PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: सानिया अमेरिकन ओपनच्या दुस-या फेरीत सानिया अमेरिकन ओपनच्या दुस-या फेरीत ================================================================================ पीटीआय on 31 August, 2010 01:45:00 PM न्यूयॉर्क- भारताच्या सानिया मिर्झाने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिल्या एकेरीच्या दुस-या फेरीत प्रवेश केला आहे. परंतु सोमदेव देवबर्मनला मात्र पुरुष एकेरीच्या पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत स्थान मिळवणा-या सानियाने पोर्तुगालच्या मिशेली डी ब्रिटो हिचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. दुस-या फेरीत सानियाचा सामना रशियाच्या अनास्थाशिया हिच्याशी होणार आहे. ग्रँडस्लॅम स्पर्धेत थेट प्रवेश मिळविणा-या सोमदेव देववर्मनला मात्र पहिल्या फेरीतच पराभूत व्हावे लागले. दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनने 6-3,6-4, 6-3 अशा सरळ सेटमध्ये सोमदेवचा पराभव केला.