पहिले पान | क्रीडाजगत | भारतावर डावाने पराभवाची नामुष्की

भारतावर डावाने पराभवाची नामुष्की

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान भारतावर डावाने पराभवाची नामुष्की ओढवली आहे.

नागपूर- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान भारतावर डावाने पराभवाची नामुष्की ओढवली आहे. मंगळवारी, सामन्याच्या चौथ्या दिवशीच भारताचा दुसरा डाव 319 धावांवर आटोपला.  भारताचा एक डाव आणि सहा धावांनी पराभव करून दक्षिण आफ्रिकेने दोन कसोटींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

फॉलोऑन मिळालेल्या भारताच्या दुस-या डावाची सुरुवातही खराबच झाली. चौथ्या दिवशी सचिन तेंडुलकरने केलेल्या शतकी खेळीमुळे भारताचा पराभव लांबला.  तेंडुलकरने कारकिर्दीतील ४६वे शतक पूर्ण केले. मात्र शतक पूर्ण होत नाही तोच त्याला पॉल हॅरिसने बाद केले.  सचिनने 177 चेंडुत 13 चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय मैदानावर सचिनचे हे पहिलेच शतक होय.

पहिल्या डावात सात गडी बाद करणा-या डेलने याही डावात तीन गडी बाद केले.

सोमवारच्या तीन बाद 66 वरून पुढे खेळताना मुरली विजय 32 धावांवर बाद झाला.  त्यापाठोपाठ एस बद्रीनाथला वायन पारनेलने सहा धावांवर बाद केले.

त्यानंतर सचिन आणि कर्णधार महेंद्रसिंग धोणी यांनी पाचव्या गडीसाठी  70 धावांची  भागीदारी केली. मात्र शतक झाल्यानंतर लगेच सचिन बाद झाला. त्यानंतर धोणीला पॉलने 25 धावांवर बाद केले. 

Marathi Online News

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आता आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
4.00