विनाअनुदानित शाळांमागचा ‘कायम’ शब्द शालेय शिक्षण विभागाने कायमचा हद्दपार केला आणि २०१२-१३ या शैक्षणिक वर्षापासून शाळांना अनुदान देणार असे जाहीरही करून टाकले. पण त्यापूर्वी शाळांना मूल्यांकनाच्या प्रक्रियेस सामोरे जावे लागणार आहे. त्यानंतरच या शाळांमधील विद्यार्थ्यांना इतर अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणेच मोफत पाठय़पुस्तके व अन्य सुविधांचा लाभ मिळणार आहे. मात्र सरकारच्या कामकाजाचा वेग पाहता मूल्यांकनाची प्रक्रिया पुन्हा रखडण्याचीच शक्यता वर्तवली जात आहे. शिक्षणासाठी परिणामकारक तरतुदी हव्यात ================================================================================ अर्चना राणे on 16 March, 2012 07:30:00 AM शाळा-संस्था मोठय़ा प्रमाणावर सुरू करून त्यामध्ये असलेली पारंपरिक शिक्षणपद्धती बदलण्यासही प्राधान्य द्यायला हवे. सार्वजनिक खासगी भागीदारीतल्या या शाळा-संस्थांमध्ये प्राधान्याने वेगवेगळे प्रयोग केले गेले तरच समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल, अशी आशा आपण बाळगू शकू. ‘तिच्या’ शिक्षणात आजही अडचणी ================================================================================ अर्चना राणे on 09 March, 2012 04:30:00 AM तिला शिकायचं असतं. खूप मोठ्ठं व्हायचं असतं. शाळेत वा शाळेच्या वाटेवर एखादा फलक लावलेला असतो. त्यावर लिहिलेलं असतं, ‘मुलगी शिकली प्रगती झाली. मुला-मुलीत भेद नको. स्त्री शिकली की, अख्खं कुटुंब शिकतं.’ पण हे तिच्या आई-बाबांना का कळत नाही? तिच्या शिक्षणासाठी सरकारही अनेक सुविधा उपलब्ध करतंय. ग्रामीण भागात राजमाता जिजाऊ योजनेंतर्गत तिला सायकल दिल्या जाताहेत. बसचा पासही मोफत आहे. शहरांमध्ये पदवी शिक्षण पूर्ण होईपर्यंत रेल्वेचा पासही मोफत मिळतोय. पण तिला हव्या असणा-या सोयीसुविधा शाळेत आहेत का? ‘आयएसईएटी’ फायद्याचीच ================================================================================ अर्चना राणे on 01 March, 2012 07:15:00 AM अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना अनेक प्रवेशप्रक्रियांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांवर येणारे दडपण कमी करण्यासाठी केंद्रीय स्तरावर या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र सीईटी घेण्याचा निर्णय मनुष्यबळ विकास खात्याने घेतला. त्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) घेण्याचा निर्णय तर गेल्याच वर्षी झाला. तर अभियांत्रिकीसाठी इंडियन सायन्स इंजिनीअरिंग एलिजिबिलिटी टेस्ट (आयएसईएटी) घेण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. या दोन्ही परीक्षा 2013 पासून लागू करण्यात येतील. या निर्णयाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया विद्यार्थी, पालक आणि शिक्षकवर्गातून व्यक्त केल्या जात आहेत. ‘मराठी’चे पाऊल अडते कुठे? ================================================================================ अर्चना राणे on 23 February, 2012 06:05:00 AM सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून मराठीची गाथा आणि व्यथा सातत्याने मांडलेली दिसते. ‘मराठी वाचवा’ असा या सर्वाच्या कळकळीमागचा हेतू असतो. पण नेमकं काय केलं पाहिजे, हे एकतर कुणीच बोलत नाही किंवा अन्य भाषांच्या नावांनी बोटं मोडून मूळ मुद्यालाच बगल दिली जाते. विद्यार्थी आणि शिक्षक. चुकतंय कोण? ================================================================================ अर्चना राणे on 15 February, 2012 07:50:00 AM पुर्वी गुरुकुल परंपरा असायची. त्याकाळी विद्या संपादन करण्यासाठी विद्यार्थी गुरूच्या घरी जायचा. विद्यार्थ्यांच्या केवळ मानसिक व शारीरिकच नाही तर आध्यात्मिक विकासाकडेही गुरू लक्ष द्यायचे. त्यावेळी गुरू ही अतिशय व्यापक संकल्पना मानली जायची. पण काळानुसार शिक्षणक्षेत्रात या संकल्पनेची व्यापकता संकुचित होत गेली आणि शिक्षणाचे नैतिक व आध्यात्मिक पैलूही लोप होऊ लागले. गेल्या काही वर्षात अधूनमधून कानावर येणाऱ्या या घटनांबाबत वाचले की त्याची सत्यता लक्षात येतेच. नकोशा सरकारी शाळा.. ================================================================================ अर्चना राणे on 07 February, 2012 07:25:00 AM ना फळा, ना चांगली आसन व्यवस्था, स्वच्छतागृहांची दुरवस्था, अपुरे शिक्षक, अद्ययावत शिक्षण सामग्रीचा अभाव, ग्रंथालये-प्रयोगशाळा कायमची बंद, मैदानंही नाहीत.. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांमार्फत चालवण्यात येणाऱ्या शाळांची ही स्थिती. मुलांनी अशा शाळेत का जायचं? थोडे जास्त पैसे खर्च करून खासगी शाळांत चांगलं शिक्षण मिळत असेल, तर मुलांना तिथे शिकवलं तर बिघडलं कुठे? ‘आकाश’ समोर अडचणींचे मळभ ================================================================================ अर्चना राणे on 20 January, 2012 06:50:00 AM मनुष्यबळ विकास खात्याने खास भारतीय विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या आकाश टॅब्लेट पीसीने अल्पावधीतच विक्रीचा उच्चांक गाठला. पण त्यापाठोपाठ आलेल्या तक्रारींच्या महापुरानं ‘आकाश’ला जमिनीवर आदळवण्यास सुरुवात केली.