PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: युवा क्रिकेट विश्वचषक ऑस्ट्रेलियाकडे युवा क्रिकेट विश्वचषक ऑस्ट्रेलियाकडे ================================================================================ एजन्सी on 30 January, 2010 11:50:00 AM ख्राईस्टचर्च- येथे झालेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्चचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा २५ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याची ऑस्ट्रेलियाची ही तिसरी वेळ आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने १९८८ आणि २००२मध्ये विजेतेपद पटकावले होते. येथे झालेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने पन्नास षटकांत नऊ गडी बाद २०७ धावा केल्या. बदल्यात पाकिस्तानचा डाव १८२ धावांतच संपुष्ठात आला. पाकिस्तानने याआधी दोन वेळा म्हणजे २००४ आणि २००६ साली विजेतेपद पटकावले होते. ऑस्ट्रेलिया- ५० षटकांत- नऊ गडी बाद २०७ पाकिस्तान- ४६.४ षककांत- सर्व गडी बाद १८२