पाकिस्तानी खेळाडूंची नव्याने चौकशी होणार
मॅचफिक्सिंगप्रकरणात अडकलेल्या तिन्ही क्रिकेट खेळाडूंची स्कॉटलंड यार्ड पोलिस नव्याने चौकशी करतील पण सलमान बट, मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद आमेर या तिघांना अटक होण्याची भीती नसल्याचे पीसीबीने म्हटले आहे.
कराची- मॅचफिक्सिंगप्रकरणात अडकलेल्या तिन्ही क्रिकेट खेळाडूंची स्कॉटलंड यार्ड पोलिस नव्याने चौकशी करतील पण सलमान बट, मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद आमेर या तिघांना अटक होण्याची भीती नसल्याचे पीसीबीने म्हटले आहे.
पाकिस्तानच्या खेळाडूंना अंतर्गत चौकशीला सामोरे जावे लागेल असे पाकिस्तानचे संघ व्यवस्थापक यावर सईद यांनी मंगळवारी सांगितले होते. परंतु पाकिस्तान खेळाडूंची नव्याने चौकशी करणार असल्याचे स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी जाहीर केले आहे. पाकिस्तानी खेळाडूंवर कोणत्याही प्रकारचे आरोपपत्र दाखल करण्यात आले नसल्याचेही सईद यांनी सांगितले. त्याचप्रमाणे एकदिवसीय आणि टी-20 स्पर्धेत हे तिन्ही खेळाडू खेळणार असल्याचेही सईद यांनी सांगितले.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा