पहिले पान | क्रीडाजगत | बोपण्णा-कुरेशी दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत

बोपण्णा-कुरेशी दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा पाकिस्तानचा सहकारी ऐसाम उल-हक कुरेशी यांनी कॅनडाचा डॅनियल नेस्टर आणि सर्बियाचा नेनाद झिमॉन्यिच यांचा पाडाव करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

न्यूयॉर्क- भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा पाकिस्तानचा सहकारी ऐसाम उल-हक कुरेशी यांनी कॅनडाचा डॅनियल नेस्टर आणि सर्बियाचा नेनाद झिमॉन्यिच यांचा पाडाव करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. लिअ‍ॅँडर पेस आणि झिम्बाब्वेची कारा ब्लॅक यांनीही मिश्र दुहेरीत अंतिम आठ जणांमध्ये स्थान मिळवले.

सोळाव्या सीडेड बोपण्णा-कुरेशी जोडीने उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात 6-3, 6-4 असा विजय मिळवला. दमदार सर्विस आणि फोरहॅँडचे ताकदवान फटके लगावत या दोघांनी सरळ सेटमध्ये विजय मिळवला. त्यांना पुढील फेरीत दक्षिण आफ्रिकेचा वेस्ली मूडी आणि बेल्जियमचा डिक नॉर्मन यांचा सामना करावा लागेल. मूडी-नॉर्मन जोडीने या वर्षीच्या फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनमध्ये उपांत्य फेरीत मजल मारली होती. बोपण्णा-कुरेशी जोडीने सलग दुस-यांदा ग्रॅँड स्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश मिळवले.

नेस्टॉर-झिमॉन्यिच या जोडीने यापूर्वी सुरेख कामगिरी केली आहे. पण त्यांच्यापेक्षा आमच्यासाठी खडतर ड्रॉ असल्यामुळे प्रतिस्पध्र्याचे कडवे आव्हान मोडून काढण्यासाठी आम्ही सज्ज होतो. त्यामुळेच आम्हाला चमकदार खेळ करता आला, असे बोपण्णाने सांगितले. विम्बल्डन, एटीपी टूर आणि चॅँलेजर सिरिज स्पर्धामध्ये अप्रतिम कामगिरी करणा-या बोपण्णा-कुरेशी जोडीसाठी हे वर्ष लाभदायी ठरले.

मिश्र दुहेरीच्या दुस-या फेरीत, पेस-ब्लॅक जोडीने एस्टोनियाची काइया कनेपी आणि स्वीडनचा रॉबर्ट लिंडस्टेड यांचा 6-1,6-4 असा पराभव केला. त्यांना पुढील फेरीत जर्मनीची अ‍ॅना-लेना ग्रोएनफेल्ड आणि बहारिनचा मार्क नोल्स यांचा सामना करावा लागेल.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0