हॉकी विश्वचषक- इंग्लंडकडून भारताचा पराभव
राजधानीत सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने भारतावर 3-2 फरकाने विजय मिळवला आहे.
नवी दिल्ली- येथे सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने भारतावर 3-2 फरकाने विजय मिळवला आहे. या पराभवासह भारतीय संघाच्या उत्पात्य फेरीत पोहचण्याच्या आशा संपुष्ठात आल्या आहेत. इंग्लंडचा हा स्पर्धेतील सलग चौथा विजय आहे.
येथील मेजर ध्यानचंद मैदानावर शनिवारी ग्रुप बी मध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्पेनवर एकतर्फी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने स्पेनवर 2-0 फरकाने विजय मिळवाला. स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाचा चार सामन्यातील हा तिसरा विजय आहे. तर स्पेनचा चार सामन्यातील हा दुसरा पराभव आहे.
तर अन्य एका सामन्यात दक्षिण आफ्रिकाने पाकिस्तानवर 4-3 फरकाने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेचा हा स्पर्धेतील पहिलाच विजय आहे. या पराभवासह पाकिस्तानच्या उत्पात्य फेरीत पोहचण्याच्या आशा संपुष्ठात आल्या आहेत.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा