हॉकी विश्वचषक- पाकिस्तान अंतिम स्थानावर
नवी दिल्लीत सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत कॅनडाकडून 3-2 असा पराभव झाल्यामुळे पाकिस्तान बाराव्या स्थानावर गेला आहे.
नवी दिल्ली- येथे सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत कॅनडाने पाकिस्तानवर 3-2 फरकाने विजय मिळवला. विश्चचषक स्पर्धेतील पाकिस्तानच्या संघाची ही आत्तापर्यंतची सर्वात खराब कामगिरी आहे. यापूर्वी पाकिस्तान संघाने लंडन येथे 1986 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेच अकरावे स्थान मिळवले होते.
येथील मेजर ध्यानचंद मैदानावर अकराव्या आणि बाराव्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात कॅनडाने पाकिस्तानचा पराभव करत अकरावे स्थान पटकावले. दोन्ही संघांनी निर्धारित वेळेत 2-2 गोल केले. त्यानंतर जादा वेळेत कॅनडाने निर्णायक गोल करत विजय मिळवला. कॅनडाने यापूर्वी 1978,90च्या विश्वचषक स्पर्धेत अकरावे स्थान मिळवले होते.
विश्वचषक स्पर्धेत खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारत पाकिस्तान संघातील सर्व 18 हॉकीपटूंनी आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यातून निवृत्ती स्वीकारली आहे.



del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा