PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: हॉकी विश्वचषक- भारताचा सामना बरोबरीत हॉकी विश्वचषक- भारताचा सामना बरोबरीत ================================================================================ एजन्सी on 08 March, 2010 10:35:00 PM नवी दिल्ली- येथे सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिके दरम्यानचा सामना बरोबरीत सुटला आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 3-3 गोल केले. आत्ता भारतीय संघाला सातव्या आणि आठव्या क्रमांकासाठी खेळावे लागणरा आहे. हा सामना बारा मार्च रोजी होणार आहे. येथील मेजर ध्यानचंद मैदानावर सोमवारी झालेल्या ग्रुप 'बी'मधील सामन्यात आत्तापर्यंत विजयी राहीलेल्या इंग्लंडला पराभव स्वीकारावा लागला. स्पेनने इंग्लंडवर 2-0 फरकाने विजय मिळवला. तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर 2-1 फरकाने विजय मिळवला.