PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: खबर राज्यांची बालमृत्यूंमुळे काश्मीर हादरले ================================================================================ वैभव शिरवडकर on 23 May, 2012 09:05:00 PM आतापर्यंत बॉम्बस्फोट, आत्मघातकी हल्ले यासारख्या दहशतवादी कारवायांमुळे हादरणारे काश्मीर जी. बी. पंत बाल रुग्णालयातील नवजात शिशू आणि बालकांच्या मृत्यूंमुळे हादरले आहे. गेल्या पाच महिन्यांत या रुग्णालयात नवजात शिशू आणि बालक विभागात 360 मुले दगावली आहेत. ओमर अब्दुल्ला सरकारने या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देत आठवडाभरात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात मुले दगावत असतानाही राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला याची दखल घ्यावीशी वाटली नाही, ही बाब त्याहून गंभीर आहे. सहकार शताब्दी परिषदेची ‘पिकनिक’ ================================================================================ राजेंद्र मकोटे on 21 May, 2012 02:30:00 PM आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या शताब्दी वर्षानिमित्त खास यशवंत सहकार परिषदेचे आयोजन अलीकडे कोल्हापूरमध्ये करण्यात आले होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विरोधी पक्षनेते, सभापतीसह सहकारातील जाणकार, अभ्यासक आणि कार्यकत्रे या दिवसभर चाललेल्या परिषदेत उपस्थित होते. आमंत्रितांच्या नावाची यादी पाहता उपस्थित प्रत्येकाला 20 मिनिटे जरी बोलायला दिले असते तरी किमान अडीच ते तीन दिवस सहकाराच्या भविष्यातील वाटचालीविषयी चर्चा होऊन वैचारिक मंथन घडून आले असते. मात्र, या परिषदेला वैचारिक चर्चेऐवजी सहकार क्षेत्राची एक ‘पिकनिक’ असे स्वरूप आले. महाराष्ट्राची आघाडी..तरीही असमाधान ================================================================================ विजय चोरमारे on 19 May, 2012 02:30:00 PM दुष्काळाने होरपळणा-या महाराष्ट्रात सध्या पाणीटंचाईचा विषय ऐरणीवर आहे. राज्यातील सिंचनक्षेत्राचा विषयही गेले काही दिवस राजकीय चर्चेत अग्रभागी आहे. परंतु ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य आणि जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक असलेल्या स्वच्छतेच्या प्रश्नाबाबत मात्र राजकीय नेते फारसे कधी बोलत नाहीत. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या निमित्ताने केलेली भाषणे वगळता हा विषय कधीच राजकीय नेत्यांच्या विषयपत्रिकेवर आलेला दिसत नाही. घोटाळ्यांचे ‘मायाजाल’ ================================================================================ योगेश जोशी on 17 May, 2012 05:55:00 AM मायावती यांच्या कार्यकाळात पुतळे उभारणीत सुमारे 40 हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप करत त्याबाबतच्या चौकशीचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिले आहेत. मायावती यांचा बंगला बांधणीतील घोटाळा, लखनऊ येथे उभारण्यात आलेले पार्क तसेच इतर अनेक योजनांमधील घोटाळय़ांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. घोटाळय़ांच्या मायाजालाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखा करणार असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, मला हेतूपूर्वक प्रकरणांमध्ये गुंतवले जात असून अखिलेश यादव यांच्या कार्यकाळात राज्यातील कायदा आणि सुव्यव्यस्था ढासळत असल्याचा आरोप मायावतींना केला आहे. भाजपला चिंता हॅटट्रिकची ================================================================================ शैलेश पाटील on 16 May, 2012 12:00:00 PM गव्हाचे विक्रमी उत्पादन मध्य प्रदेश सरकारसाठी आपत्ती ठरले आहे. सरकारकडून गहू खरेदीमध्ये होणा-या विलंबाच्या आणि पोत्यांच्या टंचाईविरोधात आंदोलने करण्याची व त्यात स्वत:चा बळी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तरीही मध्य प्रदेशातील सत्ताधारी भाजपला आतापासूनच विधानसभा निवडणुकीत हॅट्ट्रिक करण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. मध्य प्रदेशात सलग दहा वर्षे सत्तेवर असलेल्या भाजपचे पितळ उघडे पाडण्यासाठी काँग्रेसने जनचेतना यात्रा सुरू केली आहे. शतकमहोत्सवी बिहारला प्रगतीची स्वप्ने ================================================================================ योगेश जोशी on 05 May, 2012 11:30:00 AM बिहारी हे कोणावरही ओझे होत नाहीत. उलट ते दुस-यांचे ओझे हलके करतात. मेहनत करण्यात ते कधीही मागे हटत नाहीत, असे वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकतेच मुंबईत बिहारच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात केले. बिहारचा चेहरा बदलत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच गेल्या सहा वर्षात सुमारे 70 हजार गुन्हेगारांना शिक्षा करून या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आणण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वाना सामावून रोजगार पुरवणा-या मुंबापुरीचे आभार मानत, आपण एकाच देशातील असून, एकत्र प्रगती करण्याचे आवाहनही त्यांनी केले. बिहारचा चेहरामोहरा बदलून बिहारला प्रगतिपथाकडे नेण्याचा कुमार यांचा ध्यास आहे. अस्थिरतेचा शाप ================================================================================ शैलेश पाटील on 01 May, 2012 12:29:00 PM सत्ताप्राप्तीसाठी आघाडी करणे फायदेशीर ठरत असले तरी त्यामुळे लोकांना जे हवे आहे ते खरोखरच मिळते का, असा प्रश्न उपस्थित होतो. झारखंडमधील घडामोडी लक्षात घेतल्या तर या राज्यात युतीचे राजकारण पूर्णपणे अपयशी ठरल्याचे व झारखंडच्या डोक्यावर अस्थिरतेची टांगती तलवार कायम असल्याचे दिसून येते. अनेक समस्यांनी गांजलेल्या या राज्यात अशा प्रकारच्या राजकारणामुळे विकास तर दूरच राहिला, पण साधे शांततामय जीवनही जगता येत नसल्याचे चित्र आहे. वृक्ष प्राधिकरण समिती आहे कुठे? ================================================================================ ज्ञानेश्वर टकले on 30 April, 2012 12:45:00 PM पुणे आणि नाशिक या शहरांसह अन्य काही मोठय़ा शहरात वृक्ष प्राधिकरण समितीच अस्तित्वात नसल्याचे माहिती अधिकारातून मागवलेल्या माहितीमध्ये उघड झाले आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात होत असलेल्या अवैध वृक्षतोडीवर लक्ष ठेवण्याचे काम उद्यान विभागाला करावे लागत आहे. तसेच शहरातील उद्यानांचे कामकाज पाहण्याऐवजी उद्यान विभागाला वृक्षतोडीवर लक्ष ठेवावे लागत आहे. सतत होणा-या अवैध वृक्षतोडीबाबत तक्रार नेमकी कुणाकडे नोंदवायची, याबाबतही वृक्षप्रेमींमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. सरकारने याची गांभीर्याने दखल न घेतल्यास शहरांचे काय हाल होतील, याची कल्पनाच न केलेली बरी. ओदिशाची दुर्दशा ================================================================================ शैलेश पाटील on 26 April, 2012 03:21:00 PM ओदिशामध्ये सुरू असलेल्या अपहरणांच्या मालिकेमुळे हे राज्य चर्चेत असले तरी त्यापूर्वी येथील पिपली मतदारसंघातील एका गावात घडलेली एक घटना एकूणच या राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. या राज्यातील स्त्रिया आणि विशेषकरून मागासवर्गीय कितपत सुरक्षित आहेत आणि कायदा-सुव्यवस्थेवर घाला घालणा-यांना का आणि कोण पाठीशी घालत आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मरणारा आदिवासी, मारणाराही आदिवासीच ================================================================================ मनोज बागडे on 19 April, 2012 01:10:00 PM नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी आदिवासींची फौज तयार करण्याच्या गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या घोषणेला अनेक विचारवंत तसेच आदिवासी संघटनांनी कडाडून विरोध होत आहे. नक्षलवादी चळवळीत भरती होणारे आदिवासीच, पोलिसांकडून मारले जाणारेही आदिवासीच, नक्षलींकडून ज्यांची हत्या केली जाते तेही आदिवासीच. आदिवासींचा वंशविच्छेद करण्यासाठी आदिवासींची फौज उभी करून अख्ख्या आदिवासी समाजालाच मरण्यासाठी एकमेकांसमोर उभे करण्याचा सरकारचा हेतू तर नाही ना, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.