PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: हॉकी वर्ल्डकप- ऑस्ट्रेलियाकडून भारत पराभूत हॉकी वर्ल्डकप- ऑस्ट्रेलियाकडून भारत पराभूत ================================================================================ पीटीआय on 02 March, 2010 10:20:00 PM नवी दिल्ली- येथे सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारतावर 5-2 फरकाने विजय मिळवला आहे. ग्रुप बी मध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने सुरुवाती पासून सामन्यावर वचर्स्व ठेवले होते. पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने 3-1 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर त्यांनी आणखी दोन करत 5-2 अशी आघाडी घेत विजय मिळवला. स्पर्धेत दोन्ही संघांनी एक विजय आणि एक पराभव स्वीकारला आहे. भारताचा पुढील सामना चार मार्च रोजी स्पेनविरुद्ध होणार आहे.