PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: भारतीय जनतेसाठी सचिन भारतरत्नच! भारतीय जनतेसाठी सचिन भारतरत्नच! ================================================================================ पीटीआय on 05 March, 2010 02:30:00 PM मुंबई- 'मुंबई सर्वांचीच' या सचिनच्या वक्तव्यावर त्याच्यावर जबरदस्त टीका करण्यात आलेल्या 'सामना'च्या अग्रलेखात आता मात्र विक्रमवीर सचिन तेंडुलकरचा जयजयकार करण्यात आला आहे. भारताच्या सर्वसामान्य जनतेने सचिनला केव्हाच भारतरत्न हा पुरस्कार दिलाय अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखात सचिनचे कौतुक करण्यात आले आहे. सचिन हा क्रिकेटचा योद्धा आहे. शिवरायांच्या हाती जशी तलवार शोभायची तशी सचिनच्या हाती बॅट शोभते अशा शब्दात सामन्याच्या अग्रलेखात सचिनचे गुणगान केले आहे.