PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: हॉकी विश्वचषकामध्ये भारताचा दुसरा पराभव हॉकी विश्वचषकामध्ये भारताचा दुसरा पराभव ================================================================================ पीटीआय on 02 September, 2010 05:30:00 PM रोसॅरिया (अर्जेटिना)- येथे सुरु असलेल्या महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाला सलग दुस-यांदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ग्रुप ए मधील सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6-3 अशा फरकाने पराभव केला. भारताकडून राणी रामपालने पुन्हा एकदा चांगली कामगिरी करत दोन गोल केले. तर रितू राणीने एक गोल केला.