PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: टांझानियाचा लुसाटो नागपूर मॅरेथॉन विजेता टांझानियाचा लुसाटो नागपूर मॅरेथॉन विजेता ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 31 January, 2010 11:00:00 AM नागपूर- येथे झालेल्या दुस-या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये टांझानियाच्या पॅट्रीक लुसाटोने प्रथम क्रमांक पटकावला आहे. ४२ किलोमीटर अंतराच्या शर्यतीमध्ये दुसरा क्रमांक टांझानियाच्या ओसवर्ल्ड काहोरुसी यांने पटकावला. तर तिसरा क्रमांक केनियाच्या बेन्सन याटोव्ह याने पटकावला आहे. महिला अर्धमॅरेथॉनमध्ये केनियाच्या हेलन मायसाको हिने प्रथम क्रमांक पटकावला. दुसरा क्रमांक रेस्तित्युता केमीने पटकावला. तर इथोपियाच्या देहमित जाराने तृतीय क्रमांक पटकावला. पुरुषांच्या १२ किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये भारताच्या अमरसिंहने प्रथम क्रमांक पटकावला. तर जयवीर सिंह आणि संदीप तायडे यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. येथील आरबीआय चौकातून मॅरेथॉनला सकाळी सुरुवात झाली. यावेळी गृहमंत्री आर आर पाटील, अनिल देशमुख, विलास मुत्तेमवार, खासदार आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन आदी राजकीय नेते उपस्थित होते. दुस-या नागपूर मॅरेथॉनची वैशिष्टे- * पूर्ण मॅरेथॉन - अंतर ४२ किलोमीटर * अर्ध मॅरेथॉन- अंतर १२ किलोमीटर * महिलासाठी मॅरेथॉन- अंतर १० किलोमीटर * अंहिसा मॅरेथॉन- साडेतीन किलोमीटर * व्हिलचेअर मॅरेथॉन- तीन कोलोमीटर * सुमारे एक लाख धावपटूंचा सहभाग * सुमारे साडेतीन कोटी रुपयांची बक्षिसे