वनडे सम्राट
जिंकण्याविषयीच्या त्याच्या टोकाच्या आग्रहापायी पाँटिंग अनेकदा शाळकरी मुलाचा भांडखोरपणा दाखवतो, असे वाटून जायचे. मात्र त्याच्या नावावर असलेले विजय या आग्रही वृत्तीचा पुरावाच सादर करतात. पाँटिंगही वनडेतील एक युग होते. त्या युगाचा अंत झाला आहे.
375 सामने, 13 हजार 704 धावा, 30 शतके आणि तीन जगज्जेतेपदे.. ऑस्ट्रेलियन रिकी पाँटिंगच्या या झळाळत्या वनडे कारकीर्दीचा शेवट मात्र तितकासा दिमाखदार होऊ शकला नाही. ऑस्ट्रेलियात सध्या सुरू असलेल्या कॉमनवेल्थ बँक तिरंगी स्पर्धेत पाँटिंगला पाच डावांमध्ये 3.60च्या सरासरीने अवघ्या 18 धावाच जमवता आल्या. त्यामुळे उर्वरित मालिकेसाठी त्याचा विचार होऊ शकत नाही, असे कळवून ऑस्ट्रेलियन निवड समितीने पाँटिंगला डच्चू दिला. आता वनडे क्रिकेटमध्ये आपल्याला भवितव्य नाही हे 37 वर्षीय पाँटिंगला कळून चुकले आणि त्याने तसे बोलूनही दाखवले. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये भावनेला स्थान नसते आणि पाँटिंगनेही त्याला मिळालेल्या संदेशाचा गाजावाजा केला नाही. गेली 17 वर्षे हा क्रिकेटपटू अथकपणे ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी योगदान देत राहिला. केवळ जिंकण्याचा आणि जिंकण्याचाच विचार त्याने केला. स्वत:ची प्रतिमा, संघाची प्रतिमा, भावना, परंपरा वगैरे गोष्टींना त्याच्या दृष्टीने नगण्य स्थान होते. सुरुवातीला काही काळ सहाव्या क्रमांकावर आणि नंतर बहुतेक काळ तिस-या क्रमांकावर खेळणारा पाँटिंग प्रतिस्पर्धी संघांच्या दृष्टीने कर्दनकाळ होता. चटपटीत फुटवर्क आणि बेडर वृत्ती यांमुळे, लहान चणी असूनही पाँटिंग वाघासारखा मैदानावर वावरायचा. फटके खणखणीत असायचे, रनिंग बिटविन द विकेट्स अप्रतिम होते. त्यामुळे पाँटिंग फलंदाजीला आल्यानंतर धावफलकही धावायला लागायचा. त्याचे चापल्य क्षेत्ररक्षणातही दिसायचे. कव्हर्स किंवा पॉइंटमध्ये पाँटिंग उभा राहिल्यावर प्रतिस्पर्धी फलंदाजांना धावा चोरायची छाती होत नसे. त्याची तुलना नेहमी जाँटी -होड्सशी व्हायची. पण पाँटिंगचा थ्रो -होड्सपेक्षा अधिक अचूक असायचा, त्यामुळे अधिकाधिक फलंदाज धावचीत व्हायचे. 2002 मध्ये पाँटिंग वनडे संघाचा कर्णधार बनला. त्याच्याकडे बलवान क्रिकेटपटूंचा चमू होता. पण यातही त्याने स्वत:चा ठसा उमटवला. पाँटिंग कसोटीपेक्षा वनडे क्रिकेटमध्ये अधिक कल्पक कर्णधार होता. अँड्रय़ू सायमंड्सला 2003 च्या वर्ल्डकप संघात खेळवण्याचा आग्रह त्याचाच होता. कर्णधार स्वत: एक चांगला खेळाडू असला पाहिजे, या सोप्या थिअरीवर त्याचा विश्वास होता. 2003 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये भारताविरुद्ध जोहान्सबर्गला त्याने आठ षटकारांसह तुडवून काढलेल्या 140 धावा आजही स्मरणात आहेत. जिंकण्याविषयीच्या त्याच्या टोकाच्या आग्रहापायी पाँटिंग अनेकदा शाळकरी मुलाचा भांडखोरपणा दाखवतो, असे वाटून जायचे. मात्र त्याच्या नावावर असलेले विजय या आग्रही वृत्तीचा पुरावाच सादर करतात. सचिन तेंडुलकरप्रमाणेच पाँटिंगही वनडेतील एक युग होते. त्या युगाचा अंत झाला आहे. त्यामुळे वाटणारी हुरहूर केवळ ऑस्ट्रेलियन क्रिकेटरसिकांपुरती मर्यादित नाही!Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा