PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: हॉकी विश्चचषक- कोरिया अर्जेटीना विजयी हॉकी विश्चचषक- कोरिया अर्जेटीना विजयी ================================================================================ पीटीआय on 07 March, 2010 09:40:00 PM नवी दिल्ली- येथे सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत रविवारी झालेल्या ग्रुप ए मधील सामन्यात कोरिया आणि अर्जेटीना यांनी विजय मिळवला आहे. येथील मेजर ध्यानचंद मैदानावर झालेल्या सामन्यात कोरियाने कॅनडावर 9-2 फरकाने विजय मिळवला. तर अर्जेटीनाने न्यूझीलंडवर 1-0 फरकाने विजय मिळवला.