पहिले पान | क्रीडाजगत | `स्पॉटफिक्सिंग'प्रकरणी पाकिस्तान गोत्यात

`स्पॉटफिक्सिंग'प्रकरणी पाकिस्तान गोत्यात

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा सहभाग असलेल्या ‘नो बॉल फिक्सिंग’ प्रकरणाची आयसीसीनेही गंभीर दखल घेतली आहे.

लंडन/ मेलबर्न- पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा सहभाग असलेल्या नो बॉल फिक्सिंग प्रकरणाची सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही (आयसीसी) गंभीर दखल घेतली. या सखोल चौकशी केली जाईल आणि त्यात दोषी आढळणा-या खेळाडूंवर योग्य कारवाई केली जाईल, असे आयसीसीने स्पष्ट केल्याने पाकिस्तानी क्रिकेट संघापुढील अडचणी अधिकच वाढल्या आहेत. दुसरीकडे सध्या सुरू असलेली पाकिस्तान - इंग्लंड क्रिकेट मालिका सुरूच ठेवण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे.

 

पाकिस्तानी क्रिकेट संघाने अलीकडील काळात खेळलेल्या 82 सामन्यांचीही आयसीसीकडून चौकशी होण्याची शक्यता असल्याचे तसेच स्कॉटलंड यार्डने टाकलेल्या छाप्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडूंकडे दैनंदिन भत्त्यापेक्षा अधिक रक्कम आढळल्याचे वृत्त सोमवारी प्रसिद्ध झाले. मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

 

द न्यूज ऑफ द वर्ल्ड या ब्रिटिश नियतकालिकाने उघडकीस आणलेल्या या नो बॉल फिक्सिंग प्रकरणात सोमवारी आणखी काही खुलासे झाले. पाकिस्तान- इंग्लंड संघांदरम्यान सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना तसेच यावर्षी जानेवारी महिन्यात सिडनीत झालेला ऑस्ट्रेलिया- पाकिस्तान कसोटी सामन्यातही फिक्सिंग झाले असावे, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्याचवेळी या प्रकरणी अटक झालेल्या मजहर मजीद या पाकिस्तानी बुकीची सोमवारी जामीनावर सुटका झाली.

 

स्कॉटलंड यार्डशिवाय आयसीसीचे भ्रष्टाचारविरोधी पथक, लंडन पोलिसही या प्रकरणाचा अहवाल तयार करत आहेत. या यंत्रणांकडून तसेच पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळाकडून (पीसीबी) प्राप्त होणाऱ्या अहवालाचा सविस्तर अभ्यास करून  कारवाईबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आयसीसीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.

 त्याचवेळी स्कॉटलंड पोलिसांचा तपास अद्याप सुरू आहे. या प्रकरणी एकाही खेळाडूंची चौकशी झालेली नाही. जो पर्यंत या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन पाकिस्तानी खेळाडूंचा या प्रकरणात सहभाग असल्याचे प्रथमदर्शी पुरावे हाती लागत नाहीत, तोवर पीसीबीलाही संबंधितांवर कारवाई करता येणार नाही. आयसीसीलाही या प्रकरणाच्या तपासाचा अहवालाची प्रतीक्षा आहे, असेही ते या वेळी म्हणाले.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0