पहिले पान | क्रीडाजगत | भारत दुस-या दिवसाखेर दोन बाद 180

भारत दुस-या दिवसाखेर दोन बाद 180

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image

वीरेंदर सेहवागच्या फटकेबाज खेळीच्या जोरावर भारताने कोलंबो कसोटीत दुस-या दिवसाखेर दोन बाद 180 धावा केल्या आहेत.

कोलंबो- गेल्या दोन कसोटी सामन्यांत विशाल धावसंख्या उभारणा-या श्रीलंकेचा डाव 425 धावांत संपवल्यानंतर, भारतीय संघाने तिस-या व अंतिम कसोटीच्या दुस-या दिवसाखेर दोन बाद 180 अशी मजल मारली आहे. सलामीवीर वीरेंदर सेहवाग शतकाच्या उंबरठ्यावर असून बुधवारी त्याने कसोटी कारकिर्दीतील सात हजार धावांचा टप्पाही ओलांडला. दुस-या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सेहवार 97, तर सचिन तेंडुलकर40 धावांवर खेळत होता.

मंगळवारच्या चार बाद 293 धावांवरून पुढे खेळण्यास उतरल्यानंतर श्रीलंकेच्या थिलन समरवीराने शतक पूर्ण केले. त्याने 137 धावांची नाबाद खेळी केली. मंगळवारच्या 26 धावांवरून पुढे खेळणारा अँजेलो मॅथ्युज 45 धावा करून बाद झाल्यानंतर तळाच्या फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. भारताकडून प्रज्ञान ओझाने चार, इशांत शर्माने तीन, तर वीरेंदर सेहवाग आणि अमित मिश्राने प्रत्येकी एक गडी बाद केला.

त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या वीरेंदर सेहवाग आणि मुरली विजय या बिनीच्या जोडीने 49 धावांची सलामी दिली. विजय 14 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला भरवशाचा राहुल द्रविडही 23 धावा करून बाद झाला. सेहवागने मात्र तुफान फटकेबाजी करून केवळ 87 चेंडूंत 97 धावा केल्या. सेहवाग आणि तेंडुलकरने तिस-या विकेटसाठी नाबाद 88 धावांची भागीदारी केली आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0