PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: अंतिम लढत जर्मनी विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम लढत जर्मनी विरुद्ध ऑस्ट्रेलिया ================================================================================ एजन्सी on 11 March, 2010 11:10:00 PM हॉकी- येथे सुरु असलेल्या हॉकी विश्चचषक स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात जर्मनीने इंग्लंडवर तर ऑस्ट्रेलियाने नेदरलँडवर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. येथील मेजर ध्यानचंद मैदानावर झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यात जर्मनीने इंग्लंडवर 4-1 फरकाने विजय मिळवत सलग तिस-यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या विजयामुळे जर्मनीला सलग तिस-यांदा विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. दुस-या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने नेदरलँडचा 2-1 ने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया यांच्या अंतिम लढत 13 मार्च रोजी होणार आहे. तर तिस-या आणि चौथ्या क्रमांकासाठी इंग्लंड आणि नेदरलँड यांच्याही त्याच दिवशी सामना होणार आहे.