PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये फेडरर अजिंक्य ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये फेडरर अजिंक्य ================================================================================ एजन्सीज on 31 January, 2010 05:05:00 PM मेलबोर्न- ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉजर फेडररने ब्रिटनच्या अँडी मरेचा पराभव करत सोळावे ग्रँडस्लम विजेतेपद पटकावले. फेडररने मरेचा 6-3,6-4, 7-6 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. रॉजर फेडररने चार वेळा ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.