हॉकी वर्ल्डकप- ऑस्ट्रेलियाकडून भारत पराभूत
राजधानीत सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारतावर 5-2 फरकाने विजय मिळवला आहे.
नवी दिल्ली- येथे सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारतावर 5-2 फरकाने विजय मिळवला आहे. ग्रुप बी मध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने सुरुवाती पासून सामन्यावर वचर्स्व ठेवले होते. पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने 3-1 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर त्यांनी आणखी दोन करत 5-2 अशी आघाडी घेत विजय मिळवला.
स्पर्धेत दोन्ही संघांनी एक विजय आणि एक पराभव स्वीकारला आहे. भारताचा पुढील सामना चार मार्च रोजी स्पेनविरुद्ध होणार आहे.
Marathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा