PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: हॉकी विश्वचषक- भारताचा पाकिस्तानवर विजय हॉकी विश्वचषक- भारताचा पाकिस्तानवर विजय ================================================================================ एजन्सीज on 28 February, 2010 10:50:00 PM नवी दिल्ली- विश्वचषक हॉकी स्पर्धेतील पहिल्यात सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 4-1 अशी धूळ चारत भारताने विजयी सलामी दिली आहे. येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतातर्फे संदीप सिंगने दोन, तर शिवेंद्र सिंग आणि प्रभज्योत सिंगने प्रत्येकी एक गोल केला. पाकिस्तानतर्फे सोहेल अब्बासने एकमेव गोल केला. भारतातर्फे दोन गोल करणा-या संदीप सिंगला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात स्पेनने दक्षिण आफ्रिकेचा 4-2 पराभव केला, तर दुस-या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव केला.