पहिले पान | क्रीडाजगत | इजिप्तचे बॅडमिंटनपटू प्रशिक्षणासाठी ठाण्यात

इजिप्तचे बॅडमिंटनपटू प्रशिक्षणासाठी ठाण्यात

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

इजिप्तची राजधानी कॅरो येथून खास बॅडमिंटन खेळाचे प्रगत प्रशिक्षण घेण्यासाठी सात बॅडमिंटनपटूंचा राष्ट्रीय संघ ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण अ‍ॅकॅडमीमध्ये दाखल झाला आहे.

ठाणे- इजिप्तची राजधानी कॅरो येथून खास बॅडमिंटन खेळाचे प्रगत प्रशिक्षण घेण्यासाठी सात बॅडमिंटनपटूंचा राष्ट्रीय संघ ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण अ‍ॅकॅडमीमध्ये दाखल झाला आहे. या संघासोबत इजिप्तचे बॅडमिंटन प्रशिक्षक मुस्तफा हेसुद्धा आहेत.

 

ठाण्याचे प्रमुख प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्याकडून तसेच ठाण्याच्या इतर अनुभवी प्रशिक्षकांकडून बॅडमिंटन खेळाचे नवे व अत्याधुनिक तंत्र शिकून कामगिरीत सुधारणा करण्यासाठी तसेच आपला आत्मविश्वास दुणावण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत, अशी प्रतिक्रिया बॅडमिंटनपटूंनी दिली. इजिप्तच्या या संघात दोन महिला आणि दोन ज्युनियर तसेच तीन सिनियर पुरुष बॅडमिंटनपटूंचा समावेश आहे.

 

श्रीकांत वाड यांनी बॅडमिंटनपटूंचा सराव आणि प्रशिक्षणासाठी तीन आठवडय़ांचा कार्यक्रम आखला आहे. इजिप्तचे बॅडमिंटनपटू ठाण्यात आल्यामुळे येथील युवा बॅडमिंटनपटूंना त्याचा मोठा फायदा होईल, असे मत श्रीकांत वाड यांनी व्यक्त केले.

 या दौ-यात इजिप्तचे बॅडमिंटनपटू आर्य क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या बॅडमिंटन स्पर्धेतही सहभागी होतील. ही स्पर्धा 12 ते 14 फेब्रुवारीदरम्यान रंगणार असून त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील अव्वल बॅडमिंटनपटू सहभागी होणार आहेत. इजिप्तच्या बॅडमिंटनपटूंच्या सहभागाने या स्पर्धेला ग्लॅमर प्राप्त झाले आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0